अनिल देशमुखांविरोधात ईडीची भक्कम मोर्चेबांधणी, बनावट कंपन्यांच्या माध्यमातून व्यवहार झाल्याचा आरोप

Anil Deshmukh | सचिन वाजे याने तळोजा कारागृहात अंमलबजावणी संचालनालयाने केलेल्या चौकशीत सांगितले की, आपण अनिल देशमुख यांना त्यांच्या सरकारी बंगल्यावर अनेकवेळा भेटलो. अनिल देशमुख कडून सचिन वाजेला प्रत्येक बार कडून ३ लाख रुपये वसूल करण्याचे निर्देश होते आणि प्रत्येक महिन्याचे टार्गेट ४. ७० कोटी ठेवण्यात आले होते.

अनिल देशमुखांविरोधात ईडीची भक्कम मोर्चेबांधणी, बनावट कंपन्यांच्या माध्यमातून व्यवहार झाल्याचा आरोप
चांदीवाल आयोगाने अनिल देशमुखांना ठोठावला 50 हजार रुपयांचा दंड
Follow us
| Updated on: Nov 03, 2021 | 8:03 AM

मुंबई: 100 कोटींची खंडणी आणि मनी लाँड्रिंग प्रकरणी अटकेत असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ झाली असून त्यांची यंदाची दिवाळी अंमलबजावणी संचालनालयाच्या कोठडीत जाणार आहे. सोमवारी रात्री उशिरा अटक केल्यानंतर त्यांना मंगळवारी मुंबई सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना 6 नोव्हेंबर पर्यंत ईडी कोठडीत पाठवले आहे. न्यायालयात अंमलबजावणी संचालनालयाने त्याच्या कोठडीसाठी बनावट शेल कंपन्या तयार करण्यापासून, बार मालकांकडून वसुली करण्यापर्यंत, ट्रस्टच्या नावाखाली हवाला मार्फत पैसे पळवण्यापासून अनेक आरोप लावले आहेत. या प्रकरणाच्या तपासात अनेक महत्त्वाचे दुवे शोधायचा असून, त्यासाठी अनिल देशमुखची कोठडी आवश्यक असल्याचे ईडीतर्फे न्यायालयाला सांगण्यात आले.

ईडीच्या म्हणण्यानुसार, अनिल देशमुख यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर 13 कंपन्या आणि नातेवाईक आणि जवळच्या मित्रांच्या नावावर 14 कंपन्या आहेत, यापैकी अनेक शेल कंपन्या आहेत आणि त्यांचा वापर पैसा रूट करण्यासाठी केला जात होता. या कंपन्यांच्या बँक अकाउंटची छाननी केली असता, पैशाचा ओघ वेगात असल्याचे स्पष्ट होते, ज्यावर अनिल देशमुख किंवा त्यांच्या कुटुंबीयांचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष नियंत्रण आहे. मात्र अनेक कंपन्या अश्या समोर आल्या की त्यांचा मुळात काहीही बिजनेस नाही. मात्र अशा कंपन्यांचे अस्तित्व दाखवून पैशाचा फ्लो केला गेला आहे.

ज्यामध्ये अनिल देशमुख अनेक कंपन्यांचा संचालक मंडळांमध्ये हस्तक्षेप करत असून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचाही सहभाग आहे. अनेक शेल कंपन्यांमध्ये डमी संचालक मंडळे तयार करण्यात आली आहेत.

कोणत्या शेल कंपन्याशी देशमुखांचा संबंध?

मेसर्स राबिया लॉजिस्टिक प्रा. लि.

मेसर्स ब्लॅक स्टोन लॉजिस्टिक प्रा. लि.

मेसर्स काँक्रीट एंटरप्राइज प्रा. लि.

मेसर्स नॉटिकल वेअरहाउसिंग प्रा. लि.

मेसर्स पॅराबोला वेअरहाऊसिंग प्रा. लि.

मेसर्स बायो-नॅचरल ऑरगॅनिक प्रा. लि.

मेसर्स काटोल एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड

मेसर्स सब्लाइम वेअरहाउसिंग प्रायव्हेट लिमिटेड

मेसर्स विश्वेश लॉजिस्टिक प्रा. लि.

मेसर्स अरोमा एंटरप्राइजेस प्रा. लि.

मेसर्स मिन्ट्री प्रीमियर लाइफस्टाइल अँड ब्युटी प्रायव्हेट लिमिटेड,

ट्रॅव्होटेल्स हॉटेल

मेसर्स मृगतृष्णा ट्रेडिंग लि.

अशा कंपन्यांमध्ये अनिल देशमुख यांचे निकटवर्तीय आणि कुटुंबातील सदस्य सामील आहेत. या कंपन्यांवरही थेट देशमुख कुटुंबीयांचे नियंत्रण आहे.

