अविनाश माने, प्रतिनिधी, मुंबई : ना घर के ना घाट के अशी परिस्थिती विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांची झाली आहे. ते शांत बसतील, असं मला वाटत नाही. दिवाळीपर्यंत ते त्यांच्या आमदारांना एकत्र करतील. त्यानंतर मोठा दगाफटका करतील, यात काही शंका नाही. जो होतंय तो राजकारणाचा उकिरडा होतोय. अशी टीका अंजली दमानिया यांनी अजित पवार यांच्यावर केली.
अंजली दमानिया म्हणाल्या, मी आम आदमी पक्ष सोडला. कारण राजकीय पक्ष घोडेबाजार करतात. ते मला मान्य नाही, म्हणून मी आपमधून राजीनामा दिला. आता प्रत्येक ठिकाणी 50 खोके म्हणत आहेत. नक्की किती खोके दिले, हे आपल्याला माहीत नाही. पण हे राजकारणात दिले जातात. त्याच्यात काहीही शंका नाही.
आता पुन्हा हाच घोडेबाजार 2024 आधी होईल. अक्षरशः घमासान होईल. पण लोकांना हे कळत कसं नाही. अशा राजकारण्यांना आपण का निवडून देतो, असा सवालही अंजली दमानिया यांनी केला.
शरद पवार यांच्या ट्वीटवर बोलताना अंजली दमानिया म्हणाल्या, त्यांनी जो राजीनामा दिला काय आणि माघे घेतला काय, हे सर्व एक प्रकारचे नाटक होते. यावर बऱ्याच जणांनी मला जोक्स बनवून पाठवले. त्यामुळे मला हे सर्व जोक्स बघून गंमत वाटली. म्हणून मी हे सोशल मीडियावर शेअर केले.
शरद पवार यांनी सुप्रिया सुळे हे राष्ट्रीय पातळीवर बघतील आणि अजित पवार राज्य पातळीवर बघतील, असं त्यांना समजावलं आणि 2 मे रोजी भलतच केले. अजित पवार यांना कुठल्याही परिस्थितीत भाजपबरोबर जायचे होते. त्यासाठी त्यांनी हा सर्व प्लॅन रचला होता. पण तोंडघशी ते पडल्यासारखे झाले. आता राजकारणाचा असा उकिरडा केला आहे असे मला वाटते, असं मत अंजली दमानिया यांनी व्यक्त केले.
शरद पवार हे त्यांच्या बोलण्यावर ठाम राहिले असते तर सगळ्यांना आनंद झाला असता. त्यांनी एकदा राजीनामा दिला तर त्याच्यावर ठाम राहा आणि नवीन नेतृत्वाला आणा. पण ते शरद पवार आहेत. ते शेवटपर्यंत सत्ताही सोडणार नाही. शेवटपर्यंत पदही सोडणार नाही, अशी टीका अंजली दमानिया यांनी केली.
अजित पवार कामं भरपूर करतात आणि त्याच्यात भ्रष्टाचार किती करतात. याच्या विरुद्ध मी मोठ्या प्रमाणावर लढले आहे. अजित पवार यांची परिस्थिती आता ना घरका ना घाट का अशी त्यांची झाली आहे मला नाही वाटत ते शांत बसतील.
येत्या काही दिवसात काही महिन्यात ते दिवाळीपर्यंत ते त्यांच्या आमदारांना एकत्र करून मोठा काहीतरी दगा फटका करतील, यांच्यात काही शंका नाही, अशी शक्यता अंजली दमानिया यांनी व्यक्त केली.