Bademiya Restaurant Mumbai : मुंबईत 1946 पासून ‘बडेमिया’चा प्रवास सुरु, झुरळामुळे कोट्यवधींच्या व्यवसायाला ब्रेक, जाणून घ्या संपूर्ण इतिहास!
Bademiya Restaurant Mumbai : मुंबईमधील नामांकित हॉटेलांपैकी एक असेलल्या बडे मिया हॉटेलला टाळा लागला आहे. 1946 साली अवघ्या 20 रूपयांमध्ये सुरु झालेलं हॉटेल आज कोट्यवधींचा व्यवसाय करत आहे. मात्र एका झुरळाने व्यवसायासाल ब्रेक लागलाय. जाणून घ्या बडे मिया हॉटेलचा संपूर्ण इतिहास...
मुंबई : खिमा पाव, कबाब, बिर्याणी… अनेक मांसाहारी पदार्थांसाठी प्रसिद्ध असलेल्या मुबईमधील ‘बडे मिया’ हॉटेलला सील करण्यात आलं आहे. त्यामुळे सर्वसामान्यांनाच नाहीतर सेलिब्रिटिंना मोठा धक्का बसला आहे कारण हॉटेलच्या किचनमध्ये उंदिर आणि झुरळांचा वावर निदर्शनास आला. अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडून छापेमारी करण्यात आली आहे. खाद्यप्रेमीं नाराज झाले असून गेल्या पिढ्यानपिढ्या सुरू असलेलं बडे मिया हॉटेलला आता टाळा लागला आहे. या हॉटेलचा इतिहास पाहिला तर कुलाब्यातील एका कबाबच्या दुकानापासून सुरू झालेल्या बडे मियाचा प्रवास आता मुंबईतील नामांकित हॉटेलपैकी एक आहे.
बडे मिया हॉटेलचा संपूर्ण इतिहास
1946 साली मोहम्मद यासीन वयाच्या 13 व्या वर्षी बिजनौरहून मुंबईत आले होते. त्यानंतर वयाच्या 17 व्या वर्षी त्यांनी कुलाब्यातील ताज हॉटेलच्या मागे कबाबचं दुकान सुरू केलं होतं. यासीन यांचे गुरू हजरत मोहम्मद आदम चिश्ती यांनी त्यावेळी 20 रूपये दिलेले. याच पैशातून त्यांनी कबाबचं दुकान सुरू केलं होतं. यासीन यांना त्यावेळी दाढी होती, काही दिवसांनंतर ते मोठे झाल्यावर दाढीही वाढली. तेव्हा सर्व लोक त्यांना बडे मिया या नावाने बोलावू लागले
बडे मिया म्हणजेच मोहम्मद यासीन यांनी सुरूवातीली सिगडी कबाब आणि सीख कबाबापासून सुरूवात केली होती. कुलाबा हे प्रसिद्ध असून देशभरातून पर्यटक तेथे येतात कारण तिथूनल ताज हॉटेल आणि गेटवे ऑप इंडिया जवळ आहे. सुरूवातीला त्यांना म्हणावं असं काही यश आलं नाही पण हळूहळू कबाबचा वासानेच लोक हॉटेल शोधत येऊ लागले. नौदलाच जवान हॉटेलकडे येत होते त्यानंतर सर्वसामान्य लोकांनीही जायला सुरूवात केली.
लोकांची गर्दी वाढत गेली तसतशी बडे मिया यांना हॉटेलमधील मेन्यू म्हणजेच चिकन टिक्का आणि मटणाचे पदार्थ ठेवण्यास सुरूवात केली. काही दिवसांनी त्यांच्या हॉटेलचीस प्रसिद्धी वाढत गेली. तेव्हापासून ते आतापर्यंत त्यांच्या हॉटेलचे नियमित ग्राहक आहेत. चिकन आणि मटणानंतर मिया यांनी व्यवसाय वाढवायला सुरूवात केली. बिर्याणी आणि रोटी बनवण्यास सुरूवात केली. काही ग्राहक तर राहायला ताज हॉटेलमध्ये असतात आणि बडे मिया यांच्या हॉटेलमधूव जेवण ऑर्डर करतात.