Asaduddin Owaisi : नवाब मलिक मुसलमान म्हणून जेलमध्ये, पवार मोदींना भेटल्यावर राऊत आठवले मलिक का नाही? ओवैसींचा सवाल

शरद पवार मोदींना (Sharad Pawar) भेटेले तेव्हा त्यांना राऊतांवर कारवाई करु नका म्हणून सांगायला राऊतांची आठवण आली. मात्र त्यांना यावेळी नवाब मलिकांची आठवण आली नाही का? असा सवाल ओवैसी यांनी शरद पवार आणि महाविकास आघाडीला केला आहे.

Asaduddin Owaisi : नवाब मलिक मुसलमान म्हणून जेलमध्ये, पवार मोदींना भेटल्यावर राऊत आठवले मलिक का नाही? ओवैसींचा सवाल
नवाब मलिक मुस्लीम म्हणून जेलमध्ये, पवार मोदींना भेटल्यावर राऊत आठवले मलिक का नाही? ओवैसींना मलिकांचा पुळकाImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 28, 2022 | 9:51 PM

मुंबई : आज राज्यात अनेक मोठ्या घडामोडी घडत असतानाच मुंबई एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांची संभा पार पडली आहे. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीला टार्गेट केलं. मात्र महाविकास आघाडीला टार्गेट करताना ओवैसींना अचानक नवाब मलिक (Nawab Malik) यांचा पुळका आल्याचे दिसून आले. कारण नवाब मलिक यांच्याबाबत बोलताना ओवैसी म्हणाले. नवाब मलिक मुस्लिम आहेत म्हणून जेलमध्ये आहे. शरद पवार मोदींना (Sharad Pawar) भेटेले तेव्हा त्यांना राऊतांवर कारवाई करु नका म्हणून सांगायला राऊतांची आठवण आली. मात्र त्यांना यावेळी नवाब मलिकांची आठवण आली नाही का? असा सवाल ओवैसी यांनी शरद पवार आणि महाविकास आघाडीला केला आहे. तसेच ही अटक म्हणजे शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा डाव असल्याचेही ओवैसी म्हणाले आहेत.

मलिकांना जेलमधून सोडा-ओवैसी

यावेळी बोलताना ओवैसी म्हणाले, महाराष्ट्रातल्या सरकारला लोकशाहीत विश्वास असेल तर ती जेलमधील लोकांना सोडेल. जे नेते जेलमध्ये जातात त्यांची ताकद आणखी वाढते. खालीद गुड्डू सुटेल तेव्हा आणखी ताकदवान नेता होईल. अत्याचार कारणाऱ्यांनो लक्षात ठेवा, सत्ता फार काळ कुणाचीच नसते. आज तुम्ही सत्तेच्या नशेत आहात म्हणून अनेकांना जेलमध्ये टाकत आहात. मात्र आल्हा त्यांनाच एकदिवस जेलमध्ये टाकतो. नवाब मलिक यांनाही सरकारने सोडले पाहिजे. सर्वच राजकीय पक्षांना वाटत आहे आपण जेलमध्ये नाही गेलो पाहिजे. मात्र आमच्या पार्टीतल्या मुस्लिमांना जेलमध्ये टाका. असे यांचे धोरण आहे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार दिल्लीत जाऊन मोदींना भेटतात. तेव्हा मीडियाने सांगितलं की पवार मोदींना म्हणाले की संजय राऊतांवर कारवाई करु नका, राऊतांना जेलमध्ये टाकू नका. त्यांची चौकशी करु नका. मग मी विचारतो राष्ट्रवादीला की पवारांना मलिक का नाही आठवले? असा सवाल यावेळी ओवैसी यांनी केला.

संजय राऊत जास्त प्रिय झाले का?

तर नवाब मलिक हे तुमच्याच पार्टीचे आहेत. तेव्हा मलिकांचेही नाव घ्यायचे होते ना, मात्र नवाब मलिकांना जेलमध्ये टाकलं आणि संजय राऊतांचं नाव घेतलं. मग राष्ट्रवादीला संजय राऊत हे नवाब मलिक यांच्यापेक्षा जास्त प्रिय झाले का? असा सावल ओवैसी यांनी केला. त्यामुळे आता यावरून जोरदार राजकारण पेटणार आहे. हे निश्चित झालं आहे.

हे सुद्धा वाचा

मलिकांचा केवळ मतांसाठी वापर

नवाब मलिक आणि संजय राऊत बरोबरीचे नाही का, मग का नाही आलं नवाब मलिकांचं नाव, मात्र नाही मलिकांना घाबरवण्यासाठी जेलमध्ये टाकलं. मलिक पुन्हा धावत त्यांच्याजवळच जातील, म्हणून जेलमध्ये टाकलं. हे मलिकांचं स्थान आहे. मात्र निवडणुका आल्या की म्हणतील मोदींना रोखायचं आहे. हे ढोंग करतील असे म्हणत ओवैसी यांनी यावेळी महाविकास आघाडी आणि शरद पवारांवर जोरदार हल्लाबोल चढवला.

Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.