अकरावीसाठी पहिल्या यादीत 2 लाख 47 हजार विद्यार्थ्यांचे अर्ज; नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्रासाठी दिली मुदत वाढ
अकरावीला 3 लाख 8 हजार 72 विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यापैकी 2 लाख 47 हजार 907 विद्यार्थ्यांनी पसंती क्रमांक भरले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी बुधवारी जाहीर होणार आहे तर कोट्यातून 14,1066 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित केल्याचे दिसून येत आहे. पहिल्या यादीत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना तीन प्रवेशाची संधी मिळणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.
मुंबईः अकरावीची पहिली यादी (First list of the eleventh) येत्या बुधवारी जाहीर होणार आहे, या यादीसाठी 2 लाख 47 हजार 907 विद्यार्थ्यांनी आपले पसंतीक्रम भरलेले आहेत. आतापर्यंत अकरावीसाठी 3 लाख 8 हजार 72 विद्यार्थ्यांनी मुंबई एमएमआर विभागात (Mumbai MMR Section) अर्ज केले आहेत. अरावीची नोंदणी राज्य मंडळाचा दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर सुरु झाली. गेल्या आठवड्यात केंद्रीय मंडळाचे निकाल जाहीर झाल्यानंतर अर्ज मोठ्या संख्येने दाखल झाले. शुक्रवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपणार होती, ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज नोंदणीचा पहिला भाग भरला होता मात्र पसंती क्रमांक (Choice No.) दिले नव्हते अशा विद्यार्थ्यांसाठी दोन दिवसांची मुदत वाढ दिली होती.
या मुदतवाढ शनिवारी संपल्यानंतर पसंतीक्रम भरून प्रवेशासाठी दिलेल्या संधीचा फायदा सुमारे 2000 हून अधिक विद्यार्थ्यांना मिळाला आहे. सर्व विद्यार्थ्यांची यादी 3 ऑगस्टला जाहीर होणार आहे.
एवढे भरले पसंती क्रमांक
अकरावीला 3 लाख 8 हजार 72 विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यापैकी 2 लाख 47 हजार 907 विद्यार्थ्यांनी पसंती क्रमांक भरले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी बुधवारी जाहीर होणार आहे तर कोट्यातून 14,1066 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित केल्याचे दिसून येत आहे. पहिल्या यादीत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना तीन प्रवेशाची संधी मिळणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.
नॉन क्रिमिलियरसाठी मुदत तीन महिने
अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र नॉन क्रिमिलियर एनसीएल काही तांत्रिक बाबीमुळे विद्यार्थी सादर करून न शकल्यास अशा विद्यार्थ्यांकडून हमीपत्र घरून भरून घेण्यात येत आहे तसेच विद्यार्थ्यांना एनसीएल प्रमाणपत्र सादर करण्यासाठी तीन महिन्यांचे मुदत देण्यात यावी असे आदेश शालेय शिक्षण विभागाने दिले आहेत.
अकरावी प्रवेशाचा मार्ग मोकळा
एनसीएल प्रमाणपत्र मिळून शकलेल्या विद्यार्थ्यांचा अकरावी प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे अकरावी प्रवेशासाठी उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र उपलब्ध असल्यास विद्यार्थी ही प्रमाणपत्र अपलोड करू शकतील अर्ज भरतेवेळी हे प्रमाणपत्र अपलोड करणे बंधनकारक करण्यात येऊ नये हमीपत्र घेऊन त्यांना या प्रमाणपत्र सादर करण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी द्यावा असे हे म्हटले आहे.