मीरा रोडमध्ये पुन्हा राडा, भाजप कार्यकर्त्यांचं पोलीस स्टेशनसमोर ठिय्या आंदोलन, नेमकं काय कारण?
मीरा रोड येथे पोलीस ठाण्यामध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे. भाजपचे माजी आमदार या आंदोलनाचं नेतृत्त्व करत असून त्यांनी नाव एका पोलीस अधिकाऱ्याने सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली गुन्हे दाखल केल्याचं म्हटलं आहे.
विनय गायकवाड, मुंबई | मीरा रोडमध्ये मागे दोन गटात राडा पाहायला मिळाला होता. आता मीरा रोड येथे भााजपचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. काशीमीरा पोलीस ठाण्यात भाजपा कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे. या आंदोलनाचं नेतृत्त्व भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता करत आहेत. काशीमीरा पोलीस ठाण्यात पोलीस आयुक्त आल्याशिवाय आंदोलन थांबणार नसल्याचं मेहता यांनी म्हटलं आहे. नेमकं कोणत्या कारणामुळे आंदोलन केलं आहे जाणून घ्या सविस्तर.
सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली भाजपाचे माजी नगरसेवक अरविंद शेट्टी यांच्यावर बेकायदेशीर गुन्हे दाखल केले आहेत ते तात्काळ मागे घ्यावेत, ज्यांनी बेकायदेशीर गुन्हे दाखल केले त्या संबंधित अधिकारी यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करा, अशी मागणी नरेंद्र मेहता यांनी केली आहे. मेहता यांनी शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांचं नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला.
मी या भागाचा आमदार आहे लोकांनी मला विकासाच्या जोरावर तीनवेळा निवडून दिलं आहे. कुठल्या एका डान्स बार चालवणाऱ्या व्यक्तीने जर माझावर आरोप केला तर त्याचा उत्तर देण्यासाठी मी बांधिल नाही. एखाद्या व्यक्तीने दिलेले सुपारीमुळे कोणी असा करत असेल तर कलंक आहे. लॉजिंग बोर्डिंग चालवणारा व्यक्ती लोकप्रतिनिधीवर आरोप करत असेल तर याची चौकशी झाली पाहिजे. मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांना पत्र लिहून याची चौकशीची मागणी केल्याचं प्रताप सरनाईक म्हणाले.
दरम्यान, तिथे शासकीय जागा आहे कोणी आपल्या स्वतःचा फायदेसाठी भारतीय जनता पक्षाचा वापर करत असेल तर ही बरोबर नाही आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे, भारतीय जनता पक्षाचे गृह राज्यमंत्री आहे म्हणून तुम्ही त्यांच्यावर आरोप करत असल्याचं प्रताप सरनाईक यांनी म्हटलं आहे.