सहा ठिकाणी छापे

या प्रकरणाच्या तपासात ईडीच्या तपासानुसार अनेक वेगवेगळ्या बँक खात्यांच्या व्यवहारांचा ताळेबंद ( balance sheet )समोर आला असून, अनिल देशमुख यांच्या साथीदारांच्या कंपन्यां वरून अनिल देशमुख कुटुंबीयांचे नियंत्रण असलेल्या कंपन्यात ट्रॅन्जेक्शन फ्लो निष्पन्न झाले आहे. परंतु व्यवहाराचे कोणतेही खरे कारण किंवा करार स्पष्टपणे दिसत नाही. ह्या प्रकरणात ईडी ने २५ जुनं २०२१ रोजी अनिल देशमुखच्या जवळच्या आणि कुटुंबियांच्या अप्रत्यक्षरित्या संचालित ६ कंपन्यांच्या मुंबई, नागपूर, अहमदाबाद येथे असलेल्या ठिकाणांवर छापे टाकण्यात आले. ज्यामध्ये कंपनीचे संचालक, भागधारक आणि 2 सीए यांचे जबाब नोंदवले गेले.

वाझे-देशमुख कनेक्शन काय?

आपल्या पदाचा गैरवापर करून अनिल देशमुख यांनी खंडणीच्या रकमेला चालना दिली . सचिन वाजेच्या स्टेटमेंट प्रमाणे हे समोर येतंय कि मुंबईच्या बार आणि रेस्टारेंट कडून वसुली अनिल देशमुखच्या सांगण्या वरून वाजे करत होता. त्यात वाजे ह्यांनी ४० लाख रुपयांची टोकन मनी घेतल्या बरोबरच २. ६६ कोटी रुपये कलेक्शन केले होते आणि बार मालकांना सांगितलं होता की, हे पैसे नंबर 1, गुन्हे शाखा आणि सामाजिक शाखेतील अधिकाऱ्यांकडे जाणार आहेत.

सचिन वाजे याने तळोजा कारागृहात अंमलबजावणी संचालनालयाने केलेल्या चौकशीत सांगितले की, आपण अनिल देशमुख यांना त्यांच्या सरकारी बंगल्यावर अनेकवेळा भेटलो. अनिल देशमुख कडून सचिन वाजेला प्रत्येक बार कडून ३ लाख रुपये वसूल करण्याचे निर्देश होते आणि प्रत्येक महिन्याचे टार्गेट ४. ७० कोटी ठेवण्यात आले होते.

खंडणीचे पैसे कुठे वळवले?

ईडीच्या म्हणण्यानुसार, प्रकरणाच्या तपासादरम्यान, त्यांना श्री साई शिक्षण संस्थान, नागपूरमध्ये चेकद्वारे आर्थिक व्यवहाराची माहिती मिळाली. खरे तर श्री साई शिक्षण संस्थान हे धर्मादाय ट्रस्ट आहे. शिवाय संचालक अनिल देशमुख आणि त्यांचे कुटुंबीय सदस्य सोबतच त्यांचे पीए कुंदन शिंदे देखील आहेत .. ही संस्था नागपुरातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निकची मोठी संस्था आहे. होत आहे. ईडी टीम तर्फे असं नोटीस करण्यात आले आहे की ट्रस्टच्या खात्यात दिल्लीच्या चार कंपन्या मार्फत ४ कोटी १८ लाखांचा व्यवहार मागील काही काळापासून सतत सुरू आहेत. ईडीने तपास सुरू केला, तेव्हा दिल्लीच्या पत्त्यावर अनेक कंपन्या असल्याचे आढळून आले.

मेसर्स रिलायबल फायनान्स कॉर्पोरेशन प्रा. लि.

मेसर्स व्हीए रियल कॉन प्रा. लि.

मेसर्स उत्सव सिक्युरिटीज प्रा. लि.

आणि मेसर्स सीतल लीजिंग अँड फायनान्स प्रा. लि.

या चार कंपन्या फक्त कागदावरच अस्तित्वात आहेत. ज्या केवळ व्यवहारांसाठी बनविला होत्या. या चार सेल कंपन्यांचे बनावट संचालक होते सुरेंद्र कुमार जैन आणि वीरेंद्र जैन.

