एका भाकरीने काय होईल, दुसरी भाकरी टाकू; बच्चू कडू यांना नेमकं म्हणायचं काय?

दुसरी भाकर टाकू. एका भाकरीवर ताव मारून काय होणार. दुसरी भाकर तयार आहे, असं सूचक वक्तव्य बच्चू कडू यांनी केलं.

एका भाकरीने काय होईल, दुसरी भाकरी टाकू; बच्चू कडू यांना नेमकं म्हणायचं काय?
Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 04, 2023 | 7:17 PM

गिरीश गायकवाड, प्रतिनिधी, मुंबई : अजित पवार यांनी शिंदे-भाजप सरकारमध्ये प्रवेश केला. यावर बच्चू कडू यांनी मोठं विधान केलंय. बच्चू कडू म्हणाले, माझ्या वीस वर्षांच्या कारकिर्दीत हे पाच वर्षे महत्त्वाचे ठरले. सुरुवातीला उद्धव ठाकरे यांनी उठाव केला. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शिवसेना सहभागी होईल, असं स्वप्नातही पाहिलं नव्हतं. शिवसेना फुटून भाजपमध्ये जाईल, हेही आम्ही स्वप्नात पाहीलं नव्हतं. शिंदे गट आणि भाजप यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस येईल, हेही कुणी स्वप्नात पाहीलं नव्हतं. त्यामुळे हे पाच वर्षे उठावाचं वर्ष आहे. याला बंडखोरी म्हणता येणार नाही.

दम असणारे बाहेर येतात

वरिष्ठ नेत्यांविरोधात कनिष्ठ नेत्यांनी केलेला उठाव आहे. नवीन पिक्चर सुरू झाला आहे. उठाव करणे हा काही दोष नाही. ज्याच्यात दम असतो तो बाहेर येतो. यात हिरो आणि विलन कोणी नसतो. हे पिक्चरसारखं असतं, असं लोकांना वाटतं. यात सर्व हिरोच असतात. काही लोकं हरतात आणि काही लोकं जिंकतात.

नाराजी करून फायदा काय?

नाराजी करून फायदा काय. कधी नाराजी करायची आणि कधी नाराजी करायची नाही, हे सर्व आमदारांना माहीत असते. आता नाराजी करून काही फायदा नाही. जसं आहे तसं समजून घ्यायचं आनंदीत राहायचं. लोकांचे काम करायचे, असं बच्चू कडू यांनी म्हंटलं.

शिंदे-भाजप आणि राष्ट्रवादीचा एक गट हे सर्व एकत्र येणं हे आम्हाला पचणे कठीण झाले. लोकांना पचायला वेळ लागेल. रेग्यूलर जेवण असलं तर पचायला सोपं जातं. आता ताटचं बदललं आहे, हे पचायला लोकांना जड जाईल.

आम्ही गुलामीची अवस्था करून ठेवली

बाप मेला तरी बेहत्तर. नेता जिवंत राहिला पाहिजे, असे लोकांची मानसिकता असते. प्रत्येकाला आपआपला नेता, पक्ष प्रीय असतो. बॅनर, मागे मागे राहणं, ही सर्व गुलामीची अवस्था आम्ही राजकीय लोकांनी करून ठेवली, असल्याची खंत बच्चू कडू यांनी व्यक्त केली.

लोकं कायम नेत्याचे गुलाम राहते. कोणी राज ठाकरे, कुणी उद्धव ठाकरे, कुणी एकनाथ शिंदे यांचे, कुणी माझे. आम्ही गुलामी सोडली म्हणून अपक्ष चारवेळी निवडून आलो.

दुसरी भाकरं तयार आहे

या युतीमुळे शिंदे गट अस्वस्थ असल्याचं बोललं जातं. आमच्या वाट्याला अर्धी भाकर येणार होती. आता त्यातील हिस्सा हा अजित पवार गटाने नेला. असं शिंदे गटातील नेत्यांना वाटते. यावर प्रतिक्रिया देताना बच्चू कडू यांनी मोठं सूचक वक्तव्य केलं. दुसरी भाकर टाकू. एका भाकरीवर ताव मारून काय होणार. दुसरी भाकर तयार आहे, असं सूचक वक्तव्य बच्चू कडू यांनी केलं.

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.