कलानगरचे पाणी ओसरते मुंबईचे का नाही?, आशिष शेलारांचा ठाकरेंना बोचरा सवाल

| Updated on: Sep 23, 2020 | 7:06 PM

कलानगरचे पाणी तातडीने ओसरते, मग मुंबईतील अन्य ठिकाणांचे का नाही, असा प्रश्न अ‌ॅड.आशिष शेलार यांनी विचारला आहे. (ashish-shelar-raised questions-on-water-logging-in-mumbai)

कलानगरचे पाणी ओसरते मुंबईचे का नाही?, आशिष शेलारांचा ठाकरेंना बोचरा सवाल
Follow us on

मुंबई- मुंबईला मंगळवारी संध्याकाळपासून मुसळधार पावसाने झोडपल्याने मुंबईची तुंबई झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.  यावरुन भाजप नेते अ‌ॅड.आशिष शेलार यांनी शिवसेनेवर हल्ला केला आहे. कलानगरचे पाणी तातडीने ओसरते, मग मुंबईतील अन्य ठिकाणांचे का नाही, असा प्रश्न शेलार यांनी विचारलाय. मुंबईची तुंबई झाल्यावरुन पाऊस जास्त पडला असे सांगत पाणी तुंबल्याचे खापर पावसावर फोडू नका, असा टोलाही शेलारांनी ट्विटच्या माध्यमातून शिवसेनेला लगावला. (ashish-shelar-raised questions-on-water-logging-in-mumbai)

आशिष शेलार यांनी ट्विटमधून मुंबई महापालिकेवर प्रश्नांची सरबत्ती केली. महापालिकेतील सत्ताधारी शिवनसेनेने “पाऊस जास्त पडला सांगत पावसावर खापर फोडू नका?, नुसते फिरुन उपयोग काय?, ब्रिटानियाचे पंपिंग स्टेशन पूर्ण क्षमतेने का चालत नाही ते सांगा?, मायक्रो टनेलची कामे वेळेत पूर्ण का झाली नाही ते ही सांगा? पाण्याचा निचरा होण्यास ऐवढा विलंब कधी होत नव्हता, मग आता का विलंब होतोय हेही सांगा?”, हे प्रश्न शेलार यांनी मुंबई महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेला विचारलेत.

“हिंदमाता, वरळीसह अनेक भागातील पाण्याचा निचरा का होत नाही?मुंबईकरांच्या घरातील पाणी अजून कमी का होत नाही?, 116% नालेसफाईचे दावे कुठे गेले?, रात्री अजून पाऊस झाला तर मुंबईकरांनी करायचे काय?, कलानगरचे पाणी तातडीने ओसरते मग मुंबईतील अन्य ठिकाणांचे का नाही?” हे प्रश्न आशिष शेलार यांनी उपस्थित केले आहेत.

सप्टेंबर महिन्यातील सरासरीच्या 83 टक्के पाऊस 12 तासात

दरम्यान, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबई महापालिकेच्या आप्तकालीन विभागाला भेट दिली. साधारणपणे सप्टेंबर महिन्यात पडणाऱ्या पावसाच्या 83 टक्के पाऊस 12 तासात झाल्याची माहिती आदित्य ठाकरेंनी माध्यमांना दिली. धारावी आणि दादरच्या भागात 332 मिली मीटर पाऊस झाल्याचे त्यांनी सांगितले.

संबधित बातम्या:

Mumbai Rains | नायर हॉस्पिटलमध्ये गुडघाभर पाणी, ओपीडीत पाणी शिरल्याने दाणादाण

Mumbai Rains : मुंबईतील रस्ते जलमय, रेल्वे सेवा, रस्ते वाहतूक कोलमडली

Mumbai Rains | तुफान पावसाने मुंबईची दाणादाण, मुंबईत सुट्टी जाहीर, आयुक्त इक्बाल चहल यांची घोषणा

(ashish-shelar-raised questions-on-water-logging-in-mumbai)