मुंबई : आमदार बच्चू कडूंची गाडी एका वृद्धानं रोखली आणि तुम्ही गद्दारी केल्याचा आरोप एका आजोबांनी केला. नेमकं काय घडलं धाराशीवमध्ये आणि त्यानंतर बच्चू कडूंनी काय प्रतिक्रिया दिली. पाहूयात.
अनोख्या स्टाईलनं आंदोलनासाठी प्रसिद्ध असलेल्या बच्चू कडूंनाच एका 80 वर्षांच्या वृद्धानं अडवलं आणि तुम्ही गद्दारी केली म्हणून लोकांसमोर सुनावलं सुद्धा ठिकाण होतं धाराशिव. एका प्रकरणात कोर्टानं बच्चू कडूंना अडीच हजारांचा दंड आणि एक दिवस कोर्ट संपेपर्यंत थांबण्याची शिक्षा दिली.
शिक्षेनंतर बच्चू कडू कोर्टाबाहेर पडले. त्याचदरम्यान शेतकरी अर्जुन भगवान घोगरे सुद्धा कामानिमित्त कचेरीत आले होते. आजोबांच्या दाव्यानुसार त्यांची बच्चू कडूंशी तोंडओळख होती. त्यामुळे बच्चू कडू दिसल्यावर ते त्यांच्यासमोर गेले आणि त्यानंतर आजोबांनी त्यांचा राग व्यक्त केला.
काही काळ हा ड्रामा रंगला आजोबांचं बोलणं सुरु असताना बच्चू कडू गाडीत बसले., मात्र आपलं म्हणणं न ऐकल्याचं म्हणत आजोबा बच्चू कडूंच्या गाडीसमोर आले. अखेर पोलिसांनी मध्यस्ती करुन आजोबांना बाजूला केलं. दरम्यान या साऱ्या बोलताना आम्ही गद्दारी पक्षाशी केली पण जनतेसोबत नाही, असं बच्चू कडूंनी म्हटलं.
आजोबांच्या आरोपांनुसार बच्चू कडू शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या समस्यांसाठी आंदोलन करणारे नेते म्हणून ओळखले जातात. मात्र त्यांनी जे केलं ते न आवडल्यामुळेच आपण भावना व्यक्त केल्या. दरम्यान आजोबांशी चर्चा करण्याची माझी तयारी होती. मात्र ते चर्चेच्या मानसिकतेत नव्हते. त्यांना कुणीतरी पाठवलं असावं. असंही बच्चू कडूंनी म्हटलंय.
पण याआधी जेव्हा भाजप समर्थक आमदार रवी राणांनी बच्चू कडूंवर खोक्यांचे आरोप केले होते. तेव्हा या अपप्रचारामुळे आम्ही लग्नात गेलो तरी खोका म्हणून लोक डिवचतात, अशी तक्रार खुद बच्चू कडूंनीच केली होती. गुलाबराव पाटलांनीही विरोधकांच्या अपप्रचाराबद्दल जाहीर सभेत भाष्य केलं होतं.