भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादीला वगळून विधानसभा निवडणुक लढणार, पाहा कोणी केला दावा?

लोकसभा निवडणुकीआधी राज्यातील राजकीय समीकरणे बदलताना दिसतील. लोकसभा निवडणुकीआधी महायुती एकत्र आली खरी पण मविआने महाराष्ट्रात मैदान मारलं. आता विधाानसभा निवडणुकीआधी पुन्हा काही राजकीय बदल होणार असल्याची चर्चा आहे. अशातच भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादीला वगळत निवडणूक लढवणार असल्याचा दावा केला गेला आहे.

भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादीला वगळून विधानसभा निवडणुक लढणार, पाहा कोणी केला दावा?
Follow us
| Updated on: Jun 10, 2024 | 6:11 PM

लोकसभा निवडणुका पार पडल्या असून आता विधानसभा निवडणुकीच्या तयारीला राज्यातील सर्व पक्ष लागले आहेत. महाविकास आघाडी असो किंवा महायुतीमधील पक्ष एकमेकांना किती जागा सोडतात हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पक्षफुटीनंतर पहिल्या वर्धापनदिनादिवशी भाषणात राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी शिदेंना जितक्या जागा येतील तेवढ्याच आम्हाला मिळाव्यात अशी मागणी केली आहे. तर रविवारी नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची तिसऱ्यांदा शपध घेतली. मोदींच्या तिसऱ्या मंत्रिमंडळात एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना एक-एक राज्यमंत्रीपदाची ऑफर केली होती. शिंदे यांनी हे स्वीकारलं पण अजित पवारांनी नकार दिला. याचाच धागा पकडत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी थेट भाजपसह अजित पवारांवर निशाणा साधला आहे.

नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे अतिशय धूर्त आहेत. त्यांनी जी माणसं हवी त्यांना कॅबिनेट मंत्रीपद दिलीत. शिवसेना पक्ष असो की अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असो आता त्यांना विधानसभा निवडणुकीत ते नको. त्यांना काढण्यासाठी त्यांच्याकडे एकच मार्ग होता की त्यांना राज्यमंत्री पद द्यायचं मग ते मान्य करणार नाह आणि कुठेतरी तर चिडचिडी होईल. शिंदेंनी स्वीकार तरी केला पण अजित पवारांनी ते घेतलं नाही. आम्ही पुढे थांबायला तयार आहोत अतिशय विचित्र स्टेटमेंट त्यांनी केल्याचं अंजली दमानिया म्हणाल्या.

अजित पवार यांची किती दयनीय स्थिती झाली आहे. आता राजकारणात ना घर के ना घाटके असे स्थिती भाजपने त्यांच्यावर आणून ठेवलेली आहे. येत्या विधानसभेत अजित पवारांचं भवितव्य शून्य आहे. त्यांचे लोक सध्या सोडून जातील अशी ही चर्चा आहे. काल फडणवीस म्हणाले आमचे काही निकष ठरलेलं होते. चिराग पासवान असो कुमारस्वामी असो चिराग पासवान यांचे पाच खासदार होते, कुमार स्वामींचे तीन होते. तरी सात खासदार असणाऱ्या ऑफर केलं नाही. अजित पवारांची आताची स्थिती त्रिशंकू सारखे झालेली आहे. काका मला वाचवा असं ते परत शरद पवार कडे जाऊ शकतात पण ते घेतील की नाही शरद पवार आणि परमेश्वर जाणे, असं दमानिया यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या लोकसभेमध्ये सात जागा आल्या आहेत. तर अजित पवार यांची एक जागा आली. एनडीए सरकारच्या केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये दोघांनाही एक-एक राज्यमंत्रीपद देण्याची ऑफर केली गेली होती. यामधील शिंदे यांनी ती ऑफर मान्य केली परंतु अजित पवारांंनी आम्ही थांबतो, असं म्हटलं आहे. त्यामुळे विधानसभेपर्यंत राजकीय गणित बदलताना दिसण्याची शक्यता आहे.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.