मुंबई: रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून आजही दिलासा देण्यात आलेला नाही. न्यायमूर्ती एस. एस. शिंदे यांनी अर्णव गोस्वामी यांच्या याचिकेवर उद्या 12 वाजता पुन्हा सुनावणी होईल, असा आदेश दिला. आज झालेल्या सुनावणी अॅड. हरीश साळवे यांनी जोरदार युक्तिवाद केला. मात्र, न्यायमूर्तीं शिंदे यांनी दुसऱ्या बाजूंचं म्हणनं ऐकून घ्यायचं आहे. ते आज शक्य होणार नसल्याचं सागंत उद्या 12 वाजता पुन्हा सुनावणी घेण्याचा आदेश दिला. (Arnab Goswami case at Mumbai High Court live update)
न्यायालयात आज काय घडलं?
अॅड. देवदत्त कामत: मुंबई पोलीस आयुक्तांच्यावतीने जेष्ट वकील देवदत्त कामत यांच्याकडून युक्तिवाद सुरु, परमबीर सिंग यांचा व्यक्तिगतरित्या यांचा याचिकेत समावेश करण्यात आलाय तो करु नये.
अॅड.हरीश साळवे यांचा देवदत्त कामत यांच्या युक्तिवादावर आक्षेप
अॅड. हरीश साळवे : “मी याचिकाकर्ता आहे, याचिकाकर्त्यानं युक्तिवाद करण्यापूर्वी तुम्ही कसे युक्तिवाद करत आहात?
अॅड. देवदत्त कामत : मी न्यायालयाची परवानगी घेतलीय, मिस्टर साळवे, तुम्ही व्यत्यय आणू नका.
अॅड. हरीश साळवे : मी व्यत्यय आणणार.
अॅड. देवदत्त कामत : मी मुंबई पोलीस आयुक्तांच्यावतीनं युक्तिवाद करतोय. याचिका रायगड पोलिसांविरोधात आहे.
याचिकेतून मुंबई पोलीस आयुक्तांना वगळ्यात यावं.
अॅड. हरिश साळवे : तुमच्या आशिलांवरही आरोप केले आहेत. याचिकेतून वगळ्यात येणार नाही. अॅड. आबाद पोंडा हे सविस्तर युक्तिवाद करतील . त्यांना सर्व कार्यवाही माहीत आहे
अॅड. आबाद पोंडा यांचा युक्तिवाद सुरू त्यांनीअलिबाग कोर्टाची रिमांड कॉपी मध्ये काय म्हटलं आहे हे वाचायला सुरुवात केली.
अॅड.साळवे: रिमांड कॉपी फार महत्वाची आहे. त्यातले मुद्दे महत्वाचे आहे. अर्णव यांना कस बेकायदेशीर अटक केली आहे याचा हा महत्वाचा पुरावा आहे.
न्या शिंदे : तुम्ही ऑर्डर ला आव्हान दिलं आहे का ?
अॅड. साळवे : हो आम्ही ऑर्डर ला चॅलेंज दिल आहे.
अॅड. न्या शिंदे : आम्हला ऑर्डर ला चॅलेंज केलं असेल तर त्याच काय झालं हे आम्हला जाणून घ्यायचं आहे
अॅड. साळवे : माझे क्लाईन्ट जेलमध्ये आहेत. केवळ त्या ऑर्डर मुळे, मुख्य महानगर दंडाधिकारी यांनी केसचा पुन्हा तपास करण्याची परवानगी दिलेली नाही. मुख्य महानगर दंडाधिकारी यांनी केसचा पुन्हा तपास करण्याची परवानगी दिलेली नाही . आम्ही सेक्शन 438 नुसार पिटीशन फाईल केलं आहे. माझा आरोप आहे , केस बंद करण्यात आली होती. मात्र ,सूडबुद्धीने सुरू आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानसभेमध्ये अर्णव गोस्वामी जबाबदार असल्याचं म्हटल्यानंतर ही केस पुन्हा एकदा सुरू झाली. मयत व्यक्ती आणि अर्णव हे एकमेकांना ओळखत नव्हते. त्यांच्या संपूर्ण पणे व्यवहार झाला आहे
एफआरआय नुसार एका आरोपी कडे 4 कोटी रुपये आहेत तर अर्णव यांच्याकडे 83 लाख रुपये आहेत. तुमचा सर्व व्यवहार होता. तुम्हाला पैसे मिळले नाहीत तरी तुम्ही कोणत्याही कोर्टात त्याबाबत गेला नाहीत. उलट तुम्ही आत्महत्या केलीत. त्याला तुम्हाला पैसे देणारे कसे काय जबाबदार आहेत .
