Baba Siddiqui : बाबा सिद्दीकींच्या तिसरा मारेकरी सीसीटीव्हीत कैद, रिक्षातून पळाला, कुर्ल्यात आला, त्यानंतर थेट… पोलिसांनी अशी केली कारवाई
Baba Siddiqui Shot Dead : माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणाचा छडा मुंबई पोलिसांनी अवघ्या काही तासात लावला. रात्रीपासूनच पोलिसांनी झटपट निर्णय घेत या प्रकरणाचे धागेदोरे शोधून काढले. याप्रकरणातील तीन ही मारेकऱ्यांची कुंडलीच बाहेर आली. बिष्णोई गँगेशी संबंधित आरोपींची अशी धरपकड झाली आहे.
माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणाचा छडा मुंबई पोलिसांनी झटपट लावला. अवघ्या काही तासातच पोलिसांनी धागेदोरे शोधले. पोलिसांनी तीन ही मारेकऱ्यांची कुंडलीच बाहेर काढली. लॉरेन्स बिष्णोई गँगेशी संबंधित या आरोपींची शिताफीने ओळख पटवण्यात आली आहे. तर तिसरा आरोपी लवकरच पोलिसांच्या तावडीत गावणार आहे. पोलिसांचा तपास प्रगतीपथावर आहे. पोलिसांनी प्रमुख भागातील सीसीटीव्ही फुटेज शोधून त्याचे लोकेशन शोधले आहे.
अखेर पनवेलमध्ये सापडला
बाबा सिद्धीकी यांची हत्या करून आरोपी शिवानंद पळाला. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतल्यानंतर पोलीस शिवानंदच्या मागावर होती. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी हा आरोपी ज्या ज्या मार्गाने पळाला त्या त्या ठिकाणचे सीसीटिव्ही तपासले. आरोपीने वांद्रेहून रिक्षाने कुर्ला स्थानक गाठले, कुर्लाहून हार्बर ट्रेन पकडून आरोपी पनवेल स्थानकावर गेल्याचे तपासात समोर आले.
सीसीटिव्हीचा माग काढत पोलिसांना तो शेवटी पनवेलमधील सीसीटिव्हीत आढळून आला आहे. पनवेलहून आरोपी एक्सप्रेसच्या मदतीने राज्याबाहेर गेल्याचा पोलिसांना संशय आहे. आरोपींच्या शोधासाठी उज्जेन (मध्यप्रदेश), हरियाणा, यूपी, दिल्ली या ठिकाणी गुन्हे शाखेची पथक गेली आहेत.
शिवानंद हरियाणातील कैथल जिल्ह्यातील
बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार करणारा तिसरा आरोपी शिवानंद हा गुरमेल कैथल जिल्ह्यातील नरड या गावचा आहे. 2019 मध्ये एका तरुणाच्या हत्येप्रकरणात तो काही दिवस जिल्हा कारागृहात होता. जामीन मिळाल्यानंतर तो मुंबईत आला. याठिकाणी त्याची ओळख लॉरेन्श बिश्नोईच्या शूटरसोबत झाली. जिल्हा कारागृहातच तो या गँगच्या काही सदस्यांच्या संपर्कात आला होता. गावातील लोकांच्या दाव्यानुसार, त्याच्या आई-वडिलांचा मृत्यू झाला आहे. कित्येक वर्षापासून त्याने गावचे तोंड सुद्धा पाहिलेले नाही. इतर दोन साथीदाराच्या मदतीने त्याने अगोदर बाबा सिद्दीकी यांच्या घराची आणि कार्यालयाची रेकी केली. हे तीनही आरोपी गेल्या दोन ते दीड महिन्यांपासून मुंबईतच होते. ते बाबा सिद्दीकी यांच्यावर पाळत ठेवत होते. मुंबई गुन्हे शाखा प्रकरणात पुढील तपास करत आहे. इतर आरोपींचा आणि पिस्तूल पुरवणाऱ्यांचा आता शोध सुरू झाला आहे.