मुंबई : मुंबईसह उपनगरात तुफान पाऊस कोसळत आहे. त्यामुळे दादर, हिंदमाता, किंग्ज सर्कल परिसरात गुडघाभर पाणी साचलं. मुंबईत विविध भागात पाणी साचल्याने भाजप नेते आशिष शेलार यांनी शिवसेना आणि महापालिकेवर टीका केली आहे. “आयुक्तांच्या दाव्याचे पावसाने तीन तेरा वाजवले, 113 टक्के नालेसफाईचे दावे करणारे कुठे आहेत,” असा प्रश्न आशिष शेलार यांनी उपस्थित केला (Ashish Shelar Criticizes BMC Waterlogging in Mumbai) आहे.
मुंबईसह उपनगरातील मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचल्याने आशिष शेलारांनी घणाघात केला आहे. “मुंबईत 113 टक्के नालेसफाई झाल्याच्या आयुक्तांच्या दाव्याचे पावसाने अखेर तीन तेरा वाजवलेच! हे होणारच होते, कारण 40 टक्क्यांपेक्षा जास्त नालेसफाई झालेली नाही,” असे ट्विट आशिष शेलार यांनी केले आहे.
“आता कुठे आहेत ते 113 टक्क्यांचे दावे करणारे? कोट्यवधीची कंत्राटे देऊन कंत्राटदारांची पाठराखण करणारे सत्ताधारी आता गायब?” असा प्रश्नही आशिष शेलार यांनी उपस्थित केला आहे.
मुंबईत 113% नालेसफाई झाल्याच्या आयुक्तांच्या दाव्याचे पावसाने अखेर तीन तेरा वाजवलेच! हे होणारच होते, कारण 40% पेक्षा जास्त नालेसफाई झालेली नाही.
आता कुठे आहेत ते 113% चे दावे करणारे?
कोट्यवधीची कंत्राटे देऊन कंत्राटदारांची पाठराखण करणारे सत्ताधारी आता गायब?— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) July 15, 2020
“मुंबईतील मुसळधार पावसामुळे मुंबईची तुंबई झालेले मुंबईकरांनी पाहिलं. आयुक्त दावा करत होते की 113 टक्के नालेसफाई केली. त्यावेळी मी आयुक्तांना 227 टक्के तुमचा दावा फोल आहे असे आवाहन केले होते. कंत्राटादारांना पाठीशी घालणारे सत्ताधारी आणि अधिकारी हे यामागे खरे दोषी आहेत. त्यामुळे मुंबईकरांचा जीव असुरक्षित करु नका. कंत्राटदारांना पाठीशी घालू नका. मुंबईचं तुंबई तुम्ही करुन दाखवलं, त्या अधिकारी आणि सत्ताधाऱ्यांना या प्रश्नाचे उत्तर द्यावचं लागेल,” असेही आशिष शेलार यांनी (Ashish Shelar Criticizes BMC Waterlogging in Mumbai) सांगितले.
मुंबईत तुंबलेल्या पाण्याचे सत्ताधाऱ्यांना उत्तर द्यावेच लागेल ! @bjp4mumbai pic.twitter.com/tkAgJr2k4m
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) July 15, 2020
हवामान विभागाने मुंबई, ठाणे आणि पालघरला ऑरेंज अलर्ट दिला आहे. तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड यासारख्या कोकण किनारपट्टी भागात रेड अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईत लोअर परळ, वरळी, दादर, माटुंगा, किंग्ज सर्कल या भागात जोरदार पाऊस पाहायला मिळत आहेत. तर उपनगरात अंधेरी, मालाड, कांदिवली, बोरिवली या ठिकाणीही मुसळधार पाऊस होत आहे. यामुळे ठिकठिकाणी सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली (Ashish Shelar Criticizes BMC Waterlogging in Mumbai) आहे.
14 जुलै 2020 – मुंबई, ठाणे, पालघर, रायगड या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता
15 जुलै 2020 – मुंबई, ठाणे, पालघर, रायगड या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता
16 जुलै 2020 – मुंबई, ठाणे, पालघर, रायगड या ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज
संबंधित बातम्या :
Rain Update | मुंबईसह कोकणात धो-धो, पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज