Baba Siddiqui : एका आरोपीची वयाबाबत मोठी खेळी, काय केला दावा, न्यायालयाने का मागितले आधार कार्ड

Baba Siddiqui Shot Dead : बाबा सिद्दीकी यांच्या हत्ये प्रकरणात पोलिसांनी दोन मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळल्या. तर तिसरा फरार आरोपी पण लवकरच त्यांच्या ताब्यात येईल. दरम्यान मारेकऱ्यांची आरोग्य तपासणी झाल्यानंतर त्यांना किल्ला न्यायालयात पोलिसांनी हजर केले असता त्यातील एकाने मोठी खेळी खेळली.

Baba Siddiqui : एका आरोपीची वयाबाबत मोठी खेळी, काय केला दावा, न्यायालयाने का मागितले आधार कार्ड
आरोपीची वयाबाबत मोठी खेळी, कोर्टाने मागितले आधार कार्ड
Follow us
| Updated on: Oct 13, 2024 | 3:40 PM

माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणात अजून नवीन ट्विस्ट आला आहे. काल शनिवारी रात्री त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. रेकी केल्यानंतर आणि पाळत ठेवल्यानंतर तीन आरोपींनी त्यांच्यावर जवळून गोळीबार केला. त्यात त्यांचा मृत्यू झाला होता. लॉरेन्स बिश्नोई गँगने या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. दरम्यान पोलिसांनी रात्रीतूनच तपासचक्र फिरवत मारेकऱ्यांना अटक केली. त्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यानंतर आरोपींना किल्ला कोर्टात हजर करण्यात आले. तेव्हा एका आरोपीने वयाबाबत मोठी खेळी खेळल्याचे समोर आले आहे.

मी तर अल्पवयीन

माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणात कोर्टात आरोपीने वयाबाबत कोर्टासमोर मोठा खुलासा केला. त्याच्या मते तो केवळ 17 वर्षांचा असून त्याला अल्पवयीन म्हणून या प्रकरणात ग्राह्य धरावं.सुनावणीदरम्यान कोर्टाने प्रश्न विचारताच आरोपीने स्वत:चे वय 17सांगितलं. अल्पवयीन आरोपी म्हणून ट्रिटमेंट मिळवण्यासाठी आरोपीने ही माहिती दिली. आरोपीच्या वकिलाने पण आरोपीचे वय 17 असल्याचं युक्तिवाद केला. कोर्टाने आरोपी धर्मराज कश्यपचे आधार कार्ड मागवले. नेमक वय काय हे स्पष्ट होण्यासाठी कोर्टाने आरोपीचे आधार कार्ड मागितले.

हे सुद्धा वाचा

शिवानंद पळणार तरी कुठपर्यंत?

माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणाचा छडा मुंबई पोलिसांनी लागलीच लावला. अवघ्या काही तासातच पोलिसांनी धागेदोरे शोधले. पोलिसांनी तीन ही मारेकऱ्यांची कुंडलीच बाहेर काढली. करनैल सिंह आणि धर्मराज कश्यप तर शिवानंद असे तिघे मारेकरी आहेत. लॉरेन्स बिष्णोई गँगेशी संबंधित या आरोपींची शिताफीने ओळख पटवण्यात आली आहे. तिसरा आरोपी शिवानंद राज्यबाहेर पळाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. त्याचे शेवटचे लोकेशन पनवेल आढळले. तो तिथल्या सीसीटीव्हीत कैद झाला होता. त्याला पकडण्यासाठी पोलिसांचे पथक त्याच्या मागावर धाडण्यात आली आहे. आरोपींच्या शोधासाठी उज्जेन (मध्यप्रदेश), हरियाणा, यूपी, दिल्ली या ठिकाणी गुन्हे शाखेची पथक गेली आहेत. बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार करणारा तिसरा आरोपी शिवानंद हा गुरमेल कैथल जिल्ह्यातील नरड या गावचा आहे. 2019 मध्ये एका तरुणाच्या हत्येप्रकरणात तो काही दिवस जिल्हा कारागृहात होता. जामीन मिळाल्यानंतर तो मुंबईत आला होता.

'अंधारे अन् राऊत मोठे नेते, एक वाघ्या अन् ती मुरळी',मनसे नेत्याची टीका
'अंधारे अन् राऊत मोठे नेते, एक वाघ्या अन् ती मुरळी',मनसे नेत्याची टीका.
फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं कधीपर्यंत चालणार 'लाडकी बहीण' योजना?
फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं कधीपर्यंत चालणार 'लाडकी बहीण' योजना?.
बाबा सिद्दीकींवर गोळ्या झाडून पळून जाणाऱ्या आरोपीचा व्हिडीओ व्हायरल
बाबा सिद्दीकींवर गोळ्या झाडून पळून जाणाऱ्या आरोपीचा व्हिडीओ व्हायरल.
'मविआ'ची पत्रकार परिषद, ठाकरे-पटोले अन् पवार यांचा कोणावर हल्लाबोल?
'मविआ'ची पत्रकार परिषद, ठाकरे-पटोले अन् पवार यांचा कोणावर हल्लाबोल?.
निवडणुकीला पैसे वाटले, नक्की घ्या, कारण..., राज ठाकरे काय बोलून गेले?
निवडणुकीला पैसे वाटले, नक्की घ्या, कारण..., राज ठाकरे काय बोलून गेले?.
विधानसभेचे राज ठाकरेंनी रणशिंग फुंकले; 'ना युत्या, ना आघाड्या आपण… '
विधानसभेचे राज ठाकरेंनी रणशिंग फुंकले; 'ना युत्या, ना आघाड्या आपण… '.
'फुकट कसले पैसे देताय?', 'लाडकी बहीण'वरून राज ठाकरेंचे सरकारवर ताशेरे
'फुकट कसले पैसे देताय?', 'लाडकी बहीण'वरून राज ठाकरेंचे सरकारवर ताशेरे.
...म्हणून बाबा सिद्दीकींची हत्या केली, बिश्नोई गँगचा मोठा खुलासा उघड
...म्हणून बाबा सिद्दीकींची हत्या केली, बिश्नोई गँगचा मोठा खुलासा उघड.
भुजबळांचा सरकारला घरचा आहेर; हत्येची जबाबदारी गृहमंत्र्यांची नाही तर…
भुजबळांचा सरकारला घरचा आहेर; हत्येची जबाबदारी गृहमंत्र्यांची नाही तर….
'तुम्ही सिंघम ना, आता राष्ट्रपतींनी तुम्हाला परमवीर चक्र द्यायचं का?'
'तुम्ही सिंघम ना, आता राष्ट्रपतींनी तुम्हाला परमवीर चक्र द्यायचं का?'.