वांद्रे – गोवा व्हाया बोरीवली ट्रेन चाकरमान्यांसाठी की गोवा पर्यटनासाठी, चाकरमान्यांचा सवाल ?
पश्चिम रेल्वे सिंधू एक्सप्रेसला नियमितपणे 20 कोच लावणार आहे. ही ट्रेन दर आठवड्यात दोनदा धावणार आहे. ही ट्रेन 604 किमीचे अंतर एकूण 14 तास 35 मिनटांत कापणार आहे आणि तिचा सरासरी वेग 42 कि.मी. प्रति तास असणार आहे.
रेल्वेने वांद्रे टर्मिनस ते गोवा ( मडगाव) व्हाया वसई अशी कायमस्वरूपी ट्रेन सूरु झाली आहे. त्यामुळे पश्चिम उपनगरातील चाकरमान्यांना गोव्यात पर्यटनासाठी जाण्यासाठी आणखी एक पर्याय उपलब्ध होणार आहे. परंतू कोणत्याही गाडीचे आरक्षण IRCTC च्या webside वर सकाळी 8 वाजता उघडते.10115 या गाडीचे फक्त एक दिवस आधी आरक्षण सुरु करण्याचा नक्की उद्देश काय? IRCTC निकषांप्रमाणे सकाळी 8 वाजता आरक्षण आजवर सुरु होत आले आहे, पण IRCTC चे सगळे नियम धाब्यावर बसवून या गाडीचे आरक्षण दुपारी 12 वाजता सुरु केले होते…हे कोणत्या नियमात बसते? असा सवाल प्रवाशी बळीराम राणे यांनी केला आहे.असं म्हटल जातं ही खासदार पियूष गोएल यांची वचनपूर्ती आहे.हरकत नाही पण त्याकरीता रेल्वेचे नियम धाब्यावर बसवायचे काय? असाही सवाल त्यांनी केला आहे.
वैभववाडी आणि कुडाळ थांबा का नाही ?
दुसरीकडे म्हणजे कोकण आणि कोकणवासीयांकरता ट्रेन क्रमांक 10115 ची काल ट्रायल रन करण्यात आली. जर चाकरमान्यांसाठीही ट्रेन सोडल्याचे सांगितलं जातंय मग या गाडीला वैभववाडी आणि कुडाळ या स्थानकांवर थांबा का दिला नाही ? दुसरं म्हणजे ही गाडी गोव्यात पर्यटनासाठी ( मडगाव ) जाणाऱ्यांची सोय पाहून तर सोडली नाही ना ? असा संशय कोकणवासीयांनी व्यक्त केला आहे. गोयल यांचे कोकणवासीयांनावर एवढेच प्रेम ओतू जात असेल तर या गाडीला वैभववाडी आणि कुडाळ येथे थांबा द्यावा अशी मागणी बळीराम राणे यांनी केली आहे. एवढी वर्षे पश्चिम उपनगरातील चाकरमानी गाडीची मागणी करीत होते, आता त्यांची मागणी पूर्ण झाली हेच काय ते समाधान मानायचे असे राणे यांनी म्हटले आहे.
नव्या गाडीचा मार्ग हा वांद्रे-बोरिवली -वसई-रोहा-मडगाव असा असणार आहे. या गाडीला एकूण 16 LHB स्वरुपाचे डबे आहेत. नवीन गाडी आठवड्यातून दोन दिवस म्हणजेच मंगळवार आणि गुरुवार सकाळी 7.40 वाजता मडगाव (Goa) येथून सुटेल आणि वांद्रे येथे रात्री 23.40 वाजता पोहोचेल. तर परतीची गाडी वांद्रे येथून दर बुधवारी आणि शुक्रवारी सकाळी 6.50 वाजता सुटेल आणि मडगाव येथे रात्री 22.00 वाजता पोहोचेल. दरम्यान सध्या ही गाडी वांद्रे, बोरीवली, वसई, भिवंडी रोड, पनवेल, रोहा, वीर, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, सावंतवाडी, थिविम, करमाळी, मडगाव असे थांबे दिले आहेत.
दर आठवड्याला बुधवार आणि शुक्रवारी सुटणार
गुरुवार 29 ऑगस्ट रोजी दुपारी 1.00 वाजता बोरीवलीवरून कोकणात जाण्यासाठी सोडण्यात येणाऱ्या ट्रेनचा नं 09167 असून त्याचे रिझर्वेशन बुधवार 28ऑगस्ट रोजी दुपारी 12.00 वाजता सुरु होणार अशी माहिती भाजपाच्या नेत्यांनी समाजमाध्यमात पसरवली होती. परंतू ही ट्रेन आता हीच ट्रेन पुढील आठवड्यापासून दर बुधवार आणि शुक्रवार सकाळी 6.50 वाजता वांद्रे (गाडी क्रमांक 10115) सुटून सकाळी 7.23 वा बोरीवली येथे येईल. तसेच दर मंगळवार आणि गुरुवारी सकाळी 7.40 वा. मडगाव (गाडी कम्रांक 10116) वरुन सुटेल असे म्हटले जात आहे.
स्थानके :
वांद्रे, बोरीवली, वसई, भिवंडी रोड, पनवेल, रोहा, वीर, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, सावंतवाडी, थिविम, करमाळी, मडगाव