Mumbai Anant Chaturdashi 2019 : लाडक्या बाप्पाचे जल्लोषात विसर्जन, गणेशभक्तांचे डोळे पाणावले

अनंत चतुर्दशीनिमित्त (Anant Chaturdashi 2019) गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला भक्तांचा जनसागर उसळणार आहे. मुंबईतील विविध भागातील सार्वजनिक गणेशोत्सव मिरवणुकांचे लाईव्ह अपडेट्स

Mumbai Anant Chaturdashi 2019 : लाडक्या बाप्पाचे जल्लोषात विसर्जन, गणेशभक्तांचे डोळे पाणावले
फोटो - प्रातिनिधीक
Follow us
| Updated on: Sep 13, 2019 | 12:14 AM

मुंबई : अनंत चतुर्दशीनिमित्त (Anant Chaturdashi 2019) लाडक्या गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी भक्तांचा जनसागर राज्यभरातील विविध समुद्र किनारे, नद्या-तलाव तसंच कृत्रिम तलावांजवळ उसळला आहे. गेले अकरा दिवस भक्तिभावे पूजा करताना गणेशभक्तांमध्ये उत्साह असला, तरी साश्रू नयनांनी बाप्पाला निरोप (Anant Chaturdashi 2019) दिला जात आहे.

[svt-event title=”लालबागचा राजा विसर्जनासाठी निघाला” date=”12/09/2019,11:02AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”गणेशगल्लीच्या गणपतीची मिरवणूक” date=”12/09/2019,10:08AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”लालबागचा राजा विसर्जनासाठी मार्गस्थ होणार” date=”12/09/2019,10:03AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”लालबागचा राजा गणपती विसर्जन मिरवणुकीपूर्वी भक्तांचा जल्लोष” date=”12/09/2019,9:57AM” class=”svt-cd-green” ] [/svt-event]

[svt-event title=”गणेशगल्ली गणपती बाप्पाची आरती” date=”12/09/2019,9:56AM” class=”svt-cd-green” ] [/svt-event]

[svt-event title=”तेजुकाया गणपती विसर्जन मिरवणुकीला सुरुवात” date=”12/09/2019,9:55AM” class=”svt-cd-green” ] [/svt-event]

[svt-event date=”12/09/2019,8:37AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event date=”12/09/2019,8:23AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

मुंबईत आज पाच हजार 630 (5,630) सार्वजनिक गणेश मूर्ती, तर 31 हजार 72 (31,072) घरगुती गणपतींचं विसर्जन होईल, असा अंदाज आहे. शहरातील एकूण 129 जागांवर विसर्जनाची व्यवस्था करण्यात येणार आहे. यामध्ये गिरगाव, दादर, माहिम, जुहू, मार्वे यासारख्या समुद्र चौपाटी, विविध तलाव आणि कृत्रिम तलावांचा समावेश आहे.

लालबागचा राजा, मुंबईचा राजा (गणेशगल्ली), गिरगावचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी, खेतवाडीचा राजा, केशवजी नाईक चाळ गणपती, फोर्टचा राजा, अखिल चंदनवाडीचा गणपती अशा अनेकविध गणपती बाप्पांच्या मूर्तींचं मुंबईत विसर्जन होतं. यानिमित्त गणेशभक्तांची मोठी गर्दी मिरवणुकीत पाहायला मिळते.

अनंतचतुर्दशीनिमित्त गुरुवारी गणेश विसर्जनासाठी मुंबई पोलिसांनी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवली आहे. सर्व पोलिस कर्मचाऱ्यांची साप्ताहिक सुट्टी रद्द करण्यात आली आहे. जवळपास 40 हजार पोलिसांचा फौजफाटा शहर आणि उपनगरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज आहे. याशिवाय SRPF, QRT, FORCE ONE, RAF आणि होमगार्डही तैनात आहेत.

पाच हजार सीसीटीव्ही कॅमेरांची गणेश भक्तांच्या गर्दीवर निगराणी असेल. तीन ड्रोन कॅमेरांचाही यावेळी वापर केला जाणार आहे.

गणेशोत्सवाच्या बातम्या एकाच लिंकवर 

गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला (Anant Chaturdashi 2019) लाखो भक्तांचा जनसागर उसळतो. त्यामुळे रस्ते वाहतुकीवरही मोठ्या प्रमाणात परिणाम होत असल्याने वाहतुकीचे मार्ग बदलण्यात आले आहेत किंवा बंद ठेवण्यात आले आहेत. शहरातील 53 मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. 56 मार्गांवर एकेरी वाहतूक सुरु राहील, तर 99 रस्त्यांवर गाडी पार्क करण्याची परवानगी नसेल.

गणपती विसर्जनावेळी कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी समुद्र किनाऱ्यावर लाईफगार्ड तैनात करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे समुद्रात बोटीच्या माध्यमातूनही गस्त घालण्यात येणार आहे. मुंबई महापालिकेची वैद्यकीय कॅम्प आणि अग्निशमन दलही तैनात करण्यात आले आहेत.

Anant Chaturdashi 2019 | गणपती विसर्जनानिमित्त मुंबईतील कोणकोणत्या मार्गांमध्ये बदल?

छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.