Balasaheb Thackeray Memorial | बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचा भूमिपूजन सोहळा, उद्धव ठाकरेंच्या हस्ते भूमिपूजन

संध्याकाळी 5.00 वाजता बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे भूमिपूजन केले जाणार आहे. (Balasaheb Thackeray National Memorial Bhumi Pujan Ceremony)

Balasaheb Thackeray Memorial | बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचा भूमिपूजन सोहळा, उद्धव ठाकरेंच्या हस्ते भूमिपूजन
Balasaheb Thackeray National Memorial
Follow us
| Updated on: Mar 31, 2021 | 10:09 AM

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचे (Balasaheb Thackeray National Memorial) भूमिपूजन सोहळा आज (31 मार्च) पार पडणार आहे. आज संध्याकाळी 5 वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. शिवाजी पार्क येथील महापौरांचे जुने निवासस्थान या स्मारकाची नियोजित जागा आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने याबाबतची माहिती दिली आहे. (Balasaheb Thackeray National Memorial Bhumi Pujan Ceremony)

मुख्यमंत्री कार्यालयाने नुकतंच मुख्यमंत्र्यांच्या दिवसभरातील विविध कार्यक्रमांची माहिती दिली. या माहितीनुसार उद्धव ठाकरे सकाळी 11 वाजता छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळयास अभिवादन करणार आहेत. त्यानंतर दुपारी 3.30 वाजता महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीची बैठक आयोजित करण्यात आली आहे.

संध्याकाळी स्मारकाचे भूमिपूजन 

यानंतर संध्याकाळी 5.00 वाजता बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे भूमिपूजन केले जाणार आहे. दादरच्या शिवाजी पार्कमधील जुना महापौर बंगल्यात हा सोहळा पार पडणार आहे. या कार्यक्रमाचे ऑनलाईन थेट प्रक्षेपण करण्यात येईल, अशी माहिती शिवसेना नेते उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा सोहळा ठराविक मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात उपस्थितीत राहणार आहेत.

कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण

या कार्यक्रमाचे थेट प्रसारण twitter.com/MMRDAOfficial अथवा parthlive.com यावर तसेच माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या twitter.com/MahaDGIPR,http तसेच सर्व जिल्हा माहिती कार्यालयांच्या ट्वीटर आणि फेसबुकवरुन करण्यात येणार आहे. (Balasaheb Thackeray National Memorial Bhumi Pujan Ceremony)

स्मारकाचे काम दोन टप्प्यांत होणार 

मुंबई महापौर यांच्या निवसास्थानाच्या परिसरात होणाऱ्या बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी राज्य सरकारने एकूण 400 कोटी रुपये मंजूर केलेले आहेत. मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता. बाळासाहेबांच्या स्मारकाचे काम एकूण दोन टप्प्यांत चालणार आहे. पहिल्या टप्प्यात स्थापत्य, विद्युत, वातानुकुलित यंत्रणा उभारणी, इमारतीच्या अंतर्गत आणि बाह्य सजावट, वाहनतळ उभारणी, बागबगिचा तयार करणे, रेनवॉटर हार्वेस्टिंग इत्यादी कामं केली जातील. या सर्व कामांसाठी पहिल्या टप्प्यात अंदाजे 250 कोटी रुपये देण्यात येणार आहेत.

दुसऱ्या टप्प्यात लेझर शो,व्हर्च्यूअल रियालिटी शो उभारण्यावर भर

दुसऱ्या टप्प्यात बाळासाहेबांच्या स्मारकाच्या अद्ययवतीकरणावर काम केले जाईल. राज्य सरकारकडून बाळासाहेबांच्या स्मारकासाठी दुसऱ्या टप्प्यात 150 कोटी रुपये देण्यात येणार आहेत. दुसऱ्या टप्प्यात तंत्रज्ञानविषयक कामं केली जाणार आहेत. यामध्ये लेझर शो, डिजिटल मॅपिंग प्रोजेक्शन, कथा/गोष्टी सांगणे, चित्रपट, व्हर्च्यूअल रियालिटी शो आणि तांत्रिक बाबींवर काम केले जाईल. इमारतीचे बांधकाम पूर्णत्वास येत असताना ही कामं केली जातील. (Balasaheb Thackeray National Memorial Bhumi Pujan Ceremony)

संबंधित बातम्या : 

Balasaheb Thackeray | बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचे भूमिपूजन, कार्यक्रमाच्या परवानगीसाठी विशेष प्रयत्न

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.