Arnab Goswami Arrest LIVE | मला मारहाण झाली, अर्णव गोस्वामींचा कोर्टात दावा

| Updated on: Nov 04, 2020 | 2:42 PM

मुंबईत पोलीस चौकशीसाठी आज त्याच्या घरी पोहोचले असता, त्याने पोलिसांशी दीड तास हुज्जत घातली.

Arnab Goswami Arrest LIVE | मला मारहाण झाली, अर्णव गोस्वामींचा कोर्टात दावा
Follow us on

मुंबई : रिपब्लिक टीव्हीच्या अर्णव गोस्वामी यांना अलिबाग पोलिसांनी अटक केली (Arnab Goswami Arrest). मुंबईत पोलीस चौकशीसाठी आज त्यांच्या घरी पोहोचले असता, त्यांनी पोलिसांशी दीड तास हुज्जत घातली. त्यामुळे अलिबाग पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर अर्णव गोस्वामींना अटक करण्यात आली (Arnab Goswami Arrest).

2018 सालात अलिबाग येथील इंटिरिअर डिझायनरने आत्महत्या केली होती, त्या प्रकरणात अर्णव गोस्वामी यांना अटक करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी या गुन्ह्याचा तपास अलिबाग पोलिसांकडून काढून रायगड जिल्हा पोलिसांच्या लोकल क्राईम ब्रांचकडे सोपवण्यात आला होता. या तपासाबाबत रायगड पोलिसांनी विशेष पथकाची स्थापना केली आहे. यापूर्वी अर्णव गोस्वामी यांची चौकशी झाली होती, पण कारवाई झाली नव्हती. कलम 306 आणि 34 अंतर्गत अन्वय गोस्वामीला अटक करण्यात आली आहे.

LIVE 

[svt-event title=”मला मारहाण झाली, अर्णव गोस्वामींचा दावा” date=”04/11/2020,2:42PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”भाजपचा ‘पोपट’ आज पिंजऱ्यात अडकला- अनिल परब” date=”04/11/2020,2:09PM” class=”svt-cd-green” ] एका मराठी महिलेचं कुंकु ज्याने पुसलं, त्याला वाचवण्याचा प्रयत्न भाजप करत आहे, असा गंभीर आरोप परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांनी केला आहे. अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणाची फाईल बंद केली होती. नाईक यांच्या सुसाईड नोटद्वारे तपास झाला नाही. अर्णव गोस्वामी हे भाजपचे कार्यकर्ते असल्याप्रमाणे गळा काढत आहे. गोस्वामीला भाजपचे नेते वाचवण्याचा प्रयत्न भाजप करत आहे का? असा सवाल अनिल परब यांनी केलाय. या खटल्याचा आणि वृत्तपत्र स्वातंत्र्याशी संबंध नाही, असा दावाही परब यांनी केला आहे. [/svt-event]

[svt-event title=”अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अलिबाग कोर्टात सुनावणी” date=”04/11/2020,1:30PM” class=”svt-cd-green” ] अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अलिबाग पोलिसांनी अर्णव गोस्वामींना अलिबाग कोर्टासमोर हजर केलं, सुनावणी सुरु, अलिबाग पोलीस अर्णवची पोलीस कोठडी मागण्याची शक्यता [/svt-event]

[svt-event date=”04/11/2020,1:18PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event date=”04/11/2020,1:13PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event date=”04/11/2020,1:13PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event date=”04/11/2020,1:12PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”याबाबत काही तरी ठोस कारवाई करा, अशी सरकारला विनंती : अक्षता नाईक” date=”04/11/2020,1:10PM” class=”svt-cd-green” ] अर्णवला अटक झाली हे खूप चांगलं झालं, त्या तिघांची नावं सुसाईड नोटमध्ये लिहिली आहेत, त्यांना यापूर्वीच अटक व्हायला हवी होती, मात्र का झाली नाही, मला माहिती नाही : अक्षता नाईक [/svt-event]

[svt-event title=”माझे वकर्स सोडून चाललेत, मी त्यांना पैसे देण्याची अनेकदा विनंती केली आहे : अक्षता नाईक” date=”04/11/2020,1:09PM” class=”svt-cd-green” ] माझे वकर्स सोडून चाललेत, मी त्यांना पैसे देण्याची अनेकदा विनंती केली आहे : अक्षता नाईक [/svt-event]

