भाजप आमदार जयकुमार रावल यांच्याविरोधात ईडीकडे लेखी तक्रार; अनिल गोटे स्वत: ईडी कार्यालयात आले

भाजपचे आमदार आणि माजी पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे माजी आमदार अनिल गोटे यांनी ईडीकडे तक्रार केली आहे. अनिल गोटे यांनी ईडीकडे रावल यांच्या विरोधात लेखी तक्रार केली आहे.

भाजप आमदार जयकुमार रावल यांच्याविरोधात ईडीकडे लेखी तक्रार; अनिल गोटे स्वत: ईडी कार्यालयात आले
भाजप आमदार जयकुमार रावल यांच्याविरोधात ईडीकडे लेखी तक्रार; अनिल गोटे स्वत: ईडी कार्यालयात आलेImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 08, 2022 | 2:46 PM

मुंबई: भाजपचे आमदार आणि माजी पर्यटन मंत्री जयकुमार रावल (jaykumar rawal) यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे माजी आमदार अनिल गोटे (anil gote) यांनी ईडीकडे तक्रार केली आहे. अनिल गोटे यांनी ईडीकडे रावल यांच्या विरोधात लेखी तक्रार केली आहे. जयकुमार रावल पर्यटन मंत्री असताना पर्यटन विभागाने मुंबई फेस्टिव्हलचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाचे एक वर्षाचे टेंडर होते. ते वाढवून पाच वर्षाचे करण्यात आले होते. तसेच काही अधिकाऱ्यांना पर्यटन विभागातही आणले होते. या टेंडरमध्ये भ्रष्टाचार झाला आहे. त्याचीच तक्रार मी ईडीकडे केलीय, असं अनिल गोटे याांनी सांगितलं. तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांना भ्रष्टाचाराविरुद्ध बोलण्याचा अधिकार नाही. फडणवीसांनी भ्रष्टाचाऱ्यांना पाठिशी घातले आहे, असा आरोपही गोटे यांनी केला आहे. गोटे यांनी ईडीकडे जयकुमार रावल यांची लेखी तक्रार केल्याने आता ईडी त्यावर काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी इकबाल मिर्चीशी संबंधित कंपनीकडून भाजपने देणगी घेतला असल्याचा आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी या पूर्वी केला आहे. मागील आठवड्यात अनिल गोटे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. मात्र त्या तक्रारीवर अद्यापही तिकडून कुठलेही उत्तर देण्यात आले नसल्याने आता संबंधित प्रकरणाची तक्रार मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्याकडे उद्या करणार असल्याचे गोटे यांनी सांगितले. देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्याच्या विरोधात दर आठवड्याला एक तक्रार करून मंत्र्यांचे भ्रष्टाचार उघड करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

कोण आहेत रावल?

राज्याचे माजी पर्यटन मंत्री जयकुमार रावल हे तब्बल चार वेळा निवडून आलेले आहेत. नगरसेवक ते कॅबिनेट मंत्रीपदापर्यंत त्यांनी मजल मारली आहे. धुळे जिल्ह्यातील बडं प्रस्थ म्हणून ते प्रसिद्ध आहेत. रावल हे 8-शिंदखेडा, जिल्हा-धुळे या मतदार संघातून चारवेळा विधानसभेवर निवडून आले आहेत. त्यांचे शिक्षण पंचगणी, मुंबई, पुणे आणि यु.के.मधील कार्डीफ युनिर्व्हसिटीमध्ये झालेले आहे. ते यु.के. मधील कार्डीफ विद्यापीठातून विजयी होणारे ब्रिटीशोत्तर पहिले विद्यार्थी आहेत. रावल यांचे आजोबा सहकारमहर्षी दादासाहेब रावल व काका वृक्षमित्र बापूसाहेब रावल हे देखील आमदार होते. याशिवाय त्यांना ऐतिहासिक वारसा देखील लाभला असून ते खान्देशातील राऊळ या संस्थानिक कुटुंबातून येतात.

त्यांनी भाजयुमोचे राष्ट्रीय महामंत्री म्हणून काम पाहिलं आहे. धुळे जिल्हा भाजपाचे जिल्हाध्यक्ष पद देखील त्यांनी यापूर्वी भूषविले आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष असताना त्यांच्या कार्यकारिणीतही आमदार रावल महामंत्री होते. त्यांच्याकडे कर्नाटक आणि राजस्थान या दोन राज्यांची जबाबदारी होती.

संबंधित बातम्या:

राज्यात लवकरच सर्वसमावेशक महिला धोरण आणणार, मुंबईतील कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं आश्वासन

Maharashtra News Live Update : सोलापूर जिल्हा दूध संघाच्या अध्यक्षपदी रणजितसिंह शिंदे

‘…तर सरकारी नोकरी गेलीच म्हणून समज’, असं काय म्हणाला नवरदेव म्हणून लोक संतापले? Video viral

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.