सुरेंद्र कुमार जैन आणि वीरेंद्र जैन यांच्या ईडीच्या चौकशीत समोर आला की, अनिल देशमुख यांचा मुलगा हृषीकेश देशमुख याने काळा पैसा पांढरा करण्याचा मार्ग शोधला आहे. तो अश्या एका व्यक्तीच्या शोधात होता जो देणगी किंवा कर्जाच्या स्वरूपात रोख रक्कम ट्रस्टच्या खात्यात जमा करेल. ऋषिकेश देशमुख या जैन बंधूंना अगोदर पासून ओळखत असे जे अशा व्यवसायात गुंतले होते. ऋषिकेश देशमुखच्या सांगण्यावरून हवालाद्वारे नागपूरहून दिल्लीत ४ कोटी १८ लाख रुपये पोहोचले आणि त्यानंतर हृषिकेश देशमुखने बनावट कंपन्या बनवल्या. आणि त्यामार्फत नागपूरच्या श्री साई शिक्षण संस्थानच्या चॅरिटेबल ट्रस्ट मध्ये ठेवले. अशाप्रकारे पैशाचे काळ्यातून पांढरे रूपांतर करून ट्रस्टमध्ये कायदेशीर देणगी दिली.

अंमलबजावणी संचालनालयाची बाजू मांडल्यानंतर अनिल देशमुख यांची बाजू मांडण्यासाठी आलेल्या वरिष्ठ वकिलांनी ईडीच्या अटकेबाबत प्रश्न उपस्थित केला आणि ते म्हणाले की, हे प्रकरण उच्च न्यायालयात, सर्वोच्च न्यायालयात सुरू असताना, ईडीने कोर्टात प्रतिज्ञापत्र देऊन सांगितले की आम्ही आता पर्यंत अनिल देशमुखला संशयित म्हणून पाहत आहोत. त्यांना चौकशीची संधी देत आहोत. त्यामुळेच काल ते वकिलासोबत ईडी मध्ये गेले होते तिथे त्यांना अटक करण्यात आली. या प्रकरणी सीबीआय तपासाचे आदेश देण्यात आले होते आणि सीबीआयने आरोपपत्र दाखल केले नाही आणि त्यांनी सीआरपीसी कलम 41अ अंतर्गत नोटीस दिली आहे, म्हणजे त्यांना अटक होणार नाही. मात्र, ईडीने देशमुखांना अटक केली आहे. अनिल देशमुख हे 6 नोव्हेंबर पर्यंत ईडीच्या कस्टडीत असतील. न्यायालयाने त्यांच्या आजारपणामुळे त्यांच्या दोन मागण्या मंजूर केल्या आहेत. त्यांना घरचे जेवण ,औषधे देण्याची परवानगी आहे. त्याचबरोबर त्यांच्या वकिलाला दृश्यमान अंतरावर उपस्थित राहण्याची परवानगी कोर्टाने दिली आहे.

'दमानियांना जे करायचं ते करू द्या...', गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल
'दमानियांना जे करायचं ते करू द्या...', गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल.
कल्याण अत्याचार प्रकरण, आरोपी विशाल गवळीच्या वकिलाला धमकी
कल्याण अत्याचार प्रकरण, आरोपी विशाल गवळीच्या वकिलाला धमकी.
बीडच्या फरार आरोपींचं प्रसिद्ध पत्रक जारी, नेमकं काय म्हटलंय?
बीडच्या फरार आरोपींचं प्रसिद्ध पत्रक जारी, नेमकं काय म्हटलंय?.
राऊतांना मातोश्रीवर धुतलं, खोलीत डांबलं? बातम्या व्हायरल; राऊत भडकले
राऊतांना मातोश्रीवर धुतलं, खोलीत डांबलं? बातम्या व्हायरल; राऊत भडकले.
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, 'या' पाच प्रकारच्या बहिणींना आता...
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, 'या' पाच प्रकारच्या बहिणींना आता....
'मेजर ध्यानचंद खेलरत्न'ची घोषणा, मनु भाकर-डी गुकेशसह कोणाचा सन्मान?
'मेजर ध्यानचंद खेलरत्न'ची घोषणा, मनु भाकर-डी गुकेशसह कोणाचा सन्मान?.
'आमच्याकडे आता गर्दी, आमच्यासोबत या असं आम्ही साळवींना म्हटलो नाही'
'आमच्याकडे आता गर्दी, आमच्यासोबत या असं आम्ही साळवींना म्हटलो नाही'.
'दादांच्या ताफ्यात वाल्मिक कराडची गाडी..' बीडच्या खासदाराचा गौप्यस्फोट
'दादांच्या ताफ्यात वाल्मिक कराडची गाडी..' बीडच्या खासदाराचा गौप्यस्फोट.
अंत्यविधीची तयारी सुरू अन् 'तो' जिवंत झाला; सिनेमात शोभेल अशी घटना
अंत्यविधीची तयारी सुरू अन् 'तो' जिवंत झाला; सिनेमात शोभेल अशी घटना.
ठाकरे गटाचे राजन साळवी भाजपच्या वाटेवर? होणाऱ्या चर्चांवर म्हणाले...
ठाकरे गटाचे राजन साळवी भाजपच्या वाटेवर? होणाऱ्या चर्चांवर म्हणाले....