Sanjay Raut : भाजपा विजयी होताच मराठी माणसांवर हल्ल्याला सुरुवात, संजय राऊतांचा गंभीर आरोप

Sanjay Raut attack On BJP : प्रचंड बहुमत मिळूनही गेल्या आठवडाभरापासून महायुतीला सरकार स्थापन करता येत नसल्याबाबत खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपाला चिमटा काढला आहे. त्यांनी भाजपा सत्तेवर आल्यापासून मुंबईत मराठी माणसावर हल्ले वाढल्याचा घणाघात केला. त्यांना गुजराती, मारवाडी बोल्यास सक्ती करण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला.

Sanjay Raut : भाजपा विजयी होताच मराठी माणसांवर हल्ल्याला सुरुवात, संजय राऊतांचा गंभीर आरोप
संजय राऊतांचा भाजपावर घणाघात
Follow us
| Updated on: Dec 04, 2024 | 10:54 AM

राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडींवर संजय राऊत यांनी महायुतीला चिमटा काढला. प्रचंड बहुमत मिळवून सुद्धा महायुतीला सत्ता स्थापन करण्यास वेळ लागत असल्याबाबत त्यांनी भाजपावर निशाणा साधला. त्यांनी राज्यात सुरू असलेल्या नाराजी नाट्याला दिल्लीचे बळ असल्याचा आरोप केला. तर राज्यात भाजपा विजयी झाल्यापासून मुंबईत मराठी माणसांवर हल्ले वाढल्याचा आरोप केला. मराठी माणसांना गुजराती, मारवाडी बोलण्यास सांगण्यात येत असल्याचे ते म्हणाले. त्यांनी राज्यातील घडामोडींवरून भाजपावर घणाघात केला.

सरकार स्थापन्याचा खेळखंडोबा

महाराष्ट्रात सरकार स्थापन करणे हा खेळखंडोबा होऊन बसल्याची टीका राऊत यांनी केली. इतकं प्रचंड बहुमत मिळालं आहे. मुख्यमंत्री कोण होणार हे ठरलं आहे, मात्र मुख्यमंत्री पदासाठी काटे की टक्कर सुरू आहे. बहुमत मिळून भाजप वेळेवर सरकार स्थापन करू शकत नाही. अंतर्गत कुरघोडीमुळे भाजपला हे कठीण जात आहे तर सरकार चालवताना काय होईल, असा निशाणा त्यांनी यावेळी भाजपावर साधला.

हे सुद्धा वाचा

मराठी माणसांवर हल्ले

भाजपाचा विजय झाल्यापासून मराठी माणसांवर हल्ले सुरू झाले आहेत. मराठी बोलू नका, मारवाडी गुजराती बोला अशा धमक्या देत आहेत. मराठी माणसाला उचलून आणण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्याआजूबाजूचे उपरे अशा धमक्या देत आहेत, असा घणाघात संजय राऊत यांनी केला. राज्यात सुरु असलेल हे चित्र अत्यंत गंभीर आहे. मुंबई मराठी माणसांच्या रक्तातून तयार झाली आहे. आम्ही मराठी माणसाच्या हक्कासाठी लढत आहोत. मराठी खपवून घेतल जात नाही अशा धमक्या दिल्या जात आहेत. राज्याची कशी लूट होईल याचा ट्रेलर आम्ही ८ दिवसांपासून पाहत आहोत, असा टोला त्यांनी लगावला.

जिंकल्याचा आनंद साजरा करू द्या

त्यांनी महायुतीच्या आझाद मैदानावरील शपथविधी सोहळ्यावर पण चिमटा काढला. हा राज्याचा ग्रँड सोहळा आहे. परदेशातून कोणी बोलवत आहेत का हे पाहावं लागेल, असा मिष्कील टोला त्यांनी हाणला. ते जिंकले आहेत, त्यांचा आनंद त्यांना साजरा करु द्या, असा चिमटा राऊतांनी यावेळी काढला.

हारण्याची कारणमीमांसा काय?

या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला कामगिरी बजावता आली नाही. त्याबद्दल त्यांनी मतं व्यक्त केले. महाविकास आघाडीला दोष देण्याचा प्रश्न येत नाही. आमच्यात काही चुका झाल्या असतील पण आमचा निवडणुकीत एकोपा होता. निवडणुका का हरलो हे आता हळू हळू समोर येत आहे. महिला खासदारांनी केलेली तक्रार हा काँग्रेसचा अंतर्गत विषय आहे. आम्ही का हरलो हे येत्या काळात समजेल. यावर काँग्रेसकडून अधिकृत कोण काही बोललं नाही, बोलल्यावर बघू, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

‘शिवेंद्रराजे यांना मंत्रिपद द्या, नाहीतर...’,पोलीस कर्मचाऱ्याचा इशारा
‘शिवेंद्रराजे यांना मंत्रिपद द्या, नाहीतर...’,पोलीस कर्मचाऱ्याचा इशारा.
'... मी तर शपथ घेणार, थांबणार नाही', दादांच्या वक्तव्यानंतर सगळेच हसले
'... मी तर शपथ घेणार, थांबणार नाही', दादांच्या वक्तव्यानंतर सगळेच हसले.
'फडणवीसांनी माझं नाव सुचवलं, आता मी...', शिंदेंनी सांगितला तो किस्सा
'फडणवीसांनी माझं नाव सुचवलं, आता मी...', शिंदेंनी सांगितला तो किस्सा.
शिंदे DCM पद स्वीकारणार? मंत्रिमंडळात असणार की नाही? फडणवीस म्हणाले..
शिंदे DCM पद स्वीकारणार? मंत्रिमंडळात असणार की नाही? फडणवीस म्हणाले...
महायुतीचे तिन्ही नेते राजभवनावर, राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा
महायुतीचे तिन्ही नेते राजभवनावर, राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा.
पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळणार? सवाल करताच स्पष्टच म्हणाल्या...
पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळणार? सवाल करताच स्पष्टच म्हणाल्या....
देवेंद्र फडणवीसांनी गटनेतेपदाच्या भाषणातून ठाकरेंना केलं थेट टार्गेट
देवेंद्र फडणवीसांनी गटनेतेपदाच्या भाषणातून ठाकरेंना केलं थेट टार्गेट.
'पुढची वाट संघर्षाची पण...', गटनेते होताच फडणवीसांचं पहिलं दमदार भाषण
'पुढची वाट संघर्षाची पण...', गटनेते होताच फडणवीसांचं पहिलं दमदार भाषण.
विधीमंडळाच्या गटनेतेपदी फडणवीसच, चंद्रकांतदादांकडून घोषणा अन्...
विधीमंडळाच्या गटनेतेपदी फडणवीसच, चंद्रकांतदादांकडून घोषणा अन्....
रक्त सांडले जिथे मी.., सदाभाऊंकडून फडणवीसांचं कौतुक अन् केली खास कविता
रक्त सांडले जिथे मी.., सदाभाऊंकडून फडणवीसांचं कौतुक अन् केली खास कविता.