सुषमा अंधारे, भास्कर जाधव यांच्या विरोधात तक्रार का केली, बाळा गवस यांनी स्पष्ट सांगितलं
तरीही उद्धव ठाकरे यांनी लक्ष दिलं नाही म्हणून आमदार शिंदे यांच्यासोबत गेलेत.
निखिल चव्हाण, TV9 मराठी, प्रतिनिधी, मुंबई : उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मेळावा घेण्यात आला. त्यावेळी भाषणात प्रक्षोभक भाषण करण्यात आले. त्याबद्दल शिंदे गटाचे बाळा गवस यांनी पोलिसांत तक्रार केली. ठाकरे गटाचे नेते खालच्या स्तराला जाऊन भाषण करतात. गद्दार, हे चुकले ते चुकले, अशी टीका करत असतात. शिंदे ठिकठिकाणी जातात. याचा यांना त्रास होतोय. प्रत्येकवेळी गद्दार, खंजीर खुपसलं. खोके असे आरोप केले जात आहेत. काय खंजीर खुपसून कसे गेलेत हे सांगावं ना, असं बाळा गवस यांनी ठणकावले.
बाळा गवस म्हणाले, 40 आमदार हे उद्धव ठाकरे यांना सांगून गेलेत. राष्ट्रवादीचा असा त्रास आहे. आमदारांना निधी मिळत नाही, असं सांगितलं. तरीही उद्धव ठाकरे यांनी लक्ष दिलं नाही म्हणून आमदार शिंदे यांच्यासोबत गेलेत.
खंजीर का खुपसलं. गद्दार कुणाला म्हणायचं. बाळासाहेबांचे विचार सोडणारे खरे गद्दार आहेत, अशी टीका बाळा गवस यांनी केली. ते म्हणाले, शिंदे हे हिंदुत्वाचे विचार पुढं नेत आहेत. सुषमा अंधारे या काहीतरी बोलणार.
राजन राजे हा कामगारांचा नेता हा शिंदे साहेबांवर टीका करतो. हा हिंदुंचा अपमान आहे. हिंदुंच्या विरोधात बोलतोय. भास्कर जाधव हे एकनाथ शिंदे यांची नक्कल करत होते.
चिपळूणमध्ये पूर आहे. तेव्हा एकनाथ शिंदे यांनी काम केलं. आउट ऑप वे जाऊन काम केलं. त्यांची नक्कल करतात. काम करणाऱ्या व्यक्तींची नक्कल करत असतील तर दु:ख वाटलं. त्यामुळं तक्रार केल्याचं बाळा गवस यांनी सांगितलं.