रिकाम्या तिजोरीचा नुसता खडखडाट, कारभाऱ्यांचा उगाच बाजीरावाचा थाट! आशिष शेलारांचा शिवसेनेला टोला
मुंबई महापालिकेचे आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांनी आज (4 फेब्रुवारी) स्थायी समितीसमोर अर्थसंकल्प सादर केला (BMC Budget 2020-21). या अर्थसंकल्पात मुंबईकरांवर कोणत्याही प्रकारचा करवाढीचा बोजा लादण्यात आलेला नाही.
मुंबई : आशियातील सर्वात मोठ्या मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प (BMC Budget 2021) आज जाहीर करण्यात आला. मुंबई महापालिकेनं यंदा 39 हजार 38 कोटींचं बजेट जाहीर केलं. मागील वर्षी मुंबई महापालिकेचं बजेट 33 हजार 441 कोटी होतं, यंदा 16.74 टक्क्यांनी बजेट वाढवलं आहे. परंतु या अर्थसंकल्पावरून आता विरोधकांनी महापालिकेवर आणि महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. (Ashish shelar Slams Shivsena over BMC Budget 2021)
भाजप नेते आशिष शेलार यांनी ट्विटवर लागोपाठ चार ट्विट्स करुन मुंबई महापालिकेतील सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे. शेलारांनी म्हटलंय की, मुंबईचे कारभारी बुलेट ट्रेनला विरोध करतात, त्यांनी मेट्रो कारशेडचा खेळखंडोबा करुन ठेवला आहे, मुंबईचे कारभारी प्रत्येक नव्या प्रकल्पांना विरोध करतात, तर दुसऱ्या बाजूला पालिका म्हणते, आम्ही मुंबईकरांना जागतिक दर्जाच्या नागरी सुविधा देणार. चौकांचे आणि उड्डाणपूलांचे सौंदर्यीकरण म्हणजे जागतिक दर्जाच्या सुविधा असतात काय? असा खोचक सवाल शेलारांनी उपस्थित केला आहे.
बुलेट ट्रेनला विरोध… मेट्रो कारशेडचा खेळखंडोबा… कारभारी नव्या प्रत्येक प्रकल्पांना विरोध करणार.. आणि पालिका म्हणते, आम्ही मुंबईकरांना जागतिक दर्जाच्या नागरी सुविधा देणार..
चौकांचे आणि उड्डाणपूलांचे सौंदर्यीकरण म्हणजे जागतीक दर्जाच्या सुविधा असतात काय? 1/4
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) February 3, 2021
शेलारांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “मुंबई महापालिका, कमी व्याजावर 77,000 कोटींच्या ठेवी बँकेत ठेवून बँकाना पैसा वापरायला देते. तर दुसरीकडे कर्ज काढून चढ्या दराने व्याज भरते, एकिकडे महसूलात घट होत असून कर्ज घेणार असं सांगितलं जातं तर दुसरीकडे महापालिका म्हणतेय अर्थसंकल्पाचे आकारमान 16.74 % वाढणार. महापालिकेचा ताळमेल फसला आहे आणि बजेच्या वेळी केवळ आकड्यांचा खेळ पाहायला मिळाला.”
कमी व्याजावर 77,000 कोटींच्या ठेवी बँकेत ठेवून बँकाना पैसा वापरायला देणारी महापालिका… दुसरीकडे कर्ज काढून चढ्या दराने व्याज भरणार.. एकिकडे महसूलात घट , कर्ज घेणार सांगणारी महापालिका म्हणतेय अर्थसंकल्पाचे आकारमान 16.74 % वाढणार.. फसलेला ताळमेल अन् सगळा आकड्यांचा खेळ ! 2/4
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) February 3, 2021
करात वाढ नसली तरी शुल्क आकार सुधारणा प्राधिकरण घोषित करून शुल्क वाढीच्या नावाने खिसा कापण्याचे सूतोवाच आहेच.
◆ समुद्राचे पाणी गोडे करणे ◆वरळी डेरीवर जागतिक पर्यटन केंद्र उभारणे.. हे सारे पाहिले की हा पालिकेचा अर्थसंकल्प होता की, पालकमंत्र्यांचे बालहट्टांचे घोषणापत्र? 3/4
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) February 3, 2021
दरम्यान, महापालिकेत सर्वात आधी शिक्षण विभागाचं बजेट सादर करण्यात आलं. शिक्षण विभागाचे 2945 कोटींचं बजेट जाहीर झालं. यावेळी मुंबई महापालिकेच्या शाळांचं नामांतर करण्यात येईल अशी घोषणा करण्यात आली. आता मुंबई महापालिकेच्या शाळा मुंबई पल्बिक स्कूल नावने ओळखल्या जातील.
