Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्विमिंग पूलात मगरीचे पिल्लू आले कुठून ? एमआरटीपी कायद्यानूसार कारवाई

स्विमिंग पुलात अचानक मगरीचे पिल्लू आढळल्याने खळबळ उडाली होती. आता पालीकेने या प्रकरणात एमआरटीपी कायद्यानूसार कारवाई केली आहे.

स्विमिंग पूलात मगरीचे पिल्लू आले कुठून ? एमआरटीपी कायद्यानूसार कारवाई
baby crocodile Image Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Oct 10, 2023 | 7:14 PM

मुंबई | 10 ऑक्टोबर 2023 : दादर येथील मुंबई महानगर पालिकेच्या स्विमिंग पूलात चक्क मगरीचे पिल्लू आढळल्याने काही दिवसांपूर्वी खळबळ उडाली होती. मगरीचे हे पिल्लू नेमके कोठून आले याविषयी तर्कवितर्क सुरु असताना या पालिकेच्या स्विमिंग पुलाशेजारी असलेल्या एका प्राणी संग्रहालयावर मुंबई महानगर पालिका आणि वनखात्याने कारवाई केली आहे. या प्राणी संग्रहालयातूनच हे मगरीचे पिल्लू स्विमिंग पुलात शिरल्याचा आरोप होत आहे.

दादर येथील मुंबई महानगर पालिकेच्या महात्मा गांधी जलतरण तलावात मगरीचे एक छोटे पिल्लू आढळल्याने एक खळबळ उडाली होती. हे मगरीचे पिल्लू अचानक या तरणतलावात आले कुठून असा सवाल निर्माण झाला होता. मात्र आता या पुलाच्या शेजारी असलेल्या एका प्राणी संग्रहालयातून हे मगरीचे पिल्लू आले असल्याचा आरोप मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केला होता. या पुलाच्या शेजारी असलेल्या प्राणी संग्रहालयाच्या पडद्याखालून मगरीचे पिल्लू जात असल्याचे दिसत असल्याचा एक व्हिडीओही सादर करण्यात आला होता.

नुकसान कोण भरुन देणार

मुंबई महानगर पालिकेने एमआरटीपी कायद्यानूसार या प्राणी संग्रहालयाला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तसेच या प्राणी संग्रहायलात उभे केलेले शेड्स बेकायदा असून ते हटविण्यात आले आहेत. तसेच वन विभागाने देखील काही दिवसांपूर्वी येथे सर्च ऑपरेशन केले होते. तसेच येथून एका अजगराचे पिल्लू देखील जप्त करण्यात आले होते. दरम्यान, या प्राणी संग्रहालयाचे प्रमुख युवराज मोघे यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत. पालिकेने शेड्स हटविल्याने आता प्राण्याची काळजी कशी घेणार ? तसेच झालेले नुकसान कोण भरुन काढणार ? असा सवालही युवराज मोघे यांनी केला आहे.

संतोष देशमुख हत्या : घटनेचे सेल्फी घेताना आरोपी हसत खिदळत होते...
संतोष देशमुख हत्या : घटनेचे सेल्फी घेताना आरोपी हसत खिदळत होते....
विम्याच्या पैशांसाठी मुलाच्या मदतीने पत्नीनेच केला पतीचा खून
विम्याच्या पैशांसाठी मुलाच्या मदतीने पत्नीनेच केला पतीचा खून.
अबू आझमी यांच्या वादग्रस्त विधानानं वाद उफळणार, 'औरंगजेब हा उत्तम...'
अबू आझमी यांच्या वादग्रस्त विधानानं वाद उफळणार, 'औरंगजेब हा उत्तम...'.
धावत्या बससमोर बाईक, पुढे काय झालं बघा.. तुमच्याही काळजाचा चुकेल ठोका
धावत्या बससमोर बाईक, पुढे काय झालं बघा.. तुमच्याही काळजाचा चुकेल ठोका.
नांदेड - लातूर महामार्गावर बस उलटून भीषण अपघात
नांदेड - लातूर महामार्गावर बस उलटून भीषण अपघात.
'पीडितेचा मला फोन, अन्...', वसंत मोरेंसोबत 20 मिनिटं काय झाली चर्चा?
'पीडितेचा मला फोन, अन्...', वसंत मोरेंसोबत 20 मिनिटं काय झाली चर्चा?.
माणसं नाहीतर हैवान... देशमुखांच्या हत्येचे 15 फोटो अन् 3 व्हिडीओ समोर
माणसं नाहीतर हैवान... देशमुखांच्या हत्येचे 15 फोटो अन् 3 व्हिडीओ समोर.
सुप्रिया सुळेंनी केली स्वारगेटच्या बसस्थानकाची पाहाणी, म्हणाल्या..
सुप्रिया सुळेंनी केली स्वारगेटच्या बसस्थानकाची पाहाणी, म्हणाल्या...
फडणवीसांच्या भेटीनंतर मुंडे म्हणाले, मला बेल्स पाल्सी.. I Can't speak
फडणवीसांच्या भेटीनंतर मुंडे म्हणाले, मला बेल्स पाल्सी.. I Can't speak.
मनोज जरांगेंची प्रकृती अचानक बिघडली; सांभाजीनगरमध्ये उपचार सुरू
मनोज जरांगेंची प्रकृती अचानक बिघडली; सांभाजीनगरमध्ये उपचार सुरू.