सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर पगाराची जबाबदारी घेणार का? एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर हजर व्हावं, अनिल परब यांचं आवाहन

भडकवणारे नेते आपल्याला पगार देणार नाहीत, त्यामुळं कामगारांनी कामावर हजर व्हावं, असं आवाहन अनिल परब यांनी केलं आहे. गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी कामगारांच्या पगाराची जबाबदारी घेणार आहे का?, असा सवाल अनिल परब यांनी केलाय.

सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर पगाराची जबाबदारी घेणार का?  एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर हजर व्हावं, अनिल परब यांचं आवाहन
अनिल परब, एसटी बसेस
Follow us
| Updated on: Nov 10, 2021 | 1:05 PM

मुंबई: परिवहन मंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेत एसटी कर्मचाऱ्यांना कामावर हजर होण्याचं आवाहन केलं. भाजप नेते संपाला भडकवण्याचा प्रयत्न करत आहेत, असं अनिल परब म्हणाले. सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराची जबाबदारी घेणार आहेत का असा सवाल परब यांनी केला.

कामगारांना देखील उच्च न्यायालयाचा आदेश लागू

मुंबई उच्च न्यायालयानं एक समिती स्थापन केलेली आहे. त्या समितीत तीन अधिकारी आहेत. समितीनं 12 आठवड्यात अहवाल द्यावा, असा आदेश दिला आहे. उच्च न्यायालयाचा आदेश आम्हाला लागू होतो, तसाच आदेश कामगारांना लागू होतो. उच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशाचं आम्ही पालन केलेलं आहे. कामगारांना आवाहन करतो की तुम्हाला काही लोक भडकावतं असेल तर त्याला बळी पडू नका. त्या नेत्यांचं नुकसान होत नाही. प्रशासनाची बाब म्हणून कारवाई झालेली आहे. आमची कुणावर कारवाई करण्याची इच्छा नाही, असं अनिल परब म्हणाले.

सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर पगाराची जबाबदारी घेणार का

विलिनीकरणाची मागणी 1-2 दिवसांत पूर्ण होण्यासारखी नाही. यासाठी उच्च न्यायालयाने आदेश दिलेत. महामंडळानं एसटी कर्मचाऱ्यांविरोधात अवमान याचिका दाखल केली आहे. एस टी कामगारांना माझी विनंती आहे की कुणाच्याही भाषणबाजीला बळी पडू नका. नुकसान होऊ देऊ नका, कारण भडकवणारे नेते आपल्याला पगार देणार नाहीत, त्यामुळं कामगारांनी कामावर हजर व्हावं, असं आवाहन अनिल परब यांनी केलं आहे. गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी कामगारांच्या पगाराची जबाबदारी घेणार आहे का?, असा सवाल अनिल परब यांनी केलाय.

न्यायालयानं संप बेकायदेशीर ठरवला

एस टी कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू व्हावं, सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार नो पे नो वर्क करावं लागेल. कामगारानं कामावर यावं अन्यथा नाहीतर पगार कापले जातील. कामगारांचं संपात मोठं नुकसान होईल. न्यायालयाने हा संप बेकायदेशीर ठरवलाय, असं अनिल परब म्हणाले.

भाजप संपाला खतपाणी घालतंय

संप सुरू राहिल्यास कामगारांची अडचण वाढेल. विलिनीकरणाची मागणी एक दोन दिवसांत होणार नाही. सरकार कुठेही कमी पडलेले नाही. कोर्टाला आम्ही लेखी दिले आहे. हा मुद्दा राजकीय पक्षांनी लावून धरलेला आहे. भाजप संपाला खतपाणी घालतंय. कामगारांनी त्यांच्या भूलथापांना बळी पडू नये, असं अनिल परब म्हणाले. निलंबनाची कारवाई वाट पाहूनच केली. घाईत केलेली नाही. कामगारांनी कमिटीसमोर म्हणणं मांडावं, असं आवाहन अनिल परब यांनी केलं आहे. सर्व खासगी बसचालकांना स्टेज कॅरिजची परवानगी दिलीय, असं अनिल परब म्हणाले.

संपकरी कर्मचाऱ्यांच्या सुरुवातीच्या मागण्या मान्य केल्या आहेत. सुरुवातीला विलनीकरणाची मागणी माझ्यासमोर नव्हती. मी एसटी कर्मचाऱ्यांशी संवाद साधतोय. एसटी कर्मचाऱ्यांच्यावर गडबडीत कोणतीही कारवाई केलेली नाही. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर आमच्याकडे आले होते त्यावेळी कारवाई करणार नसल्याचं म्हटलं होतं. त्यावेळी 35 डेपोमध्ये आंदोलन सुरु होतं. मात्र, दिवाळीत प्रवाशांना त्रास होणार असेल तर प्रशासक म्हणून कारवाई करावी लागली, असं अनिल परब म्हणाले.

इतर बातम्या:

रियाझ भाटीचं सचिन वाझे प्रकरणात नाव, राष्ट्रवादी काँग्रेसनं त्याला लपवलंय का? आशिष शेलार यांचा सवाल

माझ्यावरील गुन्हे राजकीय, भाजपचे मुन्ना यादव यांचे स्पष्टीकरण

Anil Parab ask question to Gopichand Padalkar and Sadabhau Khot over ST Strike and appeal to ST Workers to join duty

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.