Balasaheb Thackeray: ‘…जेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी चर्चेतून रस्त्यावर केली जाणारी मुंबईतील नमाज बंद केली!’

Balasaheb Thackeray and Muslim Namaz on Mumbai Road issue: फक्त भूमिका घेऊन बाळासाहेब ठाकरे थांबले नाही, तर त्यांनी तोडगा काढण्यासाठी आणि प्रश्न सोडवण्यासाठीही प्रयत्न केले, असंही राऊतांनी म्हटलंय.

Balasaheb Thackeray: '...जेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी चर्चेतून रस्त्यावर केली जाणारी मुंबईतील नमाज बंद केली!'
बाळासाहेब ठाकरेंनी नेमकं काय केलं होतं?Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Apr 20, 2022 | 11:12 AM

मुंबई : महाराष्ट्रात (Maharashtra) सध्या मशिदींवरील भोंग्यावरुन वातावरण तापवलं जात आहे. भोंग्यांना हनुमान चालिसेनं (Hanuman Chalisa) प्रत्युत्तर देण्याचा इशारा राज ठाकरेंनी दिला होता. त्यावरुन संजय राऊत यांनी वेळोवेळी भाजप आणि मनसेच्या मुद्द्याला फटकारलंय. दरम्यान, संजय राऊत यांनी बाळासाहेब ठाकरेंनी (Balasaheb Thackeray) नेमका मुस्लिमांचा रस्त्यावर केल्या जाणाऱ्या नमाज पठणाचा विषय कसा हाताळला होता, याची आठवण यावेळी करुन दिली. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. चर्चेतून प्रश्न सोडवले जातात, असं संजय राऊत यांनी म्हटलंय. फक्त भूमिका घेऊन बाळासाहेब ठाकरे थांबले नाही, तर त्यांनी तोडगा काढण्यासाठी आणि प्रश्न सोडवण्यासाठीही प्रयत्न केले, असंही राऊतांनी म्हटलंय. युतीचं सरकार असताना मुख्यमंत्री मनोहर जोशी आणि उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या मदतीनं बाळासाहेबांनी मशिंदीचा प्रश्न कसा निकाली काढला होता, याचा किस्साच संजय राऊतांनी यावेळी सांगितलंय.

काय म्हणाले संजय राऊत…?

संजय राऊत यांनी यावेळी बोलताना म्हटलंय, की..

शिवसेना प्रमुखांना सातत्यानं अनेक प्रश्न मुस्लिमांबाबत चर्चेतून सोडवले. त्यांनी निश्चितच एक आक्रमक भूमिका घेतली. रस्त्यावरचे नमाज ही त्या काळातली एक समस्या होती. बाळासाहेबांनी तेव्हा आव्हान दिलं होतं, की रस्त्यावरचे नमाज बंद करा. भोंगे उतरवा. पण ही भूमिका घेऊन ते थांबले नाहीत. महाराष्ट्रात जेव्हा युतीचं सरकार आलं, तेव्हा मनोहर जोशी मुख्यमंत्री होते आणि मुंडे उपमुख्यमंत्री होते. तेव्हा त्यांनी सर्व प्रमुख मुस्लिम मौलवींनी बोलवून सांगितलं की तुम्ही ते स्त्यावरचे नमाज बंद केले पाहिजे. तेव्हा रस्त्यावरचे नमाज बंद करण्यासाठी काय केलं पाहिजे, याबाब त्यांच्याशी चर्चा केली.

तेव्हा ते मौलवी म्हणाले, की आमच्या मशिदींचा आकार लहान आहे. आम्हाला नमाज पडायला जागा नाही प्रार्थनेसाठी.. उपाय काय..? आमच्या मशिंदीसाठी जागा वाढवण्यासाठी एफएसआय वाढवून द्या… म्हणजे मशिदीची उंची वाढवू. तेव्हा बाळासाहेबांनी ही बाब मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना सांगितली. एफएसआय वाढवून देण्यात आला.. मग रस्त्यावरचे नमाज बंद झाले.. तोडगा काढण्याची हिंमत तेव्हा शिवसेनेत, बाळासाहेबांमध्ये होती.

भोंग्यावरुन राजकारण…

भाजपला आता भोंग्याबाबत जाग आली आहे. आता ते झोपेतून उठले आहे, असा टोलाही संजय राऊत यांनी यावेळी लगावला आहे. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भोंग्याबाबत राष्ट्रीय धोरण लागू करावं, असा सल्लाही राऊतांनी यावेळी दिला आहे.

पाहा व्हिडीओ : संजय राऊतांनी सांगितला तो किस्सा?

संबंधित बातम्या :

उद्धव ठाकरेंची माफियागिरी, माझ्यावर 12 आरोप लावले, चौकशीच्या तिसऱ्या दिवशी सोमय्यांचा हल्लाबोल

Devendra Fadnavis Video : हे सगळे एकाच बापाची औलाद निघाले, फडणवीसांच्या या वक्तव्याचा संदर्भ काय?

Dhananjay Munde on Raj Thackeray : ‘भाजपच्या बोलक्या बाहुल्याचा खेळ सुरु’, धनंजय मुंडेंकडून राज ठाकरेंचा ‘अर्धवटराव’ म्हणून उल्लेख!

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.