‘मेरे यार की शादी है’; अनंत – राधिकाच्या लग्नात अभिनेता अर्जुन कपूरची हटके स्टाईल चर्चेत
अनंत आणि राधिका यांचा हा शाही विवाह सोहळा मुंबईतील बीकेसी येथील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये संपन्न होत आहे. या लग्नात सहभागी होण्यासाठी अनेक कलाकार पोहोचत आहेत. मात्र या सर्वात बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर यांची एन्ट्री मात्र जोरदार झाली.
रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या विवाहानिमित्त अनेक बॉलिवूड स्टार हजेरी लावत आहेत. अनंत आणि राधिका यांचा हा शाही विवाह सोहळा मुंबईतील बीकेसी येथील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये संपन्न होत आहे. या लग्नात सहभागी होण्यासाठी अनेक कलाकार पोहोचत आहेत. चित्रपट दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा आपल्या कुटुंबासह या लग्नासाठी उपस्थित आहेत. अभिनेता जैकी श्रॉफ, जॉन सेना, राजकूमार राव, पत्रलेखा, अनन्या पांडे यांच्यासोबत अनेक देशी-विदेशी पाहुणे अनंत आणि राधिकाच्या लग्नाला पोहोचले आहेत. मात्र, या सर्वात अभिनेता बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर याच्या पेहराव सर्वाचे लक्ष वेधून घेत होता.
अनंत अंबानी आणि राधिका यांचा विवाह सोहळ्यासाठी जिओ वर्ल्ड सेंटर पूर्ण सजले आहे. पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी अंबानी कुटुंब स्वतः उपस्थित आहेत. या लग्नात आधुनिकतेची झलक दिसत असली तरी परंपरांपासूनही ते दूर राहिलेले नाही. नीता अंबानी यांच्या आई पूर्णिमा दलाल आणि त्यांची बहीण ममता दलाल या लग्नासाठी उपस्थित आहेत. मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा ही पती आनंद पिरामल आणि मुलगा आकाश हा पत्नी श्लोका हिच्यासोबत येथे आले आहेत.
अभिनेत्री सारा अली खान, इब्राहिम अली खान, खुशी कपूर, अनिल कपूर, मुलगी शनाया कपूर, भारतीय माजी क्रिकेटपटू कृष्णमाचारी श्रीकांत आपल्या पत्नीसोबत आले आहेत. तसेच, अभिनेता मीझान जाफरी, मुंबई इंडियन्स आणि भारतीय क्रिकेटपटू तिलक वर्माही येथे पोहोचले आहेत. मात्र या सर्वात बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर यांची एन्ट्री मात्र जोरदार झाली. त्याने आपल्या कपड्यांवर ‘मेरे यार की शादी है’ असे लिहिले आहे. त्याची एन्ट्री होताच त्याच्या कपड्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.