लोकसभा निवडणुकीत भाजपने खूप दादागिरी केली, पण शिंदेंनी…; ‘त्या’ विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ

Anil Thatte on BJP Shivsena Mahayuti Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या निकाला आधी एक वक्तव्य समोर आलं आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. महायुतीतील घटत पक्ष भाजप आणि शिवसेनेच्या बद्दल हे वक्तव्य करण्याक आलं आहे. वाचा सविस्तर......

लोकसभा निवडणुकीत भाजपने खूप दादागिरी केली, पण शिंदेंनी...; 'त्या' विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ
Follow us
| Updated on: Jun 01, 2024 | 3:13 PM

भारतीय जनता पार्टीने लोकसभेत खूप दादागिरी केली. मात्र एकनाथ शिंदे हे देखील भाई आहेत. त्यांनीही भाईगिरी केली. दादागिरी वर्सेस भाईगिरीमध्ये भाईगिरी यशस्वी ठरली आहे. एकनाथ शिंदेनी 15 जागा घेतल्या. कीर्तीकर विरुद्ध रवींद्र वायकर यामिनी जाधव यांची जागा शिंदेंसाठी आवघड होईल. शिंदेंच्या 15 पैकी पाच पडतील आणि दहा जागा निवडून येणार हा अंदाज आहे. नरेश मस्के यांचे गुडविल कमी आहे. त्यांची नुकसान भरपाई ही एकनाथ शिंदे यांच्या पुण्याईमुळे होणार आहे, असं राजकीय विश्लेषक अनिल थत्ते यांनी म्हटलं आहे. टीव्ही 9 मराठीशी बोलताना त्यांनी हे विधान केलं. त्यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

आनंद दिघे यांचं नाव घेत म्हणाले…

राजन विचारे यांच्याबद्दल निगेटिव्ह पॉझिटिव्हिटी नाही. एकनाथ शिंदे यांची ठाणे ही राजधानी आहे. त्यामुळे इकडे ते मस्के यांना कसेही निवडून येणार आहेत. निवडणुकीत आनंद दिघे हा फॅक्टर नाही. मोदी एकनाथ शिंदे त्याचबरोबर राजन विचारे बोल नरेश मस्के यांची तुलना हाच फॅक्टर आहे. आनंद दिघे यांचे पोस्टर पुरते अस्तित्व आहे. दिघे यांना जाऊन वीस वर्षे झाली. आता एकनाथ शिंदे वर्सेस उद्धव ठाकरे अशी ही लढाई आहे, असंही अनिल थत्ते म्हणाले.

उद्धव ठाकरे मुंबईचे आणि एकनाथ शिंदे ठाण्याचे याचा या निवडणुकीत फरक ठाण्यात पडेल. श्रीकांतचे नशीब चांगलं की वैशाली दरेकर तिकडे आली दुसरा उमेदवार असता तर त्या ठिकाणी निवडणूक टफ फाईट झाली असती. वैशाली दरेकर मनसेतून आलेली मनसेवाले गद्दार समजतात. त्यामुळे त्यांना पाडण्याकरिता मनसे श्रीकांत शिंदे यांच्यासोबत आहेत. दुसऱ्या पक्षातून आल्यानंतर लगेच तिकीट दिलं. त्यामुळे अंतर्गत नाराजगी असल्याने कल्याण लोकसभेत उद्धव ठाकरेंची सहानुभूती दरेकर यांना मिळणार नाही, असं वक्तव्य अनिल थत्ते यांनी केलं आहे.

कल्याणच्या जागेवरून मोठं विधान

कल्याणमध्ये श्रीकांतला मोठं मतं अधिक्य मिळण्यासाठी वैशाली दरेकर यांना देऊन जागेची ॲडजस्टमेंट केलेली वाटत आहे. दरेकर यांची निवड संजय राऊत यांनी केली. संजय राऊत माझा मित्र… संजय राऊत यांच्या मनात एकनाथ शिंदेंसाठी सॉफ्ट कॉर्नर आहे. दरेकरांना उमेदवारी ही संजयने प्लॅन केलेली गोष्ट आहे. यासाठी एकनाथ शिंदे त्यांना मदत करतील. कदाचित संजय राऊत जेलमध्ये जाणार नाहीत, असंही अनिल थत्ते यांनी म्हटलं आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.