[svt-event date=”04/11/2020,1:09PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title= “जर अर्णवने पैसे दिले असते, तर आज हे सर्व झालं नसतं : अक्षता नाईक” date=”04/11/2020,1:07PM” class=”svt-cd-green” ] ८३ लाख रुपये बाकी आहेत, फिरोजकडून ४ कोटी, इतरांकडून येणं होतं, पण तेही देऊ नका असे अर्णवने सांगितलं : अक्षता नाईक [/svt-event]

[svt-event title=”रिपब्लिकने माझ्या बाबांचे 83 लाख रुपये थकवले – आज्ञा नाईक” date=”04/11/2020,1:06PM” class=”svt-cd-green” ] रिपब्लिकने माझ्या बाबांचे 83 लाख रुपये थकवले, बाबांनी ई-मेलही केले, पण ते मिळाले नाहीत – आज्ञा नाईक [/svt-event]

[svt-event title=”माझ्या पतीला पैसे मिळाले असते तर ते जिवंत असते : अक्षता नाईक” date=”04/11/2020,1:05PM” class=”svt-cd-green” ] अर्णवने सूडबुद्धीने हे सर्व केलं आहे, माझ्या पतीला पैसे मिळाले असते तर ते जिवंत असते : अक्षता नाईक [/svt-event]

[svt-event date=”04/11/2020,10:38AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”पोलीस आजपर्यंत झोपले होते का?, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा सवाल ” date=”04/11/2020,10:32AM” class=”svt-cd-green” ] राज्य सरकारने अर्नब गोस्वामी यांना केलेल्या अटकेचा निषेध, 2018 चं प्रकरण, पोलीस आजपर्यंत झोपले होते का?, राज्य सरकार विरोधात अर्नव यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे ही कारवाई, पत्रकारांनी राज्यभर याचा निषेध करायला हवा, भाजप आज राज्यभर याचा निषेध करेल [/svt-event]

[svt-event title=”अर्णव गोस्वामींच्या अटकेवरुन नितेश राणेंचा ठाकरे सरकारवर हल्ला” date=”04/11/2020,10:26AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”सरकारविरोधी प्रत्येक आवाज दडपण्याचा प्रयत्न हा लोकशाहीसाठी घातक : देवेंद्र फडणवीस” date=”04/11/2020,10:23AM” class=”svt-cd-green” ] आणीबाणी 1977 मध्ये संपुष्टात आली, पण मानसिकता कायम, आणीबाणीचे समर्थन करणारी शिवसेना आणि काँग्रेस एकत्र आल्यावर त्याच मानसिकतेचे प्रदर्शन करीत आहेत, सरकारविरोधी प्रत्येक आवाज दडपण्याचा प्रयत्न हा लोकशाहीसाठी घातक, अशा प्रत्येक दडपशाहीविरुद्ध संघर्ष करणे हाच भारताचा नारा आहे.

[svt-event title=”अर्णव गोस्वामीवर केलेली कारवाई प्रेस-पत्रकारितेवर हल्ला : प्रकाश जावडेकर” date=”04/11/2020,10:10AM” class=”svt-cd-green” ] अर्णव गोस्वामीवर केलेली कारवाई प्रेस-पत्रकारितेवर हल्ला असल्याची टीका त्यांनी केली. अर्णव गोस्वामी यांच्यावरीलर कारवाई आणीबाणीसारखी असल्याची टीका देखील जावडेकर यांनी साधला. महाराष्ट्र सरकारने केलेल्या कारवाईची निंदा करतो, असं प्रकाश जावडेकर म्हणाले. [/svt-event]

[svt-event date=”04/11/2020,10:09AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”अक्षता नाईक यांची प्रतिक्रिया” date=”04/11/2020,10:05AM” class=”svt-cd-green” ] भारत आणि दुनियेतील सर्व लोकांना विनंती करते की माझ्या आणि मुलीसोबत उभं राहा. आम्हाला न्याय मिळावा असं अक्षता नाईक म्हणाल्या. [/svt-event]

[svt-event title=”अनव्य नाईक आत्महत्या प्रकरणात तिघांवर कारवाई” date=”04/11/2020,9:56AM” class=”svt-cd-green” ] अनव्य नाईक आत्महत्या प्रकरणात तिघांवर कारवाई झाली आहे, सुसाईड नोटमध्ये अर्णव गोस्वामी 80 लाख, नितीन सरडा 40 लाख आणि फिरोज या तिघांची नाव होती, त्यामुळे या तिघांवर कारवाई केलेली आहे [/svt-event]

