अनिल परब यांचा मुरजी पटेलांवर घणाघात, म्हणाले, एवढा पैसा कुठून आला?
मुरजी पटेल यांच्याकडं एवढा पैसा आला कुठून.
मुंबई : उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी मंत्री अनिल परब म्हणाले, महाविकास आघाडी पहिल्यांदा मुंबईत निवडणुकीला सामोरे जात आहे. आपलं सगळे एकमेकांच्या विरोधात लढलो. पण आत्ता या निवडणुकीत आपल्याला हातात हात घालून निवडणूक लढवायची आहे. रमेश लटके यांची पोकळी भरून करण्याचं काम करायचं आहे. या निवडणुकीवर सगळ्या महाराष्ट्राच लक्ष लागलं आहे.
एखाद्या आमदाराचा मृत्यू झाला तर त्यांच्या घराच्या लोकांना उमेदवारी दिली जाते. पण ही निवडणूक बिनविरोध केली जातं ही महाराष्ट्रची संस्कृती आहे. पण भाजपकडून आता ही संस्कृती बदलली गेली आहे. उमेदवार दिला गेला आहे.
आमच्या उमेदवाराला त्रास देण्याचं काम करण्याच काम विरोधकांकडून करण्यात आलं आहे. आम्ही गिरीजा गिरकर यांच्या मृत्यूनंतर आम्ही त्याच्या पश्चात होणाऱ्या निवडणुकीत शिवसेनेने आपला उमेदवार दिला नव्हता. हा मोठेपणा आमच्या पक्षप्रमुखांचा होता, असं अनिल परब यांनी सांगितलं.
सहानुभूती आहे. पण कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली पाहिजे. जेव्हा घरात प्यायला पाणी नाही, पण गावात पूर आला नाही आहे. मग त्या पुराच्या पाण्याचा उपयोग काय? असा प्रश्न त्यांनी विचारला.
म्हणून कार्यकर्त्यांना बूस्टर डोस देऊन तुम्हाला काम करायचं आहे. रमेश लटके यांनी जे काम केलं आहे ते आपलं यूएसपी आहे. ऋतुजा लटके यांना आमदार बनवणं हे रमेश लटके याचं स्वप्न असेल.
मुरजी पटेल यांना का निवडून द्यायचं नाही? मुरजी पटेल यांच्याकडं एवढा पैसा आला कुठून. या माणसावर पालिका निवडणूक लढवू नये म्हणून कोर्टाने सांगितलं आहे. यानं आपलं जात पडताळणी प्रमाणपत्र खोटं बनवलं आहे, असा आरोपही परब यांनी लावला.
कागदपत्रं खोटे बनवले आहेत. हे सगळ्या जनतेला कळलं पाहिजे. अंधेरीची पोटनिवडणूक ही 2024 ची हवा ठरवेल. आपला मुख्यमंत्री बसवायचा आहे, असंही ते म्हणाले.