मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावरील हल्ल्यामागे कुणाचा हात? ‘राज’कारण तापलं

मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडेंवर हल्ला झाला. त्यानंतर मनसे विरुद्ध ठाकरे गटाचे नेते आमनेसामने आलेत. कारण हल्ल्यामागे वरुण सरदेसाई आणि संजय राऊत असल्याचा आरोप सुरु झालाय.

मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावरील हल्ल्यामागे कुणाचा हात? 'राज'कारण तापलं
Follow us
| Updated on: Mar 04, 2023 | 2:10 AM

मुंबई | मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडेंवर हल्ला झाला. त्यानंतर मनसे विरुद्ध ठाकरे गटाचे नेते आमनेसामने आलेत. कारण हल्ल्यामागे वरुण सरदेसाई आणि संजय राऊत असल्याचा आरोप सुरु झालाय. मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडेवर, जीवघेणा हल्ला झालाय. दादरच्या शिवाजी पार्कात मार्निंग वॉकसाठी आलेल्या देशपांडेंवर अज्ञातांनी रॉड आणि स्टम्पनं हल्ला केला. ज्यात संदीप देशपांडेंच्या हाताला आणि पायाला दुखापत झाली. हल्ला करताच, हल्लेखोरांनी पळ काढला. मात्र कोणी हल्ला केला हे माहिती असून हल्लेखोरांना भीक घालणार नाही, असं देशपांडे म्हणालेत.

हल्ल्यानंतर जखमी देशपांडेंना हिंदूजा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. त्यांच्या विचारपूस करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि अमित ठाकरेही आले. तर गंभीर इजा नसल्यानं उपचार करुन संदीप देशपांडेंना डिस्चार्ज देण्यात आला. अज्ञातांविरोधात हत्येचा प्रयत्न आणि धमकी देणे अशा कलमाखाली गुन्हा नोंदवण्यात आलाय.

संदीप देशपांडेंनी पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार, हल्लेखोरांनी वरुण सरदेसाई, संजय राऊतांना लिहिलेलं पत्र, आणि उद्धव ठाकरेंच्या विरोधात घेत असलेल्या भूमिकेचा उल्लेख केल्याचं सांगितलंय.

तर विधानसभेत भाजपचे आमदार नितेश राणेंनीही देशपांडेंवरील हल्ला प्रकरणात विधानसभेत वरुण सरदेसाईंचं नाव घेतलंय. आता ज्या पत्राचा उल्लेख देशपांडेंच्या जबाबात झालाय. ते पत्र देशपांडेंनी काही दिवसांआधीच राऊतांना लिहिलं होतं.

गेल्या काही महिन्यांपासून आपल्या भाषेचा स्तर खालावला आहे. आपली चिडचिड होताना दिसत आहे. कधी कधी तर नैराश्याचे झटकेही येऊ लागतात. माणूस अटेंशन सिकिंग होतो. तुम्ही कितीही नाकारलं तरी ही सगळी लक्षणं तुमच्यात दिसायला लागली आहेत. हे सगळं हाताबाहेर जाण्याआधीच काळजी घ्यायला हवी. सर्वात महत्वाचं म्हणजे आपणच सगळ्यांना आदरणीय पवार साहेबांच्या नादी लावलं आणि त्यामुळेच शिवसेना हातून गेली ही सल मनाला लावून घेतली आहे. ती मनातून काढून टाका. तुम्ही एकटेच या ऱ्हासाला जबाबदार नाहीत. उद्धव साहेब आणि आदित्य साहेब सुद्धा तेवढेच जबाबदार आहेत.

राऊतांनी देशपांडेवरील हल्ल्याचा निषेध केलाय. पण हल्ल्यावरुन स्वत: देशपांडेचा रोख संजय राऊत आणि वरुण सरदेसाईंवर आहे. त्यातच अमेय खोपकरांनी या दोघांनाही चिंधी चोर गुंड म्हटलंय.

गेल्या काही महिन्यांआधी संदीप देशपांडे ठाकरे गटाच्या नेत्यांवर आक्रमक झालेत. कोरोनाच्या काळापासून, त्यांनी महापालिकेत घोटाळा झाल्याचाही आरोप केलाय. ज्या शिवाजी पार्कात देशपांडेंवर हल्ला झाला.त्या परिसरातला CCTV कॅमेरा खराब असल्याचंही कळतंय. त्यामुळं हल्लेखोरांना शोधण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे. तर मनसेचे नेते मात्र घुसून मारण्याची भाषा करतायत. हल्ल्यावरुन मनसेच्या नेत्यांनी ठाकरे गटाच्या नेत्यांवर केलेले आरोप गंभीर आहेत .आता पोलिसांचा तपास सुरु आहे. त्यामुळं तपासातून सत्य समोर येईलच.

काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.