राज्य सरकारकडून थोर व्यक्तींची यादी जाहीर, बाळासाहेब ठाकरे, प्रबोधनकार ठाकरे यांचा समावेश
उद्धव ठाकरे मंत्री असलेल्या सामान्य प्रशासन खात्याने याबाबतचा निर्णय घेतला आहे. (State Government Announce Great Personalities list)
मुंबई : दरवर्षी राज्य सरकारकडून राष्ट्रपुरुष, थोर व्यक्तींच्या जयंती आणि पुण्यतिथीला अभिवादन करण्यासाठीची यादी जाहीर केली जाते. यंदाही राज्य सरकारकडून थोर व्यक्तींची यादी जाहीर केली आहे. विशेष म्हणजे यंदाच्या थोर व्यक्तींच्या यादीत बाळासाहेब ठाकरे, प्रबोधनकार ठाकरे यांचा समावेश करण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंत्री असलेल्या सामान्य प्रशासन खात्याने याबाबतचा निर्णय घेतला आहे. (Balasaheb Thackeray and Prabodhankar Thackeray Name In State Government Announce Great Personalities list)
राज्य सरकारने जाहीर केलेल्या यादीनुसार प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे, आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर आणि डॉ. भाऊसाहेब ऊर्फ पंजाबराव देशमुख यांच्या नावांचा समावेश करण्यात आला आहे. यानुसार 23 जानेवारीला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती, 16 फेब्रुवारीला आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर, 17 सप्टेंबरला केशव सीताराम ठाकरे म्हणजेच प्रबोधनकार ठाकरे आणि 27 डिसेंबरला डॉ. भाऊसाहेब उर्फ पंजाबराव देशमुख यांना अभिवादन करण्यात येणार आहे.
राज्य सरकारकडून थोर व्यक्तींची यादी जाहीर
- सावित्रीबाई फुले जयंती – 3 जानेवारी 2021
- जिजाऊ माँ साहेब जयंती – 12 जानेवारी 2021
- स्वामी विवेकानंद जयंती – 12 जानेवारी 2021
- नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती – 23 जानेवारी 2021
- बाळासाहेब ठाकरे जयंती – 23 जानेवारी 2021
- संत सेवालाल महाराज जयंती – 15 फेब्रुवारी 2021
- बाळशास्त्री जांभेकर – 16 फेब्रुवारी 2021
- छत्रपती शिवाजी महाराज जयंती – 19 फेब्रुवारी 2021
- संत गाडगेबाबा महाराज जयंती – 23 फेब्रुवारी 2021
- संत रविदास महाराज जयंती (तिथीनुसार) – 27 फेब्रुवारी 2021
- यशवंतराव चव्हाण जयंती – 12 मार्च 2021
- शहीद दिन – 23 मार्च 2021
- महात्मा ज्योतिबा फुले जयंती – 11 एप्रिल 2021
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती – 14 एप्रिल 2021
- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती – 30 एप्रिल 2021
- महात्मा बसवेश्वर जयंती – 14 मे 2021
- दहशतवाद आणि हिंसाचार विरोधी दिवस – 21 मे 2021
- स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती – 28 मे 2021
- अहिल्यादेवी होळकर जयंती – 31 मे 2021
- महाराणा प्रतापसिंह जयंती (तिथीनुसार)- 13 जून 2021
- राजर्षी शाहू महाराज जयंती – 26 जून 2021
- वसंतराव नाईक जयंती – 1 जुलै 2021
- लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जयंती – 23 जुलै 2021
- साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती – 1 ऑगस्ट 2021
- क्रांतिसिंह नाना पाटील जयंती – 3 ऑगस्ट 2021
- सद्भावना दिवस – 20 ऑगस्ट 2021
- राजे उमाजी नाईक जयंती – 7 सप्टेंबर 2021
- केशव सिताराम ठाकरे उर्फ प्रबोधनकार ठाकरे – 17 सप्टेंबर 2021
(Balasaheb Thackeray and Prabodhankar Thackeray Name In State Government Announce Great Personalities list)
संबंधित बातम्या :
285 ठिकाणी व्हॅक्सिनेशन सेशन्स, प्रत्येकाला 2 डोस, कोरोना लसीकरणासाठी महाराष्ट्र सज्ज
शिष्यवृत्ती मान्य करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांची रक्कम लवकरच देणार, प्राजक्त तनपुरेंची माहिती