मुंबई : महाविकास आघाडी हे केवळ राज्यात नाही तर देशासह संपूर्ण जगातील सर्वात भ्रष्ट सरकार आहे, अशी टीका करत अमृता फडणवीस (Amruta fadnavis) यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला. त्या भाजपा (BJP) मुंबई चित्रपट, नाट्य आघाडीतर्फे चित्रपट, टेलिव्हिजन व ओटीटी या क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्यांसाठी आयोजित महा रोजगार मेळाव्यात रविवारी बोलत होत्या. दादर येथील वसंत स्मृती कार्यालयात महा रोजगार मेळावा पार पडला. मुंबई भाजपा अध्यक्ष, आमदार मंगलप्रभात लोढा (Mangalprabhat Lodha) यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई भाजपा चित्रपट नाट्य आघाडीचे अध्यक्ष संदीप घुगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी महारोजगार मेळावा यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. फडणवीस म्हणाल्या, राज्य सरकार कमालीचे उदासीन असून एसटी कर्मचाऱ्यांचा संप पाच महिन्यांपासून अधिक काळ चालला तरी त्याच्याकडे सरकारला लक्ष द्यायला वेळ नाही. कामगार मेटाकुटीस आलेला असताना त्यांना सरकारने मदत देणे गरजेचे असते. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या हल्ल्याचे कोणीही समर्थन करणार नाही. परंतु, अशा पद्धतीच्या घटना होण्यामागे नेमकं कारण काय आहे? याचाही शोध घेणे गरजेचे आहे असे फडणवीस म्हणाल्या.
अभिनेते जॅकी श्रॉफ म्हणाले, कोरोनाचा चित्रपटसृष्टीशी निगडित अनेक छोट्या मोठ्या कलाकारांना मोठा फटका बसला आहे. त्यातून नैराश्यातून काही जणांनी आत्महत्या देखील केल्या आहेत. मात्र, यावर खचून न जाता सातत्याने प्रयत्न केले पाहिजेत. आयुष्य फार मोठे आहे. जीवनाचा आनंद घ्या. आयुष्य हे फार सुंदर असून त्याला इतक्या सहजतेने संपवू नका, असे आवाहनही यावेळी अभिनेते जॅकी श्रॉफ यांनी केले.
फडणवीस म्हणाल्या, राज्य सरकार कमालीचे उदासीन असून एसटी कर्मचाऱ्यांचा संप पाच महिन्यांपासून अधिक काळ चालला तरी त्याच्याकडे सरकारला लक्ष द्यायला वेळ नाही. कामगार मेटाकुटीस आलेला असताना त्यांना सरकारने मदत देणे गरजेचे असते. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या हल्ल्याचे कोणीही समर्थन करणार नाही. परंतु, अशा पद्धतीच्या घटना होण्यामागे नेमकं कारण काय आहे? याचाही शोध घेणे गरजेचे आहे असे फडणवीस म्हणाल्या.
मेळाव्यात अभिनेता शिव ठाकरे, अभिनेत्री क्रांती रेडकर यांनीही नवोदित कलाकारांना मार्गदर्शन केले. श्रीमती मंजू लोढा, मुंबई भाजपा सचिव प्रतीक कर्पे, मुंबई भाजपा उपाध्यक्ष श्वेता परुळकर, मेघा धाडे, आरोह वेलणकर, मुकुंद कुलकर्णी तसेच फिल्म आणि टेलीव्हिजन क्षेत्राशी निगडित निर्माते, दिग्दर्शक, कलाकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गणेश आचवळ, विनायक नाईक, रिचा सिंग, ओमकार दळवी, महेंद्र साळसकर, अनुराधा चौहान, गौरी देशपांडे, मोहद हनिफ, मनिषा बोडस, लेझली त्रिपाठी, दुर्वास गायकवाड, अमित मिश्रा यांनी परिश्रम घेतले.
इतर बातम्या
Kirit Somaiya : किरीट सोमय्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला, INS Vikrant प्रकरणात अडचणी वाढल्या
Gunratna Sadavarte: सदावर्तेंनी आतापर्यंत दीड कोटी गोळा केले, वकिलांचा कोर्टातील युक्तिवाद काय?