मुंबई : आज राज्यात अनेक मोठ्या घडामोडी घडत असतानाच मुंबई एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांची संभा पार पडली आहे. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीला टार्गेट केलं. मात्र महाविकास आघाडीला टार्गेट करताना ओवैसींना अचानक नवाब मलिक (Nawab Malik) यांचा पुळका आल्याचे दिसून आले. कारण नवाब मलिक यांच्याबाबत बोलताना ओवैसी म्हणाले. नवाब मलिक मुस्लिम आहेत म्हणून जेलमध्ये आहे. शरद पवार मोदींना (Sharad Pawar) भेटेले तेव्हा त्यांना राऊतांवर कारवाई करु नका म्हणून सांगायला राऊतांची आठवण आली. मात्र त्यांना यावेळी नवाब मलिकांची आठवण आली नाही का? असा सवाल ओवैसी यांनी शरद पवार आणि महाविकास आघाडीला केला आहे. तसेच ही अटक म्हणजे शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा डाव असल्याचेही ओवैसी म्हणाले आहेत.
यावेळी बोलताना ओवैसी म्हणाले, महाराष्ट्रातल्या सरकारला लोकशाहीत विश्वास असेल तर ती जेलमधील लोकांना सोडेल. जे नेते जेलमध्ये जातात त्यांची ताकद आणखी वाढते. खालीद गुड्डू सुटेल तेव्हा आणखी ताकदवान नेता होईल. अत्याचार कारणाऱ्यांनो लक्षात ठेवा, सत्ता फार काळ कुणाचीच नसते. आज तुम्ही सत्तेच्या नशेत आहात म्हणून अनेकांना जेलमध्ये टाकत आहात. मात्र आल्हा त्यांनाच एकदिवस जेलमध्ये टाकतो. नवाब मलिक यांनाही सरकारने सोडले पाहिजे. सर्वच राजकीय पक्षांना वाटत आहे आपण जेलमध्ये नाही गेलो पाहिजे. मात्र आमच्या पार्टीतल्या मुस्लिमांना जेलमध्ये टाका. असे यांचे धोरण आहे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार दिल्लीत जाऊन मोदींना भेटतात. तेव्हा मीडियाने सांगितलं की पवार मोदींना म्हणाले की संजय राऊतांवर कारवाई करु नका, राऊतांना जेलमध्ये टाकू नका. त्यांची चौकशी करु नका. मग मी विचारतो राष्ट्रवादीला की पवारांना मलिक का नाही आठवले? असा सवाल यावेळी ओवैसी यांनी केला.
तर नवाब मलिक हे तुमच्याच पार्टीचे आहेत. तेव्हा मलिकांचेही नाव घ्यायचे होते ना, मात्र नवाब मलिकांना जेलमध्ये टाकलं आणि संजय राऊतांचं नाव घेतलं. मग राष्ट्रवादीला संजय राऊत हे नवाब मलिक यांच्यापेक्षा जास्त प्रिय झाले का? असा सावल ओवैसी यांनी केला. त्यामुळे आता यावरून जोरदार राजकारण पेटणार आहे. हे निश्चित झालं आहे.
नवाब मलिक आणि संजय राऊत बरोबरीचे नाही का, मग का नाही आलं नवाब मलिकांचं नाव, मात्र नाही मलिकांना घाबरवण्यासाठी जेलमध्ये टाकलं. मलिक पुन्हा धावत त्यांच्याजवळच जातील, म्हणून जेलमध्ये टाकलं. हे मलिकांचं स्थान आहे. मात्र निवडणुका आल्या की म्हणतील मोदींना रोखायचं आहे. हे ढोंग करतील असे म्हणत ओवैसी यांनी यावेळी महाविकास आघाडी आणि शरद पवारांवर जोरदार हल्लाबोल चढवला.