फरार अनिल जयसिंघानी याची Tv9 मराठीला प्रतिक्रिया, पाहा नेमकं काय म्हणाला?

अमृता फडणवीसांना ब्लॅकमेलिंग केल्याच्या प्रकरणात अनिक्षा जयसिघांनीची रवानगी कोठडीत झाली. तर फरार अनिल जयसिंघानीनं 'Tv9 मराठी'कडे प्रतिक्रिया दिलीय. खोट्या केसेसमध्ये मुलीला अडकवल्याचं जयसिंघानीनं म्हटलंय.

फरार अनिल जयसिंघानी याची Tv9 मराठीला प्रतिक्रिया, पाहा नेमकं काय म्हणाला?
Follow us
| Updated on: Mar 18, 2023 | 11:53 PM

मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीसांना (Amruta Fadnavis) ब्लॅकमेलिंग प्रकरणात फरार बुकी अनिल जयसिंघानीची मुलगी अनिक्षा पोलीस कोठडीत आहे. तर फरार बुकी अनिल जयसिंघानीनं tv9 मराठीला प्रतिक्रिया दिलीय. आपल्या मुलीवर खोट्या केसेस दाखल केल्या असून मुलगी बाहेर आल्यावर दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल, असं अनिल जयसिंघानीनं म्हटलंय. अनिल जयसिंघानीवर जवळपास 15 गुन्हे दाखल आहेत. तो सध्या फरार आहे. तसेच तब्येत खराब असल्याचंही तो सांगतोय.

इकडे अनिल जयसिंघानीवरुन, राजकीय वातावरण तापलंय. फरार बुकी अनिल जयसिंघानीचे उद्धव ठाकरेंसोबतचे फोटो समोर आलेत. 2014मध्ये उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत अनिल जयसिंघानीनं शिवसेनेत प्रवेश केल्याचा दावा करण्यात येतोय. यावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही प्रतिक्रिया दिलीय. जयसिंघानी महाविकास आघाडीतल्या सर्वच पक्षात फिरलाय. सखोल चौकशी होणार, असं शिंदेंनी म्हटलंय.

उद्धव ठाकरेंसोबतच्या फोटोवरुन, मुख्यमंत्री शिंदेंनी टीकास्त्र सोडलं. त्यानंतर ठाकरे गटाच्या सुषमा अंधारेंनी शिंदेंचीच चौकशीची मागणी केलीय. शिंदेंमुळंच अनिल जयसिंघानी मातोश्रीवर आले असावेत, असं अंधारे म्हणाल्यात. अनिल जयसिंघानीसोबत उद्धव ठाकरेंचे फोटो समोर आल्यानंतर, ट्विटवर फोटो वॉर सुरु झाला. सुषमा अंधारेंनी दानिश हिंगोरासोबत अमृता फडणवीसांचा फोटो ट्विट केला. दानिश हिंगोरा हा 1993च्या बॉम्बस्फोटातील दोषी समीर हिंगोराचा मुलगा आहे.

हे सुद्धा वाचा

हा फोटो ट्विट करताना, सुषमा अंधारेंनी म्हटलंय की, “कुणाचाही कुणासोबतचा फोटो दाखवून चर्चित चर्वण करणाऱ्या आणि स्क्रिप्टेट स्टोरीवर काम करणाऱ्या भक्तगणांनी हा फोटो नीट बघून घ्यावा. आणि आपल्या सावकाशीने प्रतिक्रिया द्याव्यात.”

ठाकरे गट आणि भाजप यांच्यात ट्विटरवॉर

सुषमा अंधारेंनी दानिश हिंगोराचा अमृता फडणवीसांसोबतचा फोटो ट्विट केल्यानंतर. भाजपच्या चित्रा वाघांनीही ट्विटर वरुनच पलटवार केला. दानिश हिंगोरासोबतचा आदित्य ठाकरेंचा फोटो चित्रा वाघ यांनी ट्विट केला. हा फोटो ट्विट करताना चित्रा वाघ यांनी म्हटलंय की, हे पण बघा सुषमाताई. सावकाश प्रतिक्रिया दिली तरी चालेल.

फरार बुकी अनिल जयसिंघानीवरील गुन्हे मागे घेण्यासाठी, त्याची मुलगी अनिक्षानं अमृता फडणवीसांना आधी लाच देण्याचा प्रयत्न केल्याचा आणि नंतर ब्लॅकमेलिंग केल्याचं फडणवीसांनी सभागृहात सांगितलं. पण आता हे प्रकरण बॉम्बस्फोटातील दोषींच्या मुलांसोबतच्या फोटोपर्यंत आलंय.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.