पोलीस सहकाऱ्याच्या मुलाला रक्ताची गरज, मदतीला धावणाऱ्या कर्मचाऱ्यांचं थेट गृहमंत्र्यांकडून कौतुक
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून आपण केलेली ही मदत कौतुकास्पद आहे. आपण सर्वांनी प्रत्यक्ष कृतीतून समाजापुढे एक आदर्श ठेवला असल्याचे देशमुख यांनी म्हटले.anil deshmukh appreciate four police constable for blood donation
नवी मुंबई: येथील पोलीस मुख्यालयातील पोलीस हवालदार प्रमोद राऊत यांच्या मुलासाठी अपोलो हॉस्पिटल येथे रक्ताची गरज आहे. ही माहिती मिळताच नवी मुंबई शीघ्र कृती दलाचे कमांडो पोलीस शिपाई राठोड, मोरे, चौधरी, सोमासे, किर्वे यांनी तात्काळ अपोलो हॉस्पिटल सीबीडी बेलापूर येथे जाऊन रक्तदान केले. संवेदनशीलता दाखवणाऱ्या या पोलीस कर्मचाऱ्यांचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कौतुक केले आहे.(anil deshmukh appreciate four police constable for blood donation )
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून आपण केलेली ही मदत कौतुकास्पद आहे. आपण सर्वांनी प्रत्यक्ष कृतीतून समाजापुढे एक आदर्श ठेवला असल्याचे देशमुख यांनी म्हटले. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलिसांचे ट्विटरवरुन कौतुक केलेय. त्यांनी याबाबत एक ट्विट केलेय.
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलीस शिपाई राठोड, मोरे, चौधरी, सोमासे, किर्वे आपण केलेली ही मदत कौतुकास्पद आहे. आपण सर्वांनी प्रत्यक्ष कृतीतून समाजापुढे एक आदर्श ठेवला आहे. https://t.co/f3mp6zc8i4
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) September 28, 2020
लॉकडाऊनमध्ये 100 नंबरवर 1 लाख 13 हजार फोन पोलीस विभागाचा 100 नंबर हा सर्व जिल्ह्यात 24 तास सुरु होता. लॉकडाऊनच्या काळात 100 क्रमांकावर या फोनवर 1,13,335 फोन आले, त्या सर्वांची योग्य ती दखल घेण्यात आली. या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या 1347 वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले. तर 96,430 वाहने जप्त करण्यात आल्याची माहिती गृहमंत्र्यांनी दिली.
पोलीस कोरोना कक्ष कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात राज्यातील 220 पोलीस व 25 अधिकारी अशा एकूण २४५ पोलिसांचा मृत्यू झाला. पोलिसांना जर कोरोना संदर्भातील काही लक्षणे दिसून आली तर त्यांच्यावर तातडीने उपचार व्हावेत, याकरिता राज्यात सर्वत्र नियंत्रण कक्ष स्थापन केले असल्याची माहिती, देशमुख यांनी दिली.
संबंधित बातम्या:
गुप्तेश्वर पांडे DGP होते, मात्र भाजप नेत्यासारखे बोलायचे, अनिल देशमुखांचा हल्लाबोल
Anil Deshmukh | CBI च्या निष्कर्षाची वाट पाहतोय, गृहमंत्री अनिल देशमुखांचा टोला
(anil deshmukh appreciate four police constable for blood donation )