पोर्शे अपघात प्रकरणी ठाकरे गटाच्या नेत्याची आक्रमक प्रतिक्रिया; म्हणाले, अजितदादा नार्को टेस्टसाठी तयार म्हणजेच…

Arvind Sawant on Pune Kalyani Nagar Accident Hit and Run Case : पुण्यातील पोर्शे कार हिट अँड रन केसवर विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून टीका करण्यात येत आहे. ठाकरे गटाच्या नेत्याने यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी अजित पवार यांचं नाव घेत या नेत्याने मोठं विधान केलं आहे. वाचा सविस्तर...

पोर्शे अपघात प्रकरणी ठाकरे गटाच्या नेत्याची आक्रमक प्रतिक्रिया; म्हणाले, अजितदादा नार्को टेस्टसाठी तयार म्हणजेच...
Follow us
| Updated on: May 30, 2024 | 4:31 PM

पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणात रोज नवे अपडेट्स येत आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यांचं नाव घेत शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यानं मोठं विधान केलं आहे. अजित पवार हे नार्को टेस्ट करण्यासाठी तयार असतील तर हा विषय इथेच संपला. यात राजकारण होत आहे, हे स्पष्ट झालंय. चौकशी समिती नेमली आहे. त्यामुळे सत्य काय आहे ते बाहेर येईलच. द ग्रेट कोर्टाने 300 शब्दांचा निबंध लिहायला सांगितलं. त्या कोर्टाच्या विदावत्तेला माझा नमस्कार…, असं ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय घडलं?

पोर्शे कार प्रकरणावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अजित पवारांवर आरोप केले. अजित पवारांची नार्को टेस्ट करावी, अशी मागणी दमानिया यांनी केली. त्यांचं हे चॅलेंज अदित पवारांनी मान्य केलं आणि नार्को टेस्टसाठी आपण तयार असल्याचं अजित पवार म्हणाले. माझ्या नार्को टेस्टमध्ये काही आलं नागी. तर अंजली दमानिया यांनी पुन्हा मीडियासमोर यायचं नाही. त्यांनी घरात बसायचं, असं अजित पवार म्हणाले. या सगळ्यावर अरविंद सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

ससून रूग्णालयाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह

ससून रुग्णालयाचे डिन विनायक काळे यांना जर मंत्री महोदय यांनी सांगितलं असेल तर ते काम ते करणार ना. मात्र जबाबदारी मात्र मंत्र्यांची असते ना? ससून आता मात्र बदनाम होत आहे. या हॉस्पिटल ची विश्वासार्हता होतीय. पण ती आता नाही. या हॉस्पिटलमध्ये ड्रग्जचं रॅकेट चालत होतं. त्यामुळे आत्ता सगळी जबाबदारी ही मंत्री महोदय यांची आहे, असं अरविंद सावंत म्हणाले.

पुणे अपघात प्रकरणात रोज नवीन माहिती येत आहेत. त्यात अपघात दोन गाड्यांची रेस लागली होती आणि त्यात कोण होतं? अशी अनेक माहिती आता समोर येत आहे. अशा मुजोर लोकांत आता माज आला आहे. त्यांना आता भानावर येण गरजेचं आहे. जे आत्ता सुरु आहे त्याला राजकीय वळण लागलं आहे. पण यात राजकीय वरदहस्त आहे. त्यामुळे ते बाहेर आले पाहिजे, असंही अरविंद सावंत म्हणाले.

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.