मुंबई : शुक्रवारी राज्यसभेसाठी (Rajyasabha Election)राज्यात मातदन पाड पडलं. काही वेळातच निकाल हाती येणार असेही सांगण्यात आलं. मात्र आरोपांच्या फैरींमुळे हा निकाल लागायला पहाट उजाडली. मात्र ही पाहट ही भाजपसाठी (BJP) दिवाळी पहाटपेक्षा कमी नव्हती. कारण भाजपच्या तिन्हीच्या तिन्ही जागा याठिकाणी निवडून आल्या. मग काय महाविकास आघाडीच्या गोटात भयंकर सायलेन्स पसरला. नेत्यांना काय प्रतिक्रिया द्याव्यात, अशीच स्थिती दिसू लागली. मात्र दुसरीकडे भाजप नेत्यांनी जल्लोषाला सुरूवात केली. यात भाजप नेते अनिल बोंडे हे तर विजयी झाल्याची बातमी ही सर्वात आधी आली. मग काय बोंडेंच्याही आनंदाला पारावार उरला नाही. बोडेंनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. यात, आता कसं वाटतंय…गार गार वाटतंय…पुन्हा उभा राहशील का….अशा अनेक घोषणा ऐकायला मिळाल्या. मात्र यावेळी जे घडलं ते पाहून अनेकांना हसू आवरेना झालंय. अनिल बोंडे यांनी केलेल्या एका कृतीनं आता नेटकरी चेकाळले आहेत. त्यांनी हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल केला आहे.
फडणवीस आणि इतर नेते विधान भवनाबाहेर येतानाच भाजपची जोरदार घोषणाबाजी सुरू होती. त्यानंतर काही काळ हे सेलिब्रेशन चाललं. एकमेकांच्या गळाभेटी झाल्या. त्यानंतर आपसुकच देवेंद्र फडणवीस हे मीडियाला आपली पहिली प्रतिक्रिया देण्यासाठी आले. मात्र आता एवढा मोठा विजय मिळाल्यावर भाजप नेत्यांचा आनंद गगनात मावत नव्हता. अनिल बोंडे यांचीही स्थिती अशीच काही होती. फडणवीस बोलताना महाविकास आघाडीवर हल्लाबोल चढवत होते. मात्र त्यांच्याच बाजुला उभे राहिलेले बोंडे उ….असा आवाज काढू लागले. त्या विजयाच्या गडबडीत तर कुणी त्याकडे फारसं लक्ष दिलं नाही. बोंडेंना गप्प बसवून फडणवीस बोलत राहिले. मात्र त्याच उ…ची सोशल मीडियावर बरीच चर्चा आहे.
अनिल बोंडे यांना नेहमीच एक उत्साही व्यक्तीमहत्व म्हणून पाहिलं जातं. त्याचे अनेक वाद आणि विधानही चर्चेत असात. फडणवीसांच्या सरकारमध्ये ते काही दिवस राज्याचे कृषीमंत्रीही होते. मात्र अनिल बोंडे हे गेल्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झाले होते. मात्र आता भाजपने सर्वांनाच सरप्राईज करत बोडेंना थेट दिल्लीतल्या संसदेतच धाडलं आहे. त्यामुळे आनंद गगनात न मावणं सहाजिक आहे. मात्र कॅमेरा हा या सगळ्या रिअॅक्शन पकडतो आणि अशाच गोष्टी पुन्हा व्हायरल होतात. बोडेंचंही तसंच काही झालंय. मात्र या आनंदाच्या भरातही फडणवीस अगदी शांतपणे मीडियाला प्रतिक्रिया देताना दिसले. फडणवीसांच्या या संयमचेही बरेच कौतुक होत आहे.