आता भाजपचा नवा आरोप; मंत्र्याच्या आदेशावरुन संजय राठोड प्रकरणात ऑडिओ क्लीपशी छेडछाड
संजय राठोड प्रकरणातील ऑडिओ क्लीप्स सांताक्रुझ येथील फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आल्या आहेत. | Chitra wagh sanjay Rathod

मुंबई: संजय राठोड प्रकरणात अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या ऑडिओ क्लीपशी छेडछाड केली जात आहे, असा आरोप भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी केला आहे. महाविकासआघाडी सरकारमधील कुठल्या मंत्र्याच्या किंवा व्यक्तीच्या सांगण्यावरून क्लीपशी छेडछाड केली जात आहे? सरकार संजय राठोड यांना वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा संशय आम्हाला आहे. तेव्हा सरकारने कुठलीही हेराफेरी न करता सत्य महाराष्ट्राच्या जनतेसमोर आणावे, अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली. (audio clip tampering in sanjay rathod case says bjp chitra wagh)
यापूर्वी भाजप नेते आशिष शेलार यांनी संजय राठोड आणि मनसुख हिरेन प्रकरणात पुराव्यांशी छेडछाड केली जात असल्याचा आरोप केला होता. संजय राठोड प्रकरणातील ऑडिओ क्लीप्स सांताक्रुझ येथील फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आल्या आहेत. तो आवाज संजय राठोड यांचा नाहीच, असा अहवाल तयार करण्यासाठी या क्लीप्समध्ये पोलीस यंत्रणेमार्फत छेडछाड होण्याची शक्यता असल्याची भीती आशिष शेलार यांनी व्यक्त केली.
सचिन वाझे संन्याशी आहे म्हणून अटक केली का?: नारायण राणे
शिवसेना नेते संजय राऊत सचिन वाझे यांची बाजू घेत होते. मग आता सचिन वाझे यांना का पकडले? सचिन वाझे संन्याशी होता म्हणून त्याला पकडले का, असा सवाल भाजप खासदार नारायण राणे यांनी उपस्थित केला.
शिवसेनेचा आणि मुख्यमंत्र्यांचा सचिन वाझे कंपनीला सपोर्ट होता. निलंबित असताना त्यांना तातडीचे कारण देऊन पोलीस सेवेत सामावून घेण्यात आले. त्यांच्याकडे सुशांत सिंह आणि दिशा सॅलियनसारख्या महत्त्वाच्या प्रकरणांचा तपास सोपवण्यात आला.
आतादेखील सचिन वाझेने खंडणीसाठी मनसुख हिरेनसारख्या निरपराधा माणसाला मारले. हे राज्य चालवण्यासाठी उद्धव ठाकरे समर्थ नाहीत. राज्यात कायदा-सुव्यवस्था राहिली नाही. पोलिसांच्या कामात हस्तक्षेप होत आहे. याची नैतिक जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी नारायण राणे यांनी केली.
(audio clip tampering in sanjay rathod case says bjp chitra wagh)