भिवपुरीच्या जंगलात ‘बाण’ची वृक्षारोपण मोहीम; वृक्षारोपणातील निगा राखण्याचा अनोखा उपक्रम; 14 वर्षापासून उपक्रमात सातत्य
या मोहिमेत अनेकांचं आर्थिक, शारीरिक पाठबळ मिळू लागल्यानं उत्साह वाढला. त्यामुळेच गेल्यावर्षी 200 झाडं लावण्यात आली होती. त्यातील 120 झाडं जगली आहेत. यावर्षी वृक्षारोपण मोहिमेत 250 झाडे लावण्यात आली. झाडं लावण्याच्या या उपक्रमासाठी अनेकांची मदत झाली. दरवर्षी या मोहिमेला मिळणारा प्रतिसाद वाढत आहे. त्यामुळे ही मोहिमदेखील यशस्वी होत आहे.
मुंबईः दरवर्षी प्रमाणे यंदाही ‘बाण हायकर्स’ तर्फे (Ban Hikers) भिवपुरीच्या जंगलात 250 झाडे लावण्यात आली आहेत. बाण हायकर्स हे वृक्षारोपणाचे यंदाचे पाचवे वर्ष आहे. ‘बाण’च्या वृक्षारोपणा मोहिमेचे (Plantation campaign) वैशिष्ट्य म्हणजे आदल्या वर्षी लावलेल्या झाडांची निगादेखील तितक्यात काळजीपूर्वक घेतली जाते. त्यामुळे आतापर्यंत वृक्षारोपण मोहिमेतील अनेक झाडे जगली आहेत. यंदाच्यावर्षीच्या वृक्षारोपणाच्या मोहिमेत 30 सदस्य सहभागी झाले होते. झाडे लावणे हा छंद नाही तर ते कर्तव्य आहे, असं मानत ‘बाण’नं स्थापनेपासूनच म्हणजे 2008 पासून झाडं लावण्याचा उपक्रम हाती घेतला होता. गेल्या 5 वर्षांपासून भिवपुरीच्या जंगलामध्ये दरवर्षी हे वृक्षारोपण मोहिम राबविण्यात आली होती.
विशेष बाब म्हणजे या मोहिमेमध्ये स्थानिक नागरिकही मोठ्या उत्साहानं सहभागी होत असतात. वृक्षारोपण मोहिमेत पहिल्या तीन वर्षांत दीडशे झाडे लावण्यात आली होती.
अनेकांचं आर्थिक, शारीरिक पाठबळ
त्यानंतर या मोहिमेत अनेकांचं आर्थिक, शारीरिक पाठबळ मिळू लागल्यानं उत्साह वाढला. त्यामुळेच गेल्यावर्षी 200 झाडं लावण्यात आली होती. त्यातील 120 झाडं जगली आहेत. यावर्षी वृक्षारोपण मोहिमेत 250 झाडे लावण्यात आली. झाडं लावण्याच्या या उपक्रमासाठी अनेकांची मदत झाली. दरवर्षी या मोहिमेला मिळणारा प्रतिसाद वाढत आहे. त्यामुळे ही मोहिमदेखील यशस्वी होत आहे.
सामाजिक विकासासाठी राष्ट्रहित
आझादी का अमृत महोत्सवानिमित्त, एसबीआयने संपूर्ण भारतात सामाजिक विकास, सामाजिक दायित्व आणि पर्यावरण जतन आणि देखभाल यांसारखे विविध उपक्रम राबवले आहेत. मुख्य महाव्यवस्थापक, मुंबई मेट्रो विभाग जीएस राणा आणि महाव्यवस्थापक जुही स्मिता सिन्हा यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ठाणे मॉड्युलचे उपमहाव्यवस्थापक अतुल राठी यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक विकासासाठी राष्ट्रहिताचा कार्यक्रम राबविण्यात आला. जो आर्थिक, पर्यावरणीय आणि सामाजिक विकासासाठी महत्वाचा आहे.
एसबीआय ठाणे मॉड्युलने 2500 वृक्षारोपण
एसबीआय ठाणे मॉड्युलने 2500 वृक्षारोपण, शाळेचे परिवर्तन, महिला आणि बालकल्याण, आरोग्य सेवा, बेटी बचाओ बेटी पढाओ, इत्यादी अनेक राष्ट्रीहिताच्या उपक्रमांमध्ये आपले योगदान दिले. या उपक्रमांतर्गत बँक दिनाच्या 67 व्या वर्धापनदिनानिमित्त एसबीआय एओ ठाणे यांनी शहापूर येथील सासुरवाडी आश्रमशाळेत 2150 झाडे लावण्यात आली. कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अंतर्गत, एसबीआयने फक्त आपल्या नफ्याकडे लक्ष न देता आजूबाजूच्या सामाजिक समस्यांवर लक्ष केंद्रित केले आहे आणि समाज आणि देशासाठी एक जबाबदार कॉर्पोरेट नागरिकत्वाची भूमिका नेहमीच बजावत आहे.