देशाच्या देवांचा अपमान होतो तरीही चंपा असो की डंफा कोणीच बोलत नाही; अरविंद सावंत यांचा घणाघाती हल्ला

कर्नाटकमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाली. कर्नाटकात भाजप सरकार आहे. पण दोषींवर कारवाई झाली नाही. छत्रपती शिवाजी महाराजांसोबत आहोत हे दाखवायचं असेल तर आधी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचा राजीनामा घ्या.

देशाच्या देवांचा अपमान होतो तरीही चंपा असो की डंफा कोणीच बोलत नाही; अरविंद सावंत यांचा घणाघाती हल्ला
ARVIND SAWANT
Follow us
| Updated on: Dec 19, 2021 | 1:09 PM

मुंबई: कर्नाटकमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाली. कर्नाटकात भाजप सरकार आहे. पण दोषींवर कारवाई झाली नाही. छत्रपती शिवाजी महाराजांसोबत आहोत हे दाखवायचं असेल तर आधी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचा राजीनामा घ्या, मगच बोला, असं आव्हानच शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी भाजपला दिलं आहे. तसेच देशाच्या देवाचा अपमान होतो. पण चंपा असो वा डंफा कोणीच बोलत नाही, असा घणाघाती हल्लाही अरविंद सावंत यांनी चढवला आहे.

अरविंद सावंत यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. कर्नाटकात भाजप सरकार पण देशाच्या देवांचा अपमान होतो आणि कोणतीच कारवाई होत नाही. या घटनेवर चंपा असो वा डंफा कोणीच बोलत नाहीत, असा घणाघाती हल्ला चढवतानाच कानडी बांधवांनो, तुम्ही महाराष्ट्रात राहता. इथे तुम्हाला त्रास होत नाही. शाळा बंद केल्या जात नाही. तुम्ही तुमच्या सरकारला सांगा अन्यथा महाराष्ट्रत राहणं कठीण होईल, असा इशारा सावंत यांनी दिला.

आमच्या मूळ स्वभावावर येऊ देऊ नका

आम्ही सत्व आणि तत्त्व सोडलं नाही. आम्हाला आमचा मूळ स्वभावावर यायला देऊ नका, असा इशारा देतानाच छत्रपती शिवाजी महाराज हे धगधगता अग्नी आहेत. त्यांचा अवमान झाल्यावर सर्वांचीच बोबडी वळली आहे, असंही ते म्हणाले.

घराघरातून पत्रं पाठवा

पंतप्रधानांनी काशीतील कार्यक्रमात शिवाजी महाराजांचं नाव घेतलं. आधी बोम्मईंचा राजनीमा घ्या आणि मगच छत्रपती शिवाजी महाराजांसोबत असल्याचं दाखवा. शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या बोम्मईंचा राजीनामा घेण्याची मागणी करणारे घराघरातून पत्रं जाऊ द्या. पेटून उठा हेच शिवसेनेने शिकवलं आहे, असंही त्यांनी सांगितलं.

भाजप बोलते एक करते दुसरेच

बोलतील एक आणि करतील दुसरेच असे हे भाजपचे लोक आहेत. केवळ राजकारणासाठी शिवाजी महाराजांचं नाव घेतात. मराठी एकीकरण समितीच्या अध्यक्षावर शाई फेकली. तिच शाई महाराजांवर फेकली. आता ही लोक दरवाजावर येतील. काळजी घ्या, असंही ते म्हणाले.

संबंधित बातम्या:

VIDEO: छत्रपती शिवाजी महाराजजरा एसरन्नो अपमान माडवेडी; सदीप देशपांडेंचा थेट कानडीतून इशारा

VIDEO | लेकाच्या लग्नात प्रफुल्ल पटेलांची धमाल, ‘जुम्मे की रात’वर सलमान-शिल्पा शेट्टीसोबत डान्स

Nashik| खाणीत बुडून 8 वर्षांच्या मुलाचा मृत्यू; आपली मुले खेळायला कुठे जातायत यावर लक्ष ठेवा…!

Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.