… तर आदित्य ठाकरेंच्या नाईट लाईफला समर्थन : आशिष शेलार
पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या 'मुंबई 24 तास' (मुंबई नाईट लाईफ) निर्णयाने व्यापाऱ्यांना व्यापाराची संधी मिळणार असेल तर अशा निर्णयाला आमचा पाठिंबा आहे. मात्र, निवासी भागांमध्ये अशी 24 तास हॉटेल सुरु राहणार असतील, तर त्याला भाजपचा विरोध आहे, असं मत भाजप नेते आणि माजी शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी व्यक्त केलं आहे (Ashish Shelar on Mumbai 24 scheme).
मुंबई : पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या ‘मुंबई 24 तास’ (मुंबई नाईट लाईफ) निर्णयाने व्यापाऱ्यांना व्यापाराची संधी मिळणार असेल तर अशा निर्णयाला आमचा पाठिंबा आहे. मात्र, निवासी भागांमध्ये अशी 24 तास हॉटेल सुरु राहणार असतील, तर त्याला भाजपचा विरोध आहे, असं मत भाजप नेते आणि माजी शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी व्यक्त केलं आहे (Ashish Shelar on Mumbai 24 scheme). आधीच अमेझॉन, फ्लिपकार्ड इत्यादींच्या आक्रमणामुळे याआधीच राज्यातील व्यापाऱ्यांवर संकट आलं आहे, असंही आशिष शेलार यांनी नमूद केलं (Ashish Shelar on Mumbai 24 scheme).
आशिष शेलार म्हणाले, “आधीच अमेझॉन, फ्लिपकार्ड इत्यादींच्या आक्रमणामुळे याआधीच राज्यातील व्यापाऱ्यांवर संकट आलं आहे. या निर्णयाने या व्यापाऱ्यांना व्यापाराची संधी मिळणार असेल तर अशा निर्णयाला आमचा पाठिंबा आहे. मात्र, निवासी भागांमध्ये अशी 24 तास हॉटेल सुरु राहणार असतील, तर त्याला भाजपचा विरोध आहे. सर्वसामान्य लोकांना, नोकरदार लोकांना झोप आवश्यक आहे. स्थानिक निवासी भागातील लोकांना या निर्णयाचा त्रास होऊ नये अशी भाजपची भूमिका आहे.”
बार, लेडीज बार, डिस्को 24 तास सुरू राहणार असतील, निवासी भागातील लोकांना याचा त्रास होणार असेल तर या निर्णयाला भाजपचा विरोध आहे. त्यातच 26 जानेवारी रोजी या ड्राय डेच्या दिवशी अशा निर्णयाची अंमलबजावणी करणार आहेत. सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? असाही सवाल शेलार यांनी विचारला.
मुंबई पोलिसांवर आधीच खूप ताण आहे. यात आता 24 तास हॉटेल सुरू राहिल्याने पूर्ण रात्र पोलिसांना आणखी काम करावे लागेल. वाहतूक पोलिसांवरही याचा ताण पडेल. प्रशासनवरही ताण पडेल. त्यामुळे सर्व चौकट यामुळे विस्कळीत होणार आहे, असंही आशिष शेलार यांनी नमूद केलं.