[svt-event date=”04/11/2020,9:55AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”पत्रकारितेसाठी हा काळा दिवस असल्याचं मला वाटत नाही – संजय राऊत” date=”04/11/2020,9:47AM” class=”svt-cd-green” ] पत्रकाराने आपल्या मर्यादा पाळाव्या, आम्ही पत्रकार आहोत, पत्रकारितेसाठी हा काळा दिवस असल्याचं मला वाटत नाही- संजय राऊत [/svt-event]

[svt-event title=”राज्यात ठाकरे सरकार आल्यापासून कुणावरही बदलाच्या भावनेतून कारवाई नाही – संजय राऊत” date=”04/11/2020,9:46AM” class=”svt-cd-green” ] पोलिसांकडे तपासादरम्यान काही पुरावे हाती लागले असतील तर पोलिस कुणावरही कारवाई करु शकतात, राज्यात ठाकरे सरकार आल्यापासून कुणावरही बदलाच्या भावनेतून कारवाई नाही, या चॅनेलने राज्य सरकारवर अनेक खोटे आरोप केले, त्यावरही कारवाई व्हावी – संजय राऊत [/svt-event]

[svt-event title=”महाराष्ट्र हे कायद्याचं राज्य, इथं सगळं कायद्यानं चालतं : संजय राऊत” date=”04/11/2020,9:44AM” class=”svt-cd-green” ] महाराष्ट्र हे कायद्याचं राज्य, इथं सगळं कायद्यानं चालतं, मुंबई, महाराष्ट्र पोलिस कुणावर अन्याय करत नाही, सूड उगवत नाही, मुंबई पोलिसांच्या कारवाईशी राज्य सरकारचा कुठलाही संबंध नाही – संजय राऊत [/svt-event]

[svt-event title=”सरकारला खडा सवाल विचारणाऱ्या संपादकाच्या हातात बेड्या, वा रे वा लोकशाही सरकार : आशिष शेलार” date=”04/11/2020,9:40AM” class=”svt-cd-green” ] एका प्रकरणात राज्य सरकारला उघडे पाडले म्हणून पत्रकार राहुल कुलकर्णीला अटक, सरकार विरोधात सोशल मिडियावर बोलणाऱ्या निवृत्त नेव्ही अधिकाऱ्यांसह सामान्य माणसाला ठेचून काढणे नित्याचेच झाले, आता सरकारला खडा सवाल विचारणाऱ्या संपादकाच्या हातात बेड्या, वा रे वा लोकशाही सरकार! : आशिष शेलार [/svt-event]

[svt-event date=”04/11/2020,9:39AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”भाजप सरकारनं हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला, किशोरी पेडणेकरांचा आरोप” date=”04/11/2020,9:31AM” class=”svt-cd-green” ] मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी भाजप आमदार राम कदम यांचा आरोप फेटाळून लावला आहे. अन्वय नाईकची आत्महत्या भाजप सरकारच्या काळात झाली. त्यांच्या पत्नीने पोलिसांत तक्रार केली. पण भाजप सरकारनं हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला, असा प्रत्यारोप किशोरी पेडणेकर यांनी केला आहे. [/svt-event]

[svt-event title=”महाराष्ट्र सरकारने पोलिसांचा दुरुपयोग करत पुकारलेली अघोषित आणीबाणी : राम कदम” date=”04/11/2020,9:27AM” class=”svt-cd-green” ] महाराष्ट्र सरकारने पोलिसांचा दुरुपयोग करत पुकारलेली अघोषित आणीबाणी आहे. गेल्या काही दिवसात ज्या प्रकारे अर्णव गोस्वामी आणि त्यांचं चॅनेल रिपब्लिक टीव्ही ने महाराष्ट्र सरकारच्या अनेक गोष्टींवर हल्ला चढवला होता, तो पालघर हत्यांकांड असो किंवा सुशांत सिंह राजपूत आत्यहत्या प्रकरणात महाराष्ट्र सरकारचा हस्तक्षेप असेल, या सर्व गोष्टी देशापासून आणि जनतेपासून लपलेल्या नाहीत, कुठेतरी बदला आणि सुडाच्या भावनेतून महाराष्ट्र सरकारने पोलिसांचा दुरुपयोग करत केलेलं अतिशय निंदनीय कृत्य आहे. सरकारला अशाप्रकारे पोलीस बळाचा वापर करता येणार नाही, कोरोनाशी दोन हात करताना आलेलं अपयश आणि सर्वच विषयांत सरकारला आलेलं अपयश ते रिपब्लिकच्या पत्रकारांनी समोर आणण्याचा प्रयत्न केला, दिखावेगिरी करत सरकारने अशा प्रकार खोटंनाटं करुन त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला हे दुर्दैवी – राम कदम [/svt-event]