अॅड. साळवे : मृतास आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणे, याचा काही तरी उद्देश असावा लागतो. साळवे यांच्याकडून एका निकालाचा हवाला देऊन युक्तिवाद करण्यात आला. या प्रकरणात 306 कलम लावण्याची गरज नाही.
न्या. शिंदे – सरन्यायाधीश यांना अनेक अधिकार आहेत. तुम्ही जामिनासाठी अर्ज केला आहे का ?
अॅड. पोंडा – आम्ही अर्ज केला पण तो मागे घेतला आहे, त्यांनी आम्हाला वेळ दिली नाही.
अॅड. पोंडा: जर आम्हाला हा एफ आर आय रद्द करायचा असेल तर तो आम्हाला याच कोर्टात करावा लागेल. आणि त्यामुळे आम्ही ही याचिका केली आहे
न्या. शिंदे : न्यायमूर्ती खानविलकर यांच्या एका निकालाचा संदर्भ देण्यात आला.
अॅड.पोंडा – एखादा व्यक्ती जामिनासाठी डायरेक्ट हायकोर्ट येऊ शकतो, संदीप कुमार बाफना प्रकरणात हे झालं आहे.
आबाद पोंडा यांच्या युक्तिवादानंतर न्यायमूर्ती शिंदे यांनी या प्रकरणी दुसरी बाजू ऐकायची असल्याने उद्या 12 वाजता सुनावणी घेण्याचा निर्णय देण्यात आला.
[svt-event title=”अर्णव गोस्वामींना दिलासा नाहीच, मुंबई उच्च न्यायालयात उद्या पुन्हा सुनावणी” date=”06/11/2020,4:59PM” class=”svt-cd-green” ]
Arnab Goswami Case Live | अर्णव गोस्वामींना दिलासा नाहीच, मुंबई उच्च न्यायालयात उद्या पुन्हा सुनावणीhttps://t.co/Cn1Zka3hDZ
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 6, 2020
[svt-event title=”अर्णव गोस्वामींची अटक बेकायदेशीर, हरीश साळवेंचा युक्तिवाद” date=”06/11/2020,4:33PM” class=”svt-cd-green” ] हरीश साळवे यांच्याकडून उच्च न्यायालयात अर्णव गोस्वामींना जामीन देण्याची मागणी करण्यात आली आहे. न्यायदंडाधिकाऱ्यांच्या आदेशातून प्रथमदर्शनी गोस्वामींची अटक बेकायदेशीर असल्याचा हरीश साळवेंकडून युक्तीवाद सुरु [/svt-event]
[svt-event title=”हरीश साळवे यांच्याकडून विधिमंडळातील चर्चेचा संदर्भ” date=”06/11/2020,3:56PM” class=”svt-cd-green” ] हरीश साळवे यांच्याकडून अर्णव गोस्वामी यांच्या पत्रकारितेबद्दल विधिमंडळात झालेल्या चर्चेचा न्यायालयात संदर्भ, त्या चर्चेमध्ये विधिमंडळ सदस्यांमध्ये गोस्वामी यांच्याबद्दल राग दिसून येत होता. [/svt-event]
[svt-event title=” हंसा रिसर्चची टीआरपी प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी” date=”06/11/2020,3:52PM” class=”svt-cd-green” ] हंसा रिसर्चच्या वकिलांचा मुंबई पोलिसांवर आरोप, रिपब्लिक चॅनेल विरोधात जबाब देण्यासाठी हंसा रिसर्च अधिकाऱ्यांवर दबाव आणण्यात आला. आम्ही फेक टीआरपी प्रकरणात केस दाखल केली होती. आम्ही कुणाचे नाव घेतले नव्हते. [/svt-event]
[svt-event title=”हरीश साळवेंचा युक्तिवाद सुरु” date=”06/11/2020,3:47PM” class=”svt-cd-green” ] अलिबागच्या न्यायदंडाधिकाऱ्यांनी पोलिसांनी मागितलेली पोलीस कोठडी फेटाळली: हरीश साळवे [/svt-event]
