मुंबई: आरेतील जंगल वाचवण्यासाठी मेट्रोची कारशेड कांजूरमार्गला हलवण्याचा निर्णय घेणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावर अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे यांनी अलिबागमध्ये वन जमिनीच्या हद्दीत बंगला बांधल्याचा आरोप त्यांनी केला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी एक ट्विट करून उद्धव ठाकरे यांनी उद्योगपती अन्वय नाईक यांच्याकडून विकत घेतलेल्या जमिनीचा तपशील जाहीर केला आहे. कोर्लाई (अलिबाग) येथील या जमिनीचा काही भाग जंगलाच्या हद्दीत मोडतो. त्यामुळे याठिकाणी बंगला बांधताना ठाकरे परिवाराने परवानगी घेतलीच असेल, असे ट्विट किरीट सोमय्या यांनी केले होते. (Amruta Fadnavis criticize CM Uddhav Thackeray family)
किरीट सोमय्यांच्या या ट्विटला अमृता यांनी रिट्विट करत त्यावर विशेष टिप्पणी केली आहे. सो कॉल्ड पर्यावरणप्रेमी कुटुंबीयांनी जंगलातील जमिनीवर बंगला बांधला आहे का? वाह वाह सरकार, अपनी ही कुल्हाडी से करे निसर्ग पर वार, असे अमृता यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. त्यामुळे आता शिवसेनेकडून अमृता फडणवीस यांच्या या टीकेला कशाप्रकारे प्रत्युत्तर दिले जाणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
So the so called ‘environment’ loving family builds bungalow in forest land ? वाह वाह सरकार, अपनी ही कुल्हाड़ी से करे निसर्ग पर वार !! #mahavikrutaghadi https://t.co/SNk8pNWoko
— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) January 25, 2021
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अलिबाग येथील पाच कोटींची संपत्ती लपवल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. याविरोधात त्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रारही केली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांची अलिबाग येथे 5 कोटीची संपत्ती आहे. ही माहिती निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात नमूद केलेली नाही.
ठाकरे कुटुंबांनी आतापर्यंत जमिनीचे 40 व्यवहार केले आहेत. त्यापैकी 30 व्यवहार एकट्या अन्वय नाईक यांच्याशी केले आहेत. नाईक यांच्यासोबत एवढ्या मोठ्या प्रमाणावर व्यवहार करण्याचे कारण काय? मुख्यमंत्र्यांचा रिअल इस्टेटचा बिझनेस आहे का?, असे प्रश्न किरीट सोमय्या यांनी मध्यंतरी उपस्थित केले होते.
संबंधित बातम्या:
मुख्यमंत्र्यांवर बंगले, तर त्यांच्या मंत्र्यांवर बायको लपवण्याचा आरोप, किरीट सोमय्यांचा हल्लाबोल
रश्मी ठाकरे आणि अन्वय नाईक यांच्यात आर्थिक व्यवहार!, किरिट सोमय्या यांचा दावा
किरीट सोमय्यांनी पुन्हा वात पेटवली; ठाकरे सरकारच्या तीन कथित घोटाळ्यांची कागदपत्रे जाहीर
(Amruta Fadnavis criticize CM Uddhav Thackeray family)