[svt-event title=”तुम्ही पप्पूसारखं काम कराल तर तुम्हाला पप्पूसेनाच म्हणतील – कंगना रनौत” date=”04/11/2020,9:20AM” class=”svt-cd-green” ] स्वातंत्र्यासाठी, अधिकारांसाठी ज्या लोकांनी आवाज उठवण्याचा प्रयत्न केला आतापर्यंत असे अनेक लोक शहीद झाले आहेत. तुम्ही एक आवाज बंद कराल, तर अनेक आवाज उठतील. तुम्हाला कोणी पेंग्विन म्हटल्यावर राग का येतो? लोक तुम्हाला पप्पू सेना म्हणतात तेव्हा तुम्हाला राग येतो. तुम्ही पप्पूसारखं काम कराल तर तुम्हाला पप्पूसेनाच म्हणतील. सोनिया सेना म्हटल्यावर तुम्हाला राग येतो, परंतु तुम्ही सोनिया सेनेचे लोक आहातच – कंगना रनौत [/svt-event]

[svt-event title=”अजून किती लोकांचे गळे दाबणार आहात? – कंगना रनौत” date=”04/11/2020,9:18AM” class=”svt-cd-green” ] मला महाराष्ट्र सरकारला प्रश्न विचारायचा आहे की, आज तुम्ही अर्णव गोस्वामी यांच्या घरी जाऊन त्यांना मारलंत, त्यांना त्रास दिलात, तुम्ही अजून किती घरं तोडणार आहात, अजून किती लोकांचे गळे दाबणार आहात? तुम्ही अजून किती लोकांचा आवाज बंद कराल, सोनिया सेना किती आवाज बंद करणार आहे? परंतु हा आवाज वाढत जाणार आहे – कंगना रनौत [/svt-event]

[svt-event title=”सोनिया सेना आणखी किती गळे दाबणार : कंगना रनौत ” date=”04/11/2020,9:16AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event date=”04/11/2020,9:12AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event date=”04/11/2020,9:12AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”अर्णव गोस्वामीला आज न्यायालयासमोर हजर करणार” date=”04/11/2020,9:02AM” class=”svt-cd-green” ] 2018 सालात अलिबाग येथील इंटिरिअर डिझायनरने आत्महत्या केली होताी, या प्रकरणात अर्णव गोस्वामीला अटक, काही दिवसांपूर्वी या गुन्ह्याचा तपास अलिबाग पोलिसांकडून काढून रायगड जिल्हा पोलिसांच्या लोकल क्राईम ब्रांचकडे देण्यात आला, या तपासाबाबत रायगड पोलिसांकडून विशेष पथकाची स्थापना, यापूर्वी अर्णव गोस्वामी याची झाली होती चौकशी, मात्र , कारवाई झाली नव्हती [/svt-event]

[svt-event title=”रिपब्लिक टीव्हीच्या अर्णव गोस्वामी अलिबाग पोलिसांनी ताब्यात” date=”04/11/2020,8:55AM” class=”svt-cd-green” ] रिपब्लिक टीव्हीचे अर्णव गोस्वामी पोलिसांनी ताब्यात, मुंबईत पोलीस चौकशीसाठी आज त्याच्या घरी पोहोचले, दीड तास पोलिसोबत हुज्जत [/svt-event]

[svt-event title=”अर्णव गोस्वामीच्या घरी मुंबई पोलिसांचा फौजफाटा” date=”04/11/2020,8:52AM” class=”svt-cd-green” ] अर्णव गोस्वामीच्या घरी मुंबई पोलिसांचा फौजफाटा, 10 ते 20 वरिष्ट पोलीस कर्मचाऱ्यांचा ताफा वरळीतल्या निवासस्थानी, घराच्या आत पोलिसांकडून कागदपत्रांची चाचपणी, फेक टीआरपी प्रकरणी मुंबई पोलीसांकडून अर्नवची चौकशी [/svt-event]

[svt-event date=”04/11/2020,8:50AM” class=”svt-cd-green” ] [/svt-event]

काय आहे प्रकरण?

