डॅडींना न्यायदेवतेने सोडावं, अरुण गवळीच्या पत्नीचं देवीचरणी साकडं

"डॅडी अरुण गवळी यांना न्यायदेवतेने सोडावं आणि त्यांच्या समाजकार्याला आशीर्वाद द्यावा" असं साकडं त्यांच्या पत्नी आशा गवळी यांनी घातले

डॅडींना न्यायदेवतेने सोडावं, अरुण गवळीच्या पत्नीचं देवीचरणी साकडं
Follow us
| Updated on: Oct 18, 2020 | 4:26 PM

मुंबई : ‘डॅडी’ या नावाने कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीच्या पत्नीने देवीचरणी साकडं घातलं आहे. न्यायदेवतेने सोडावं आणि त्यांच्या समाजकार्याला आशीर्वाद द्यावा, अशी प्रार्थना आशा गवळी यांनी नवरात्रौत्सवानिमित्त भायखळ्याच्या दगडी चाळीत विराजमान झालेल्या देवीकडे केली. (Arun Gawli wife Asha Gawli prays to Devi for Husband’s acquittal)

दगडी चाळीच्या देवीची स्थापना डॅडी अरुण गवळीने केली. ‘नवसाला पावली, हाकेला धावली, दगडी चाळची आई माऊली’ अशी देवीची ओळख आहे. भायखळा दगडी चाळ सार्वजनिक नवरात्रौत्सव उत्सव मंडळाने कोरोनाच्या संकटात रक्तदानाचा संकल्प केला आहे. कोरोना महामारीत देवीच्या दर्शनाला येताना भक्तगण सोशल डिस्टन्सिंगचं पालन करुन रक्तदान करत आहे.

“देवीकडे आता एकच गाऱ्हाणं आहे. डॅडी अरुण गवळी यांना न्यायदेवतेने सोडावं आणि त्यांच्या समाजकार्याला आशीर्वाद द्यावा” असं साकडं त्यांच्या पत्नी आशा गवळी यांनी घातले आहे. याच नवरात्रीत रक्तदानाचा संकल्पाचा रेकॉर्ड होईल असा विश्वास अखिल भारतीय सेनेच्या नगरसेविका आणि अरुण गवळीची कन्या गीता गवळी यांनी व्यक्त केला.

अरुण गवळीच्या पॅरोल आणि फर्लो रजा

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जुलै महिन्यात अरुण गवळीला 28 दिवसांची फर्लो रजा मंजूर केली होती. त्याच्या काही दिवस आधीच अरुण गवळी पॅरोलची रजा पूर्ण करुन नागपूर कारागृहात परतला होता. अरुण गवळी हा यापूर्वी 8 वेळा कारागृहातून बाहेर आला आहे.

आधी पत्नीच्या आजारपणाचं कारण, नंतर लॉकडाऊनमुळे अरुण गवळीच्या पॅरोलमध्ये मुदतवाढ

पत्नी गंभीर आजारी असल्याच्या कारणास्तव न्यायालयाने सुरुवातीला अरुण गवळीला 45 दिवसांचा पॅरोल मंजूर केला होता. यानुसार, त्याला 27 एप्रिलपर्यंत आत्मसमर्पण करायचे होते. मात्र, लॉकडाऊनमुळे नागपूरला परत येणे शक्य होत नसल्याचे कारण देत अरुण गवळी याने न्यायालयात पॅरोल वाढवण्यासाठी अर्ज दिला होता. यानंतर न्यायालयाने तो अर्ज मंजूर केला. त्यामुळे अरुण गवळीला कारागृहात हजर होण्यासाठी दुसऱ्यांदा मुदतवाढ मिळाली होती.

अरुण गवळी पॅरोलवर असतानाच लॉकडाऊनच्या काळात त्याच्या मुलीचा विवाहसोहळा देखील संपन्न झाला. अभिनेता अक्षय वाघमारेसोबत योगिता गवळी 8 मे रोजी विवाहबद्ध झाली. कन्यादान करताना अरुण गवळी भावूक झाल्याचंही दिसलं होतं. लॉकडाऊनचे नियम पाळून मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत हा विवाह पार पडला. अक्षय आणि योगिता यांचं लग्न मुंबईतील भायखळा परिसरात असलेल्या दगडी चाळीतच झालं.

(Arun Gawli wife Asha Gawli prays to Devi for Husband’s acquittal)
View this post on Instagram

?? #stayhome #staysafe

A post shared by Akshay Waghmare (@akshayswaghmare) on

संबंधित बातम्या :

अरुण गवळीच्या मुलीचा विवाह, कन्यादान करताना ‘डॅडी’ भावूक

दगडी चाळीत डॅडीची दानत, पॅरोलवर बाहेर आलेल्या अरुण गवळीची गरजूंना मदत

(Arun Gawli wife Asha Gawli prays to Devi for Husband’s acquittal)

मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.