मुंबई: काँग्रेस नेते आणि मंत्री अस्लम शेख यांनी मुंबईला दोन आयुक्त देण्याची मागणी केली आहे. मुंबईला दोन आयुक्त देण्याची शेख यांची मागणी निंदनीय असून या मागणी आडून मुंबईचे तुकडे करण्याचे काँग्रेसचे षडयंत्र आहे. पण काँग्रेसचे हे षडयंत्र भाजप कधीही यशस्वी होऊ देणार नाही, असा इशारा भाजप नेते, आमदार अतुल भातखळकर यांनी दिला आहे. (atul bhatkhalkar slams aslam shaikh )
अतुल भातखळकर यांनी एक पत्रक काढून हा इशारा दिला आहे. अस्लम शेख हे गेल्या 11 वर्षांपासून मालाडचं प्रतिनिधीत्व करत आहेत. त्यांच्या मतदारसंघातील नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यांच्या विभागात अनेक समस्या आहेत. त्या दूर कराव्यात असं त्यांना कधी वाटलं नाही. तसे प्रयत्नही त्यांनी केले नाहीत. परंतु, मी आमदार झाल्यापासून मालाड पूर्व, कुरार गाव, दिंडोशी येथील नागरिकांचे हेलपाटे थांबावे याकरिता वेगळा प्रशासकीय प्रभाग व्हावा यासाठी सतत पाठपुरावा करत होतो. माझ्या मागणीवरून मुंबई मनपाच्या पी/उत्तर वार्डचे विभाजन करून पी/पूर्व व पी/पश्चिम असे दोन प्रशासकीय प्रभाग करण्याचा निर्णय मुंबई मनपाने घेतला आहे. माझ्या या कामालामुळे पोटशूळ उठल्यानेच शेख यांनी आता मुंबईला दोन पालिका आयुक्त नेमण्याची मागणी केल्याचा आरोप भातखळकर यांनी केला आहे.
मुंबईसाठी दोन आयुक्त नेमून त्यामाध्यमातून मुंबईचे दोन तुकडे करण्याचा काँग्रेसचा डाव आहे. पण त्यांची ही खेळी आम्ही कधीच यशस्वी होऊ देणार नाही. असा काही प्रयत्न झाल्यास भाजप त्याला कडाडून विरोध करेल, असा इशाराही त्यांनी दिला.
मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी
शिवसेनेने आजवर मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या नावाने कायम राजकारण केले. आज उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत. अस्लम शेख त्यांच्या मंत्रिमंडळात आहेत. त्यामुळे आता शेख यांच्या मागणीवर शिवसेनेची काय भूमिका आहे? हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली. (atul bhatkhalkar slams aslam shaikh )
VIDEO : 36 जिल्हे 72 बातम्या pic.twitter.com/zmE4geSb6R
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 8, 2021
संबंधित बातम्या:
काल भाजप सदस्यांचा धनंजय मुंडेंना पाठिंबा, आज पंकजांची बोचरी टीका
फडणवीसांसह महाराष्ट्रातील 3 नेते दिल्लीत, जेपी नड्डांशी खलबतं, कारण काय?
उद्धव ठाकरेंकडून हकालपट्टी, शरद पवारांच्या उपस्थितीत महेश कोठे राष्ट्रवादीत
(atul bhatkhalkar slams aslam shaikh )