मुंबईतील सुप्रसिद्ध इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक यांच्या आत्महत्येनंतर उद्योग जगत चांगलेच हादरून गेले आहे. नाईक यांच्या सुसाईड नोटमध्ये रिपब्लीक टीव्हीचे अर्णब गोस्वामी, स्काय मीडियाचे फिरोज शेख आणि स्मार्ट वर्क्स कंपनीचे नितेश सरडा यांची नावे समोर आल्याने पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. रायगड पोलिसांसाठी आता ही हायप्रोफाईल केस झाल्यामुळे त्यांनी अन्वय यांच्या कॉनकॉर्ड डिझायनर कंपनीच्या विविध कार्यालयांची तपासणी सुरू केली आहे. त्यानुसार अहवाल आल्यानंतरच तपासाची पुढील दिशा मिळण्यास मदत होणार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. त्यामुळे या गुन्ह्यातील आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

अन्वय नाईक (५३) यांनी शनिवारी, ५ मे १८ रोजी अलिबाग तालुक्यातील कावीर येथील फार्म हाउसवर गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यांची आई कुमुद नाईक (८४) त्यांचाही मृतदेह तेथेच आढळून आला होता. अन्वय यांची कॉनकॉर्ड कंपनी इंटेरिअर डिझायनरचे काम करते. अन्वय यांच्या कंपनीने रिपब्लीक टीव्हीचे अर्णब गोस्वामी, स्काय मीडियाचे फिरोज शेख आणि स्मार्ट वर्क्स कंपनीचे नितेश सरडा यांच्यासाठी काम केले होते. केलेल्या कामाचे पैसे त्यांच्याकडून सातत्याने अन्वय यांनी मागितले होते. मात्र, अर्णब गोस्वामी, फिरोज शेख आणि नितेश सरडा ते देण्यास टाळाटाळ करत होते, तर दुसरकडे अन्वय यांनी ज्या व्यापारी, व्यावसायिक यांच्याकडून माल उचलला होता त्यांनीही पैशाचा तगादा लावला होता, परंतु समोरून पैसे येत नसल्याने अन्वय यांना नैराश्य आले असावे असा अंदाज आहे.

विशेष तपास पथक

हाय प्रोफाईल केसमुळे रायगड पोलिसांनी तपासासाठी अधिकारी आणि कर्मचारी यांचे विशेष तपास पथक तयार केले. सुसाईड नोटमध्ये नमूद केलेल्या आर्थिक व्यवहारांची खातरजमा करण्यासाठी हे तपास पथकाने अन्वय यांच्या मुंबईतील कार्यालयाची तपासणी केली. तपासणीदरम्यान तपासाची पुढील दिशा निश्चित होण्यास चांगलीच मदत मिळाली असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

Arnab Goswami Arrest

अर्णव गोस्वामींच्या अटकेसंदर्भात सर्व बातम्या  पाहा :

शिवसेना आणि काँग्रेसकडून आणीबाणीच्या मानसिकतेचे प्रदर्शन, देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल

Anvay Naik Suicide Case | प्रसिद्ध इंटिरिअर डिझायनर अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण नेमकं काय?

अर्णव गोस्वामीवरील कारवाई पोलिसांकडून, राज्य सरकारचा संबंध नाही, संजय राऊतांकडून स्पष्ट

Arnab Goswami Arrest : सोनिया सेना आणखी किती गळे दाबणार? कंगनाचा शिवसेनेवर हल्लाबोल

पोलिसांचा दुरुपयोग करत महाराष्ट्र सरकारकडून राज्यात अघोषित आणीबाणी, भाजपचा गंभीर आरोप

अर्णव गोस्वामींच्या अटकेवर केंद्राची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्र सरकारची कारवाई आणीबाणीसारखी: प्रकाश जावडेकर

Arnab Goswami Arrest : महाविकास आघाडी सरकारच्या असहिष्णुतेचा खरा चेहरा जगासमोर, आशिष शेलारांचं टीकास्र