[svt-event title=”टीआरपी प्रकरणातील हंसा रिसर्च यांच्या याचिकेवर सुनावणी सुरु” date=”06/11/2020,3:31PM” class=”svt-cd-green” ] मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती एस.एस. शिंदे आणि न्यायमूर्ती एम.एस.कर्णिक यांच्यासमोर टीआरपी प्रकरणातील हंसा रिसर्च यांच्या याचिकेवर सुनावणी सुरु, न्यायमूर्तींकडून युक्तिवादाला परवानगी दिल्यानंतर जेष्ट वकील सी.ए.स वैद्यनाथन यांच्याकडून युक्तिवादाला सुरुवात झाली आहे. [/svt-event]
[svt-event title=”मुंबई पोलीस आयुक्तांच्यावतीने जेष्ट वकील देवदत्त कामत यांच्याकडून युक्तिवाद सुरु” date=”06/11/2020,3:27PM” class=”svt-cd-green” ] जेष्ट वकिल देवदत्त कामत आणि जेष्ट वकिल हरिश सळवे यांच्यात खडाजंगी. [/svt-event]
अर्णव गोस्वामी यांच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी तीन वाजता सुनावणी सुरू होणार आहे. न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती एम. एस.कर्णिक यांच्या खंडपीठात ही सुनावणी होईल. आपल्याला बेकायदेशीर पणे अटक करण्यात आली आहे ,या बाबत आपली तात्काळ सुटका करावी आणि पोलिसांवर कारवाई करावी या मागणीसाठी अर्णव गोस्वामी यांनी याचिका केली आहे.
मुंबई हायकोर्टाला उद्या पासून दिवाळीची सुट्टी सुरू होत आहे. त्यामुळे कामकाजाचा आजचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे अर्णव गोस्वामी यांच्या याचिकेवर आज महत्वाचा निर्णय होण्याची श्यक्यता आहे.
रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. महाराष्ट्र विधीमंडळाने दाखल केलेल्या हक्कभंग प्रकरणी गोस्वामींना अटक न करण्याचे आदेश सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या बेंचनं दिला आहे. अर्णव गोस्वामींना दिलासा देतानाच सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र विधीमंडळ सचिवांना नोटीस बजावलं आहे. विधीमंडळाच्या सचिवांना नोटीस देत न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी कारवाई का करण्यात येऊ नये, असा प्रश्न विचारला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने हक्कभंग प्रकरणी अर्णव गोस्वामी यांनी अटकेपासून संरक्षण दिलं आहे. अर्णव गोस्वामी यांनी महाराष्ट्र विधीमंडळानं बजावलेल्या हक्कभंग नोटीसाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी अर्णव गोस्वामी यांच्या विरोधात हक्कभंग दाखल केला होता.
संबंधित बातम्या :
Arnab Goswami| हरिश साळवे म्हणाले, अर्णवला जामीन दिल्यास आभाळ कोसळेल का? कोर्टात काय काय घडलं?
Arnab Goswami Case LIVE | हरिश साळवे म्हणाले, अर्णवला जामीन दिल्यास आभाळ कोसळेल का? कोर्ट म्हणाले…..
(Arnab Goswami case at Mumbai High Court live update)