मुंबई: कोविड-19 मुळे उद्धवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या वर्षी दि. 21 जुलै राजी बकरी ईद साजरी करण्यासंदर्भात गृह विभागाने मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. कोविड-19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीमुळे राज्यात सर्व धार्मिक कार्यक्रमांना बंदी आहे. त्यामुळे बकरी ईदची नमाज मस्जिद ईदगाह अथवा सार्वजनिक ठिकाणी अदा न करता, नागरिकांनी आपल्या घरीच अदा करावी. (Maharashtra Government Issue guidelines for Bakri Id celebration at home on the wake of corona virus in state)
सध्या कार्यान्वीत असणारे जनावरांचे बाजार बंद राहतील. नागरिकांना जनावरे खरेदी करावयाची असल्यास त्यांनी ऑनलाईन पध्दतीने अथवा दूरध्वनीवरुन जनावरे खरेदी करावी. नागरिकांनी शक्यतो प्रतिकात्मक कुर्बानी करावी.
लागू करण्यात आलेले ‘ब्रेक दि चैन’ चे निर्बंध तसेच त्यानंतर वेळोवेळी निर्गमित केलेल्या सूचनांनुसार इतर निर्बंध कायम राहतील. त्यामध्ये बकरी ईद निमित्त कोणतीही शिथीलता देता येणार नाही.
बकरी ईदच्या निमित्ताने नागरिकांनी कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी गर्दी करु नये किंवा एकत्र जमू नये. कोविड विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महापालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष सण सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत काही सूचना प्रसिध्द झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करणे बंधनकारक असेल असेही गृह विभागाने स्पष्ट केले आहे.
महाराष्ट्र अनलॉकच्या तिसऱ्या टप्प्यात
महाराष्ट्रात कोरोना विषाणू संसर्ग नियंत्रणात असला तरी कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आलीय असं म्हणता येत नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना विषाणूची दुसरी लाट उलटू शकते, असं म्हटलं आहे. तर, राज्यात काही ठिकाणी डेल्टा प्लस चे रुग्ण आढळून आल्यामुळे राज्यात तिसऱ्या लेव्हलचे निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यामुळे राज्यातील नागरिकांनी कोरोना नियमांचं पालन करण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे.
संबंधित बातम्या
Nagpur Vaccination | पहिला डोस कोव्हिशिल्ड तर दुसरा कोव्हॅक्सिन, महिलेला दोन वेळा उलट्या
Maharashtra Government Issue guidelines for Bakri Id celebration at home on the wake of corona virus in state