Bala Nangaonkar: राज ठाकरेंच्या निवासस्थानी तासभर खलबतं, बाळा नांदगावकर एका वाक्यात म्हणाले, आम्ही भूमिकेवर ठाम

Bala Nangaonkar: आमची भूमिका जाहीर सभेत मांडली आहे. त्या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत.

Bala Nangaonkar: राज ठाकरेंच्या निवासस्थानी तासभर खलबतं, बाळा नांदगावकर एका वाक्यात म्हणाले, आम्ही भूमिकेवर ठाम
राज ठाकरेंच्या निवासस्थानी तासभर खलबतं, बाळा नांदगावकर एका वाक्यात म्हणाले, आम्ही भूमिकेवर ठामImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 03, 2022 | 2:17 PM

मुंबई: भोंग्याबाबतची मनसेची डेडलाईन उद्या संपत आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे (raj thackeray) यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी मनसे (mns) कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. तब्बल तासभर ही बैठक सुरू होती. या बैठकीला मुंबई, ठाण्यातील मनसेचे कार्यकर्ते उपस्थित होते. या बैठकीनंतर मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी एका वाक्यात पक्षाची भूमिका स्पष्ट केली. औरंगाबादमध्ये राज ठाकरे यांनी भूमिका मांडली. त्या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत, असं बाळा नांदगावकर (bala nandgaonkar) यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे उद्या ज्या मशिदीवर भोंगे असतील त्या ठिकाणी मनसे कार्यकर्ते हनुमान चालिसाचे पठण सुरू करण्यात येणार असल्याचं कळतं. मनसेच्या या आक्रमक भूमिकेमुळे राज्यात पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच पोलिसांनी मनसेच्या अनेक कार्यकर्त्यांना नोटिसाही बजावल्या आहेत.

आमची भूमिका जाहीर सभेत मांडली आहे. त्या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत. केवळ बोलल्यामुळे नोटिसा येत असतील वर्षानुवर्ष कायदा तोडला जात आहे. परमीशन न घेता अनाधिकृत मशिदी बांधत आहेत. अनाधिकृत भोंगे लावत आहेत. त्यांच्यावर कोणतीच कारवाई होत नाही. हे सरकार मुस्लिमांचं तृष्टीकरण करणारं सरकार आहे त्याचा धिक्कार करतो, असं बाळा नांदगावकर म्हणाले.

सरकार बदलते तशी पोलिसांची भाषा बदलते

सरकार बदलते तशी पोलिसांची भाषा बदलते. तरीही सरकारचा सन्मान राखणं हे आमचं कर्तव्य आहे. आम्हाला 149ची नोटीस दिली आहे. शिवाजी पार्क पोलिसांनी या नोटिसा दिल्या आहेत. आम्ही त्या नोटिसचं स्वागत करतो. शेवटी पोलीस दल आहे. आम्ही कायद्याचा सन्मान करू, असं त्यांनी सांगितलं.

हे सुद्धा वाचा

मनसेचे कार्यकर्ते भूमिगत

दरम्यान, पोलिसांनी बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे आणि अविनाश जाधव यांच्यासह सुमारे 13 हजार मनसे सैनिकांना पोलिसांनी नोटिसा बजावल्या आहेत. पोलिसांच्या नोटिसा येत असल्याने धरपकड होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मनसेचे अनेक कार्यकर्ते भूमिगत झाले आहेत. उद्या गनिमी काव्याने आंदोलन करण्याचा इशाराही मनसेकडून दिला आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.