Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अशोक सराफ यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान

प्रसिद्ध अभिनेते अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2023 ने सन्मानित करण्यात आलं. पुरस्कार मिळाल्यानंतर अशोकमामा भावुक झाले होते. तुमचे हे उपकार मी कधी फेडेल माहित नाही किंवा मी फेडू शकणार नसल्याच्या भावना व्यक्त केल्या.

अशोक सराफ यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान
Follow us
| Updated on: Feb 23, 2024 | 3:15 PM

मुंबई : अभिनयसम्राट अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2023 ने सन्मानित करण्यात आलं आहे. कलाक्षेत्रातील भरीव योगदानासाठी अशोक सराफ यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार’ देत गौरवण्यात आलं. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री सुधीर मुनगंटीवार, मंत्री दीपक केसरकर, मनीषा कायंदे उपस्थित होते. पुरस्कार मिळाल्यावर अशोक सराफ यांनी दोन शब्द मांडताना सर्व प्रेक्षकांचे आभार मानले.

अशोक सराफ काय म्हणाले?

महाराष्ट्रातील सर्वात मोठा आणि एक नंबरचा पुरस्कार मला प्रदान केलात त्याचा मला खरोखरच खरोखरंच आनंद होत आहे. कारण ज्या महाराष्ट्रामध्ये मी जन्मलो, माझ्या कर्मभूमीत माझा सत्कार केला, याच्यापेक्षा कोणती मोठी गोष्ट नाही. महाराष्ट्र शासनाने त्याबद्दल मी अभिनंदन करतो. त्यांनी मला या पदावर बसवलं, कारण ज्या लोकांना हा पुरस्कार प्राप्त झालाय ती यादी खूप मोठ्या लोकांची आहे. मला या यादीमध्ये तुम्ही बसवलं ही माझ्यासाठी कधीही न विसरणारी गोष्ट असल्याचं अशोक सराफ म्हणाले.

माझी पन्नास वर्षाची कारकिर्द झाली, आता मला आठवतही नाही की कोणासोबत काय काम केलं. एक मात्र आहे की या प्रवासामध्ये ज्यांनी ज्यांनी मला मदत केली. यामध्ये दिग्दर्शक, माझे सहकलाकार, सोबत काम करणारे कामगार यांनी जर मला पाठिंबा दिला नसता तर मला वाटत नाही की मी या पदावर पोहोचलो नसतो. शेवटी तुम्ही सर्व प्रेक्षक ही सर्व त्यांचीच किमया असल्याचंही अशोक सराफ यांनी सांगितलं.

 प्रेक्षक अतिशय बुद्धिमान आणि खडूस- अशोकमामा

महाराष्ट्राचा जो प्रेक्षक आहे तो अतिशय बुद्धिमान आणि खडूस आहे. कारण त्यांना जर आवडलं तर डोक्यावर घेतील नाही तर पाहणारही नाहीत. अशा प्रेक्षकांसमोर काहीही सादर करून चालणार नाही. आपल्याला नेहमी भान ठेवावं लागतं की समोर बसलेल्या प्रेक्षकांना आवडेल का? मग त्यावेळी आमच्या आणि दिग्दर्शकाला आवडेल की नाही हा प्रश्न वेगळा पण प्रेक्षकांना आवडलं पाहिजे, हाच दृष्टीकोन समोर मी आतापर्यंत ठेवला. कारण श्रेष्ठ शेवटी प्रेक्षकच, असं अशोक सराफ म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी फडणवीसांनी असं काय सांगितलं की मुंडेंनी राजीनामा दिला
मुख्यमंत्र्यांनी फडणवीसांनी असं काय सांगितलं की मुंडेंनी राजीनामा दिला.
हकालपट्टीनंतरही सुटका नाही, 'त्या' खंडणीची बैठक मुंडेंच्या बंगल्यावरच!
हकालपट्टीनंतरही सुटका नाही, 'त्या' खंडणीची बैठक मुंडेंच्या बंगल्यावरच!.
शास्त्रींकडून हैवानांच्या मानसिकतेची दखल, 'त्या' विधानावर टीकेची झोड
शास्त्रींकडून हैवानांच्या मानसिकतेची दखल, 'त्या' विधानावर टीकेची झोड.
राजीनामा द्या, नाहीतर..; मुख्यमंत्र्यांच्या धमकीनंतर मुंडेंचा राजीनामा
राजीनामा द्या, नाहीतर..; मुख्यमंत्र्यांच्या धमकीनंतर मुंडेंचा राजीनामा.
राज्यपालांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा स्वीकारला
राज्यपालांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा स्वीकारला.
धनंजय मुंडेंचा राजीनामा; अहिल्यानगरमध्ये मराठा समाजाने वाटली साखर
धनंजय मुंडेंचा राजीनामा; अहिल्यानगरमध्ये मराठा समाजाने वाटली साखर.
औरंगजेबाच्या कौतुकानंतर आता आझमींचा यु-टर्न, 'अपमान केला नाही पण...'
औरंगजेबाच्या कौतुकानंतर आता आझमींचा यु-टर्न, 'अपमान केला नाही पण...'.
Video : देशमुख हत्येप्रकरणी बीड जिल्हा सुन्न, 100% बंद.. एकच शुकशुकाट
Video : देशमुख हत्येप्रकरणी बीड जिल्हा सुन्न, 100% बंद.. एकच शुकशुकाट.
संतोष देशमुख हत्येचा निकाल 90 दिवसांत लावा, अन्यथा..
संतोष देशमुख हत्येचा निकाल 90 दिवसांत लावा, अन्यथा...
'लाडक्या बहिणीं'नो Good News..सरकारकडून लाभार्थ्यी महिलांना मोठं गिफ्ट
'लाडक्या बहिणीं'नो Good News..सरकारकडून लाभार्थ्यी महिलांना मोठं गिफ्ट.