“लवकरच क्रांतिकारी निर्णय घेणार”; विधानसभेच्या अध्यक्षांकडे राज्याचे लक्ष…
भविष्यात राहुल नार्वेकर नेमका काय निर्णय घेणार याकडेही राज्यातील विरोधकांसह सत्ताधाऱ्यांचेही लक्ष लागून राहिले आहे. त्यामुळे आगामी काळात राहुल नार्वेकर कोणता क्रांतिकारी निर्णय घेतात याची उत्सुकता लागून राहिली आहे.
मुंबई : राज्यात महाविकास आघाडीच्या सरकारला एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे पायउतार व्हावे लागले होते. तेव्हापासून एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि ठाकरे गटामध्ये जोरदार युद्ध रंगले आहे. त्यातच ज्या बंडखोर आमदारांमध्ये 16 अपात्र आमदारांच्या प्रश्नामुळे हे राजकारण आणखी तापले आहे. एकीकडे सरकार आणि महाविकास आघाडीमध्ये वाकयुद्ध रंगले असताना आता विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या एका विधानामुळे जोरदार चर्चा सुरु झाली आहे. राहुल नार्वेकर यांनी विधानसभेत बोलताना सांगितल की,ज्या प्रमाणे 1977 साली बाळासाहेब देसाई यांनी ज्या प्रमाणे विधानसभेचे अध्यक्षपद भूषवले होते आणि क्रांतिकारी निर्णय घेतले होते, त्या प्रमाणे मी सुद्धा क्रांतिकारी निर्णय घेणार असल्याचे सांगितल्याने आता चर्चेला उधान आले आहे.
महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आल्यापासून ठाकरे गटातून बंडखोरी केलेल्या 16 आमदारांच्या अपत्रातेचा विषय प्रलंबित आहेत. त्यामुळे त्या अपात्र आमदारांच्या प्रलंबित प्रश्नावर राहुल नार्वेकर काय भूमिका घेणार यावरून त्यांच्या वक्तव्याचा अर्थ लावला जात आहे.
त्यामुळे भविष्यात राहुल नार्वेकर नेमका काय निर्णय घेणार याकडेही राज्यातील विरोधकांसह सत्ताधाऱ्यांचेही लक्ष लागून राहिले आहे. त्यामुळे आगामी काळात राहुल नार्वेकर कोणता क्रांतिकारी निर्णय घेतात याची उत्सुकता लागून राहिली आहे.
विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आपण क्रांतिकारी निर्णय घेणार असे सभागृहातच सांगताच हशा पिकला असला तरी आता ते कोणता निर्णय घेणार याची उत्सुकता लागून राहिली आहे.
यावेळी त्यांनी सभागृहातील सदस्यांना सांगितले की, चिंता करण्याची काहीही गरज नाही, आपण मेरिटनुसारच निर्णय घेणार आहे असं सांगितल्यामुळे आता त्यांच्या या निर्णयाकडे लक्ष लागून राहिले आहे.
यावेळी त्यांनी बाळासाहेब देसाई यांची आठवण काढून सांगितले की, 1977 साली ज्या प्रमाणे बाळासाहेब देसाई यांनी विधानसभेच्या अध्यक्ष पदावरून निर्णय घेतला होता. त्याच प्रमाणे आपणही क्रांतिकारी निर्णय घेणार असून सदस्यांनी कोणत्याही प्रकारची चिंता करण्याची गरज नाही असंही त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.