Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ashish Shelar : भाजप आमदार आशिष शेलार यांना जीवे मारण्याची धमकी, गृहमंत्र्यांना पत्र लिहिणार

माजी मंत्री आणि भाजपचे प्रमुख नेते आमदार आशिष शेलार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे. आशिष शेलार यांना कुटुंबासह जीवे मारण्याची धमकी देण्यात आलीय. दोन दिवसांपूर्वी आशिष शेलार यांना फोनद्वारे धमकी देण्यात आली होती.

Ashish Shelar : भाजप आमदार आशिष शेलार यांना जीवे मारण्याची धमकी, गृहमंत्र्यांना पत्र लिहिणार
12 आमदारांना विधानसभेत प्रवेश द्या, आशिष शेलारांचं विधानभवन सचिवांना पत्र
Follow us
| Updated on: Jan 08, 2022 | 10:10 AM

मुंबई: माजी मंत्री आणि भाजपचे (BJP) प्रमुख नेते आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांना जीवे मारण्याची धमकी (Life Threat Phone call) देण्यात आलेली आहे. आशिष शेलार यांना कुटुंबासह जीवे मारण्याची धमकी देण्यात आलीय. दोन दिवसांपूर्वी आशिष शेलार यांना फोनद्वारे धमकी देण्यात आली होती. आशिष शेलार यांनी याप्रकरणी पत्र लिहून पोलीस आयुक्ताकडे तक्रार दाखल केल्याची माहिती आहे. आशिष शेलार यांना यापूर्वी देखील अशी धमकी देण्यात आली होती, अशी माहिती आहे.  लार आज गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना देखील पत्र लिहून झालेल्या प्रकाराची माहिती देतील, असं देखील कळतंय.

अनोळखी नंबववरुन धमकी

आशिष शेलार यांनी अनोळखी नंबरच्या फोनवरुन धमकी आल्याची माहिती पत्राद्वारे पोलीस आयुक्तांनी दिली आहे. दोन वेगवेगळ्या फोन वरुन आशिष शेलार यांना धमकी देण्यात आल्याचं देखील कळतंय. भाजप नेते आशिष शेलार यांनी अज्ञात व्यक्तीकडून जीवे मारण्याची धमकी दोन वेगवेगळ्या फोनवरुन देण्यात आली आहे.

पोलीस आयुक्तांकडे लेखी तक्रार दाखल

आशिष शेलार यांना दोन दिवसांपूर्वी म्हणजेच परवाच्या दिवशी धमकी देण्यात आली होती. आशिष शेलार यांनी या प्रकरणी मुंबई पोलीस  आयुक्तांकडे पत्राद्वारे तक्रार केल्याचं कळतंय.

आज गृहमंत्र्यांकडे करणार तक्रार

आशिष शेलार हे भाजपचे प्रमुख नेते असून त्यांना यापूर्वी देखील धमकी मिळाली होती. शेलार आज गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना देखील पत्र लिहून झालेल्या प्रकाराची माहिती देतील आणि कारवाई कऱण्याची मागणी करतील, असं देखील कळतंय.

2020 मध्येही धमकीचा प्रकार

आशिष शेलार यांना 2020 मध्ये देखील जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यावेळी पोलिसांनी धमकी देणाऱ्या आरोपीला मुंब्रा येथून अटक केली होती. आता पुन्हा एकदा आशिष शेलार यांना धमकीचा फोन आल्यानं खळबळ उडाली आहे.

देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

आशिष शेलार हे महाविकास आघाडी सरकारविरोधात संघर्ष करत आहेत. आशिष शेलार लढवय्ये असल्यानं त्यांच्या विरोधात असे प्रकार सुरु आहेत. शेलार यांना आलेल्या धमकीची मुंबई पोलिसांनी गांभीर्यानं दखल घ्यावी, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले.

इतर बातम्या:

Keshav Upadhye: नानाजींनी सोनिया गांधींनाच खोटे पाडले, भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांची टीका

नाना पटोलेंविरोधात गावोगाव तक्रारी दाखल करा, चंद्रकांत पाटलांचा कार्यकर्त्यांना आदेश, वाद पेटणार?

संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार
संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार.
'हो, मीच हत्या केली..'; सुदर्शन घुलेचा कबुली जबाब
'हो, मीच हत्या केली..'; सुदर्शन घुलेचा कबुली जबाब.
पाणीबाणीला सुरुवात; 2 हंड्यापेक्षा जास्त पाणी घेतलं तर 100 रुपये दंड
पाणीबाणीला सुरुवात; 2 हंड्यापेक्षा जास्त पाणी घेतलं तर 100 रुपये दंड.
'कुणाल कामराला थर्ड डिग्रीचा वापर', शिवसेनेच्या बड्या मंत्र्याचा इशारा
'कुणाल कामराला थर्ड डिग्रीचा वापर', शिवसेनेच्या बड्या मंत्र्याचा इशारा.
मी नार्को टेस्टसाठी तयार, पण.. ; सतीश सालियान नेमकं काय म्हणाले?
मी नार्को टेस्टसाठी तयार, पण.. ; सतीश सालियान नेमकं काय म्हणाले?.
'तो' बलात्कार नाही, अलाहाबाद कोर्टाला फटकारल, 'राज्य महिला'कडून स्वागत
'तो' बलात्कार नाही, अलाहाबाद कोर्टाला फटकारल, 'राज्य महिला'कडून स्वागत.
धनंजय मुंडे यांनीच हे सगळं करायला सांगितलं; जरांगेंचा गंभीर आरोप
धनंजय मुंडे यांनीच हे सगळं करायला सांगितलं; जरांगेंचा गंभीर आरोप.
बाळासाहेबांच्या 'त्या' सूचना तरी मनसेकडून गुढीपाडवा मेळाव्याचे बॅनर्स
बाळासाहेबांच्या 'त्या' सूचना तरी मनसेकडून गुढीपाडवा मेळाव्याचे बॅनर्स.
महामार्गावर दारूच्या बॉटल्सने भरलेला ट्रक, मिटकरींनी पाठलाग केला अन्..
महामार्गावर दारूच्या बॉटल्सने भरलेला ट्रक, मिटकरींनी पाठलाग केला अन्...
सरकारला कोण जगतं, कोण मरतं याच्याशी देणघेण नाही; अंबादास दानवेंचा टोला
सरकारला कोण जगतं, कोण मरतं याच्याशी देणघेण नाही; अंबादास दानवेंचा टोला.