राज्यपालांनी राज्यघटनेच्या मूलभूत तत्त्वांना हात घातला, काँग्रेसची टीका

राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी राज्यघटनेच्या मुलभूत तत्वांना हात घातला, असल्याची टीका बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

राज्यपालांनी राज्यघटनेच्या मूलभूत तत्त्वांना हात घातला, काँग्रेसची टीका
Follow us
| Updated on: Oct 13, 2020 | 5:37 PM

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी राज्यघटनेच्या मूलभूत तत्त्वांना  हात घातला, ही वस्तूस्थिती आहे. राज्यपालांचं वक्तव्य राष्ट्रपतींना मान्य आहे का?,असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी धर्मनिरपेक्ष शब्दाला स्मरून शपथ घेतली. ते गोव्याचेही राज्यपाल आहेत तिथेही त्यांनी अशीच भूमिका घेतली का?, असा प्रश्न थोरात यांनी उपस्थित केला आहे. (Balasaheb Thorat rise questions on letter of Bhagatsingh Koshyari)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना संकटात योग्य काम केलं आहे. राज्यपालांनी त्यांच्या कामाची दखल घेतली असती तर बरं वाटलं असतं, असही बाळासाहेब थोरात म्हणाले. राज्यपालांच्यांवर व्यक्तिगत टीका करणार नाही पण त्यांनी यासंबंधी काळजी घेतली पाहिजे होती, असेही त्यांनी सांगितले.

काँग्रेसची कृषी कायद्यांविरोधात रॅली

केंद्र सरकारने लादलेल्या या काळ्या कायद्यांना राष्ट्रवादी काँग्रेसने विरोध दर्शवला आहे तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबतही या विषयावर बैठक झाली आहे. भाजप सरकारने बहुमताच्या जोरावर लोकशाही व संसदेचे सर्व नियम पायदळी तुडवून शेतक-यांवर हे कायदे लादले आहेत. उद्योगपतींच्या फायद्यासाठी आणलेल्या या काळ्या कायद्यांमुळे देशातील शेतकरी उद्धवस्त होणार असून शेतक-यांना उद्योगपतींचे गुलाम बनवण्याचा हा डाव आहे, अशी टीका बाळासाहेब थोरात यांनी केली.

केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी काळ्या कायद्यांविरोधात काँग्रेस राज्यभर आंदोलन करत आहे. 15 ऑक्टोबरला शेतकरी बचाव व्हर्च्युअल रॅलीचे आयोजन केले आहे. 10 हजार गावांमधील शेतकरी ही रॉली पाहणार आहेत. सोशल मीडियावर ही रॅली पाहता येईल, अशी व्यवस्था केली जाणार आहे. काँग्रेसचा 50 लाख शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न राहील. संगमनेर येथे महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील आणि मंत्री अशोक चव्हाण उपस्थित राहणार आहेत.

उद्धव ठाकरेंचे राज्यपालांच्या पत्राला उत्तर

“माझ्या हिंदुत्वाचा आपण जो उल्लेख केला, तो योग्यच आहे, मात्र माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. तसेच ते कोणाकडून शिकण्याचीही मला गरज नाही” अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना सुनावले. “माझ्या राज्याला अथवा माझ्या राज्याच्या राजधानीला पाकव्याप्त काश्मीर म्हणणाऱ्यांचे हसत खेळत घरात स्वागत करणे, हे माझ्या हिंदुत्वात बसत नाही, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला.

दरम्यान, “हिंदुत्वाचे आपण खंदे पुरस्कर्ते आहात. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अयोध्या दौऱ्यातून आपण भगवान श्रीरामाविषयीच्या भक्तीचे जाहीर दर्शन दिलेत. आषाढी एकादशीला आपण पंढरपुरातील विठ्ठल रखुमाईची पूजा केली होतीत. धार्मिक स्थळे उघडण्याचा निर्णय पुढे ढकलण्यासाठी आपल्या कोणतीही दैवी सूचना मिळत आहे की काय, याचे मला आश्चर्य वाटते. की तुम्ही ज्या शब्दाचा तिरस्कार करत होतात, ती धर्मनिरपेक्षता तुम्ही अंगिकारली की काय, याचेही कुतूहल वाटते” असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पत्रात म्हटले होते.

संबंधित बातम्या:

उद्धव ठाकरेंना हिंदुत्वावरुन डिवचणारं हेच ते राज्यपालांचं पत्र

माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही, उद्धव ठाकरे राज्यपालांवर बरसले

(Balasaheb Thorat rise questions on letter of Bhagatsingh Koshyari)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.