बेस्टसाठी 1500 कोटींची तरतूद
मुंबई महापालिकेच्या बजेटमध्ये बेस्टसाठी 1500 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. ही रक्कम कर्जाची परतफेड, वेतन व्यवस्थापनाबाबत आर्थिक जबाबदाऱ्या पूर्ण करणे, आयटीएमएस प्रकल्पाची अंमलबजावणी यासाठी वापरली जाणार आहे.
रस्ते आणि वाहतूक विभागासाठी 1600 कोटींची तरतूद
रस्ते आणि वाहतूक विभागाअंतर्गत 2020-21 मध्ये रस्त्यांची सुधारणा करण्यासाठी मुंबई महापालिकेच्या बजेटमध्ये 1600 कोटींची तरतूद केली आहे. याशिवाय फुटपाथच्या दुरुस्तीसाठी 50 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
कारभाऱ्यांची कोणतीही चमकदार कामगिरी नसलेला.. धनदांडग्यांना केलेल्या सवलतींच्या वर्षावामुळे 5 हजार 867 कोटी महसूलात घट असलेला.. पालिकेला 5 हजार 876 कोटींने कर्जबाजारी करणारा मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प म्हणजे.. रिकाम्या तिजोरीचा नुसता खडखडाट कारभाऱ्यांचा उगाच बाजीरावांचा थाट! 4/4
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) February 3, 2021
शिक्षणासाठी 2944.59 कोटींची तरतूद
शिक्षण क्षेत्रासाठी 2944.59 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये सीबीएसई आणि आयसीएसईच्या शाळांसाठी तसेच अवकाश संशोधनाचे शिक्षण, डिजीटल दुर्बीण आणि वेधशाळेसाठी ही तरतूद करण्यात आली आहे.
उद्यान खात्यासाठी 226.77 कोटी तर अग्निशमन दलासाठी 104 कोटींची तरतूद
याशिवाय, मुंबई महापालिकेच्या बजेटमध्ये उद्यान खात्यासाठी 226.77 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तर अग्निशमन दलासाठी 104 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
पर्यटनासाठी 183.03 कोटींची तरतूद
मुंबई महानगरपालिकेने पर्यटनासाठी एक समर्पित विभाग तयार करण्याचा प्रस्ताव दिला आहे. त्यातील दैनंदिन उपक्रम तज्ञ आणि मान्यताप्राप्त ट्रॅव्हल एजंट्सद्वारे चालविले जातील. पर्यटन आणि हेरिटेजसाठी अर्थसंकल्पात 183.03 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
महिलांच्या वसतिगृहासाठी 10 कोटींची तरतूद
पश्चिम उपनगरात कार्यरत महिलांच्या वसतिगृहाच्या बांधकामासाठी 10 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे महिलांसाठी सुरक्षित आणि सोयीसुविधांनी युक्त वसतिगृह बनणार आहे.
इनक्यूबेशन लॅबसाठी 15 कोटींची तरतूद
मुंबई महानगरपालिकेला मदत करण्यावर भर असलेल्या स्टार्टअप कल्पनांना मुंबई इनक्यूबेशन लॅबमार्फत आर्थिक मदत दिली जाईल. त्यासाठी मुंबई इनक्यूबेशन लॅबसाठी एकूण 15 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
आगामी वर्षात नोकरभरती नाही
उत्पन्न वाढवण्यासाठी महापालिका प्रयत्न करत आहे. मात्र, त्यासाठी कोणत्याही प्रकारची नोकरभरती आगामी वर्षात होणार नाही, अशी घोषणा महापालिकेचे आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांनी बजेट सादर करताना केली.
उत्पन्नाचे नवे स्त्रोत
तिजोरीला लागलेली गळती रोखण्यासाठी महापालिकेच्या उत्पन्नाचे नवे स्त्रोत, नवीन इमारतींना परवानगी देताना आकारण्यात येणा-या छाननी शुल्कात वाढ होणार, छाननी शुल्क एफएसआयवर न आकारता इमारतीच्या बाजारभावानुसार असलेल्या किंमतीवर आकारले जाणार
नवीन इमारतींच्या बांधकामानंतर अग्नी आणि जीव संरक्षण उपाययोजनांची पाहणी आणि परवानगी मुंबई महापालिका देते. या शुल्कात वाढ करण्यात आलेली आहे. वर्षात 140 कोटी रुपये उत्पन्न अपेक्षित आहेत. विविध सेवा शुल्क सुधारणा केल्या जाणार
हेही वाचा
कोरोनामुळे मुंबई महापालिकेचे कंबरडे मोडले, 10 हजार कोटींचा तोटा; उत्पन्न घटले!(
(Ashish shelar Slams Shivsena over BMC Budget 2021ः