“अशा नीच वृत्तीचा आणि संजय राऊतांचा निषेध” ; मराठा समाजाची माफी मागा, ‘या’ नेत्यानेही केली मागणी

आपल्या फेसबूक पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, शिवछत्रपतींच्या वंशजांचे दाखले मागायचे, मराठा क्रांती मोर्चाला ‘मुका मोर्चा’ म्हणून हिणवायचं असं म्हणत मराठा क्रांती मोर्चाविषयी काढलेल्या उद्गगारांची त्यांना त्यांनी आठवण करून दिली आहे.

अशा नीच वृत्तीचा आणि संजय राऊतांचा निषेध ; मराठा समाजाची माफी मागा, 'या' नेत्यानेही केली मागणी
Follow us
| Updated on: Dec 18, 2022 | 11:33 PM

मुंबईः महाविकास आघाडीने महामोर्चा काढल्यानंतर सत्ताधाऱ्यांकडून महामोर्चावर जोरदार हल्लाबोल करण्यात आला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या महामोर्चाला नॅनो मोर्चा म्हटले होते. त्यानंतर राजकीय वातावरण आणखी ढवळून निघाले. देवेंद्र फडणवीस आणि सत्ताधाऱ्यांच्या टीकेला उत्तर देण्यासाठी खासदार संजय राऊत यांनी महामोर्चा आणि मराठी क्रांती मोर्चा अशी तुलना मराठा क्रांती मोर्चाचे व्हिडीओ ट्विट केले. त्यानंतर मराठी क्रांती मोर्चाच्या नेत्यांसह आता भाजपमधील नेत्यांकडूनही संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला जात आहे.

प्रसाद लाड यांच्यानंतर नितेश राणे यांनी त्यांच्यावर निशाणा साधताला फेसबुकला पोस्ट करत त्यांनी अशा नीच वृत्तीचा आणि संजय राऊत यांचा निषेध असं म्हणत त्यांनी मराठा समाजाची माफी मागावी अशी मागणी केली आहे.

भाजपचे आमदार नितेश राणे यांनी फेसबुकवर संजय राऊत यांच्या या कृतीविषयी पोस्ट करत त्यांचा निषेध व्यक्त केला आहे. आमदार नितेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधताना त्यांनी मराठा क्रांती मोर्चावेळी संडय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यांचा इतिहास उगळत त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.

आपल्या फेसबूक पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, शिवछत्रपतींच्या वंशजांचे दाखले मागायचे, मराठा क्रांती मोर्चाला ‘मुका मोर्चा’ म्हणून हिणवायचं असं म्हणत मराठा क्रांती मोर्चाविषयी काढलेल्या उद्गगारांची त्यांना त्यांनी आठवण करून दिली आहे.

मराठा क्रांती मोर्चाला ज्या संजय राऊत यांनी हिणवलं आहे, ते आता आपले यश लपवण्यासाठी मराठा मोर्च्याचा आधार घेत आहेत असंही त्यांनी म्हटले आहे.

अशा नीच वृत्तीचा आणि संजय राऊत यांचा निषेध करतो. त्यामुळे त्यांनी मराठा समाजाची माफी मागावी अशा आशायाची पोस्ट त्यांनी फेसबुकला शेअर केली आहे.

आमदार नितेश राणे यांनी  खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार घणाघात केला आहे. त्यामुळे मराठा क्रांती मोर्चाच्या व्हिडीओमुळे आता पुन्हा हे राजकारण तापणार का असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.